बंद होत आहे MNP सर्विस, सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कधी आणि कशाप्रकारे करता येईल दुसऱ्या कंपनीत नंबर पोर्ट

इंडियन टेलीकॉम कंपन्या मोबाईल यूजर्सना आकर्षित करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ग्राहक टिकवण्यासाठी नवनवीन व आर्कषक प्लान्स घेऊन येतात, पण तरीही भारतात मोबाईल नंबर पोर्टेबलिटी सर्विसचा वापर खूप जास्त केला जातो. काही भारतीय यूजर आपल्या सर्विस प्रोवाइडरमुळे नाखुश आहेत तर काही ग्राहकांना दुसऱ्या कंपनीचे आकर्षक प्लान्स हवे असतात. भारतात Mobile Number Portability म्हणजे MNP लवकरच नवीन रूप घेणार आहे. MNP ची हि नवीन प्रणाली तयार झाली आहे पण तिचा लाभ घेण्याआधी यूजर्सना थोडी वाट बघावी लागेल. स्पष्ट बोलायचे झाले तर आज म्हणजे 4 नोव्हेंबर पासून 11 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण देशात MNP सर्विस बंद केली जात आहे.

टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAI ने देशात मोबाईल नंबर पोर्टेबलिटी सर्विस बदलण्याची घोषणा केली आहे. TRAI च्या आदेशाचे पालन देशातील सर्व टेलीकॉम कंपन्यांना करावे लागेल. ट्राईच्या निर्णयानंतर भारतात MNP सर्विसचा चेहरामोहरा बदलून जाईल पण त्याआधी Reliance Jio, Bharti Airtel तसेच Vodafone Idea सहित BSNL च्या उपभोक्त्यांना काही काळ आपला नंबर पोर्ट करता येणार नाही.

आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ही सर्विस बंद

TRAI च्या आदेशानुसार आज म्हणजे 4 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच देशात मोबाईल नंबर पोर्टेबलिटी बंद केली होईल. पण हि बंदी काही काळासाठी आहे जी 11 नोव्हेंबरला उठवली जाईल. 4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत कोणताही यूजर MNP अंतर्गत आपला नंबर दुसऱ्या नेटवर्क वर पोर्ट करू शकणार नाही. लक्षात असू दे कि ज्या युजर्सना 4 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्याच्या आधी आपल्या फोन मधून पोर्ट मेसेज पाठवून UPC कोड जेनरेट केला आहे त्यांच्यासाठी MNP सर्विस चालू राहील.

पोर्ट प्रक्रियेबद्दल बोलायचे तर आपला नंबर दुसऱ्या कपंनीत पोर्ट करण्यासाठी 1900 वर आपल्या नंबर सह अशी PORT 91xxxxx पोर्ट रिक्वेस्ट पाठवावी लागत होती. हा मेसेज केल्यानंतर ऑपरेटर कडून UPC कोड पाठवला जायचा, जो काही दिवसांसाठी वैध असायचा आणि मग एक्सपायर व्हायचा. हा UPC कोड दुसऱ्या नेटवर्क ऑपरेटरला दाखवून त्या कंपनीत नंबर पोर्ट व्हायचा. पण आता 11 नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही यूजरला PORT रिक्वेस्ट पाठवून UPC कोड मिळणार नाही. हि सर्विस 11 नोव्हेंबर नंतर पुन्हा सुरु होईल.

फक्त 2 दिवसांत होईल नंबर पोर्ट

आता पर्यंत आपला नंबर पोर्ट करण्यासाठी यूजरला साधारणतः एका आठवड्यची वाट बघावी लागत होती. पण आता TRAI च्या नवीन नियमांतर्गत सर्व कंपन्यांना असा आदेश दिला जाणार आहे कि नंबर पोर्ट करण्याच्या प्रक्रियाच वेळ 7 दिवसांच्या ऐवजी फक्त 2 दिवस केला जावा. TRAI येत्या 11 नोव्हेंबरला आपले नवीन दिशानिर्देश आणि नियम सार्वजनिक करणार आहे. आणि त्यानंतर भारतात MNP सर्विस मध्ये मोठा बदल मिळेल.

रिंग टाईमची मर्यादा झाली 30 सेकंद

तुम्हाला सांगू इच्छितो कि TRAI ने सर्व ऑपरेटर्स साठी 30 सेकंदांची रिंग टाइम निर्धारित केली आहे. मागे झालेल्या टेलीकॉम जगातील उलथापालथानंतर ट्राई ने नवीन नियम जाहीर करून सर्व कंपन्यांना रिंग टाईम 30 सेकंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ट्राईचा हा निर्णय Reliance Jio, Bharti Airtel, Vodafone Idea आणि BSNL सर्वांना पाळावा लागेल तसेच हा नियम इनकमिंग आणि आउटगोइंग दोन्ही कॉल्स वर लागू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here