Reliance ने गेल्या आठवड्यात आपल्या 42व्या ऍन्युल जनरल मीटिंग (AGM) मध्ये कंपनीच्या अनेक यशस्वी कारनाम्यांबद्दल चर्चा केली होती. अलीकडेच टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) च्या रिपोर्ट मध्ये समोर आले होते कि Jio 4G डाउनलोड स्पीडच्या बाबतीत भारतातील सर्व कंपन्यांपेक्षा पुढे आहे. तसेच आता ट्राई च्या अजून एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि रिलायंस जियो ने जून मध्ये 82 लाख नवीन यूजर्स जोडण्यासोबतच मोबाईल ग्राहकांच्या संख्येत सतत वाढ नोंदवली आहे.
याच काळात इतर टेलीकॉम कंपनी जसे कि एयरटेल ने 29,883 आणि वोडाफोन आइडिया ने जवळपास 41 लाखांपेक्षा जास्त ग्राहक गमावले आहेत. आणि हे काही पहिल्यांदा नाही जेव्हा जियोच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ दिसली आहे. ट्राई ने जाहीर केलेल्या रिपोर्ट मध्ये हे आकडे सादर करण्यात आले आहेत.
जियो एकटी कंपनी नाही जिचे ग्राहक वाढले आहेत. सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल ने पण जून मध्ये नवीन ग्राहक जोडले आहेत. सरकारी ऑपरेटरने जून मध्ये 2.66 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) साठी जून 2019 मध्ये एकूण 43.4 लाख अर्ज मिळाले. तसेच देशात वायरलेस ग्राहकांची (जीएसएम, सीडीएमए आणि एलटीई) एकूण संख्या जून 2019 मध्ये 116.54 कोटींवर गेली आहे, जी मे 2019 मध्ये 116.18 कोटी होती.
4जी स्पीड मध्ये जियोची कमाल
TRAI नुसार जुलै 2019 मध्ये Reliance Jio ने 4G नेटवर्क वर सरासरी 21.0 एमबीपीएस चा डाउनलोड स्पीड दिला आहे. या स्पीड सह Jio ने पुन्हा एकदा देशातील सर्वात वेगवान 4जी नेटवर्क असल्याचे सिद्ध झाले आहे. Jio नंतर Airtel कंपनी दुसऱ्या नंबर वर आहे. जुलै महिन्यात Airtel नेटवर्क वर सरासरी 4G डाउनलोड स्पीड 8.8 एमबीपीएस मोजण्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या नंबर वरील कंपन्यांच्या मध्ये दुपटीपेक्षा जास्त अंतर आहे.
















