Infinix Smart 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 13:03:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6000mAh ची अवाढव्य बॅटरी! 7,299 रुपयांमध्ये Infinix Smart 7 भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-smartphone-infinix-smart-7-launched-price-india-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-smartphone-infinix-smart-7-launched-price-india-specifications/#respond Wed, 22 Feb 2023 07:34:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18048 Infinix नं भारतात आपला नवा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Infinix Smart 7 सादर केला आहे. यात Unisoc SC9863A1 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात HD+ डिस्प्ले, 500nits पीक ब्राईटनेस, 6000mAh ची बॅटरी आणि 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीनं एवढे फिचर अत्यंत कमी किंमतीत सादर केले आहेत. चला जाणून घेऊया Infinix Smart 7 ची […]

The post 6000mAh ची अवाढव्य बॅटरी! 7,299 रुपयांमध्ये Infinix Smart 7 भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix Smart 7 मध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 500nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
  • फोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • यात 6000mAH ची विशाल बॅटरी टाइप सी चार्जिंग पोर्टसह मिळते.

Infinix नं भारतात आपला नवा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Infinix Smart 7 सादर केला आहे. यात Unisoc SC9863A1 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात HD+ डिस्प्ले, 500nits पीक ब्राईटनेस, 6000mAh ची बॅटरी आणि 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीनं एवढे फिचर अत्यंत कमी किंमतीत सादर केले आहेत. चला जाणून घेऊया Infinix Smart 7 ची भारतातील किंमत, उपलब्धता, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.

Infinix Smart 7 Price in India

Infinix Smart 7 चा एकच व्हेरिएंट भारतीय बाजारात दाखल झाला आहे. या फोनची किंमत 7,299 रुपये ठेवण्यात आली आहे आणि यात 4GB रॅमसह 64GB स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन 27 फेब्रुवारीपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल. कंपनीनं हा हँडसेट Azure Blue, Emerald Green आणि Night Black अशा तीन रंगात सादर केला आहे. हे देखील वाचा: रेडमी-पोकोला टक्कर देण्यासाठी रियलमी सज्ज; लो बजेटमध्ये येणार Realme C55 आणि Realme C33 2023

Infinix Smart 7 Specifications

  • 6.6″ HD+ display
  • 4GB+3GB RAM= 7GB RAM
  • Unisoc Spreadtrum SC9863A1
  • 13MP Dual Rear Camera
  • 6,000mAh battery

Infinix Smart 7 मध्ये 6.6-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो HD+ (1612 × 720 पिक्सल) रिजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 500nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी एक वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. तर मागच्या बाजूला वेव्ह पॅटर्नसह अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनल मिळतो. फोनचे वजन 207 ग्राम आहे आणि डायमेन्शन 75.63 × 164.2 × 9.37 एमएम आहेत.

प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Unisoc SC9863A1 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जोडीला ग्राफिक्ससाठी PowerVR GPU मिळतो. हा फोन 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. तसेच युजर गरज पडल्यास 3GB पर्यंत अतिरक्त व्हर्चुअल रॅम मिळून एकूण 7GB रॅमची पावर मिळवू शकतात. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित XOS 12 वर चालतो.

नवीन Smart 7 मोबाइल फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशकाह मुख्य कॅमेरा 13MP चा सेन्सर आहे, जोडीला 2MP ची सेकंडरी सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश देखील मिळतो. हे देखील वाचा: 1 मार्चला येतोय Vivo V27e; सीरिज मधील स्वस्त फोनमध्ये देखील दमदार फिचर

पावर बॅकअपसाठी Infinix Smart 7 मध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी मिळते, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक मिळतं. तर कनेक्टव्हिटीसाठी टाइप सी पोर्ट, ड्युअल सिम, 4G, WiFi 802.11 b/g/n, Bluetooth 4.2 आणि GPS चा सपोर्ट मिळतो. यात मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं स्टोरेज देखील वाढवता येते.

