4G सिम अपग्रेड केल्यावर कोणती टेलीकॉम कंपनी देत आहे कोणते फायदे

Airtel ने इंडियन टेलीकॉम बाजारात आज मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि ते देशात आपली 3G सर्विस बंद करणार आहेत. Airtel ने हि सर्विस बंद करण्याची सुरवात कोलकात्यापासून केली आहे 3G नेटवर्क हटवून तो 4G वर अपग्रेड केला जात आहे. एयरटेलने केलेली हि सुरवात भारतीय दूरसंचार बाजारासाठी मोठी बातमी आहे. ज्यामुळे फक्त प्रतिस्पर्धी नव्हे तर मोबाइल यूजर्स पण आश्चर्यचकित झाले आहेत. जर तुम्ही पण आपला नंबर 3G वरून 4G मध्ये अपग्रेड करू इच्छित असाल तर पुढे आम्ही सविस्तर सांगितले आहे कि कोणती टेलीकॉम कंपनी आपल्या नवीन 4G कस्टमर्सना कोणते बेनिफिट देत आहे.

Airtel

सर्वात आधी एयरटेल बद्दल बोलायचे तर 3G वरून 4G मध्ये अपग्रेड करणाऱ्या ग्राहकांना सर्वात जास्त फायदा हीच कंपनी देत आहे. Airtel च्या 3G नेटवर्क वरून 4G नेटवर्क वर अपग्रेड करणाऱ्या पोस्टपेड यूजर्सना कंपनी 30 दिवसांसाठी 4जी डेटा देत आहे जो रोज 1जीबी या हिशोबाने कस्टमर्सच्या नव्या 4जी सिम वर क्रेडिट होईल. त्याचप्रमाणे 4G च्या पोस्टपेड ग्राहकांना बिल साइकल मध्ये 30जीबी 4G डेटा मिळेल.

IDEA

तसे पाहत वोडाफोन आणि आइडिया एक झाले आहेत पण तरीही IDEA नेटवर्क वर 3G सिम 4G नेटवर्क वर अपग्रेड केल्यावर कंपनी यूजर्सना अतिरिक्त फायदे देत आहे. कंपनीने नवीन 4G यूजर्स साठी एक खास प्लान सादर केला आहे. IDEA चा हा प्लान 392 रुपयांचा आहे जो 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान अंतर्गत कंपनी 4G यूजर्सना एकूण 84जीबी डेटा देत आहे जो रोज 1जीबीच्या हिशोबाने यूजर्सच्या नंबर वर क्रेडिट होईल. या प्लान मध्ये वॉयस कॉल पण अनलिमिटेड फ्री दिले जात आहेत.

Vodafone

वोडाफोन पण आपल्या यूजर्सना 3G नेटवर्क वरून 4G नेटवर्क वर नंबर अपग्रेड केल्यावर अतिरिक्त बेनिफिट देत आहे ज्यात फ्री इंटरनेट डेटाचा समावेश आहे. Vodafone ने 4G नेटवर्क वर अपग्रेड करणाऱ्या प्रीपेड कस्टमर्सना 4जीबी 4G इंटरनेट डेटा दिला जात आहे. हा डेटा पूर्णपणे मोफत असेल जो 10 दिवसांत वापरावा लागेल. त्याचप्रमाणे पोस्टपेड नंबर वर 4G अपग्रेड करणाऱ्या यूजर्सना पुढच्या बिल साइकल मध्ये 4जीबी अतिरिक्त 4G डेटा मिळेल.

BSNL

देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड बद्दल बोलायचे तर हि कंपनी पण 3G नंबर 4G नेटवर्क वर अपग्रेड केल्यावर अतिरिक्त बेनिफिट देत आहे. बीएसएनएल यूजर्सना 2जीबी अतिरिक्त 4G इंटरनेट डेटा देत आहे. विशेष म्हणजे बीएसएनएल चा नवीन 4G सिम विकत घेण्यासाठी ग्राहकांना 20 रुपये दयावे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here