The post 6000mAh ची अवाढव्य बॅटरी! 7,299 रुपयांमध्ये Infinix Smart 7 भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-smartphone-infinix-smart-7-launched-price-india-specifications/feed/ 0
6,000mAh ची अवाढव्य बॅटरी पण किंमत 7 हजार; Infinix Smart 7 ची भारतीय लाँच डेट आली समोर https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-7-launch-date-in-india-22-february-known-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-7-launch-date-in-india-22-february-known-specifications/#respond Thu, 09 Feb 2023 10:34:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17673 स्वस्त स्मार्टफोन बनवणारा टेक ब्रँड इनफिनिक्स भारतीय बाजारात आपला आणखी एक लो बजेट मोबाइल फोन आणण्यासाठी तयार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की ते नवीन स्मार्टफोन Infinix Smart 7 भारतात लाँच करणार आहेत जो 22 फेब्रुवारीला मार्केटमध्ये येईल. लाँच डेट सोबतच इनफिनिक्स स्मार्ट 7 ची प्राइस आणि फोनचे अनेक महत्वाचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स देखील सांगितले […]

The post 6,000mAh ची अवाढव्य बॅटरी पण किंमत 7 हजार; Infinix Smart 7 ची भारतीय लाँच डेट आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix SMART 7 भारतात 22 फेब्रुवारीला लाँच होईल.
  • या फोनची किंमत 7,499 रुपये असू शकते.
  • इनफिनिक्स स्मार्ट 7 मध्ये 6,000एमएएचची बॅटरी दिली जाईल.
  • हा मोबाइल 6.6 इंचाच्या लार्ज डिस्प्लेला सपोर्ट करेल.

स्वस्त स्मार्टफोन बनवणारा टेक ब्रँड इनफिनिक्स भारतीय बाजारात आपला आणखी एक लो बजेट मोबाइल फोन आणण्यासाठी तयार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की ते नवीन स्मार्टफोन Infinix Smart 7 भारतात लाँच करणार आहेत जो 22 फेब्रुवारीला मार्केटमध्ये येईल. लाँच डेट सोबतच इनफिनिक्स स्मार्ट 7 ची प्राइस आणि फोनचे अनेक महत्वाचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स देखील सांगितले आहेत.

Infinix Smart 7 Price

इनफिनिक्स इंडियानं सांगितलं आहे की कंपनी येत्या 22 फेब्रुवारीला Infinix Smart 7 भारतात लाँच करेल. ‘स्मार्ट’ सीरीजमध्ये जोडल्या जाणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 7.5 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली जाईल, अशी माहिती इनफिनिक्सनं दिली आहे. आम्हाला आशा आहे की फोनची प्राइस 7,499 रुपये असेल. ही स्मार्ट 7 ची प्रारंभिक किंमत असू शकते तसेच मोठ्या व्हेरिएंटची किंमत 8 ते 9 हजारांत असू शकते. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 16GB RAM! भारतात गुपचूप सुरु झाली Vivo Y100 विक्री; कॅमेरा आहे जबरदस्त

Infinix Smart 7 Specifications

  • 6.6″ HD+ display
  • 6,000mAh battery
  • Dual Rear Camera
  • 4GB RAM + 64GB storage

Infinix Smart 7 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा मोठा एचडी+ रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात येईल. जो 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करेल. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल, अर्थात वरच्या बाजूला मध्यभागी ‘व्ही’ शेप नॉचमध्ये सेल्फी कॅमेरा पाहायला मिळेल. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर wave pattern डिजाइन असेल.

इनफिनिक्स स्मार्ट 7 भारतीय बाजारात 4 जीबी रॅमसह लाँच केला जाईल जोडीला 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा फोन एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंटमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. फोनची बॅटरी याची मोठी खासियत असेल. कंपनीनं सांगितलं आहे की Smart 7 स्मार्टफोन 6,000एमएएचच्या पावरफुल बॅटरीसह मार्केटमध्ये लाँच केला जाईल. त्याचबरोबर यात फास्ट चार्जिंग देखील मिळू शकते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमी नव्हे टेक्नो घालणार बजेटमध्ये धमाकूळ; येतोय स्वस्त आणि सुंदर Tecno Pop 7 Pro

Infinix Smart 7 फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनबद्दल कंपनीचा दावा आहे की हा Silver-ion spray कोटेड आहे जो 99 टक्क्यांपर्यंत अँटीबॅक्टीरियल आहे. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर फोनच्या बॅक पॅनलवर दिला जाईल. तर उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकरसह पावर बटन असेल.

The post 6,000mAh ची अवाढव्य बॅटरी पण किंमत 7 हजार; Infinix Smart 7 ची भारतीय लाँच डेट आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-7-launch-date-in-india-22-february-known-specifications/feed/ 0