लो बजेटमध्ये येऊ शकतात Realme C55 आणि Realme C33 2023

Highlights

  • Realme C55 आणि Realme C33 2023 भारतात लाँच होणार आहेत.
  • हे दोन्ही लो बजेट स्मार्टफोन 12 ते 15 हजार रुपयांमध्ये लाँच होऊ शकतात.
  • रियलमी सी33 2023 गेल्यावर्षी लाँच झालेल्या Realme C33 चा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असेल.

स्वस्त स्मार्टफोन्स बनवून भारतात लोकप्रिय झालेली रियलमी कंपनी एकीकडे हायएन्ड फ्लॅगशिपच्या जीवावर बाजारात आपला विस्तार करत आहे तर दुसरीकडे लो बजेट मोबाइल बनवून अधिक ग्राहकांना आकर्षित करत आहे. आता बातमी आली आहे की दोन नवीन स्वस्त रियलमी फोन Realme C55 आणि Realme C33 2023 लवकरच भारतात लाँच होऊ शकतात. या दोन्ही मोबाइल फोन्सच्या मेमरी व्हेरिएंटसह बरीच महत्वाची माहिती आली आहे.

Realme C55 आणि Realme C33 2023 संबंधित माहिती एका टेक वेबसाइटनं दिली आहे. सूत्रांच्या हवाल्याने या वेबसाइटनं सांगितलं आहे की रियलमी कंपनी भारतात दोन लो बजेट स्मार्टफोन्स सादर करण्यास तयार आहे जे रियलमी सी55 तथा रियलमी सी33 2023 नावानं लाँच होऊ शकतात. नावावरून समजलं असेल की रियलमी सी33 2023 मॉडेल गेल्यावर्षी लाँच झालेल्या Realme C33 चा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असू शकतो. हे देखील वाचा: Xiaomi 13 आणि 13 Pro ची किंमत लीक! 26 फेब्रुवारीला होणार भारतात लाँच

Realme C33 2023

रियलमी सी33 2023 स्मार्टफोनबद्दल रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की हा मोबाइल फोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. रिपोर्टनुसार हा रियलमी मोबाइल भारतात Aqua Blue, Night Sea आणि Sandy Gold कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Realme C55

रियलमी सी55 बाबत सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. यात 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजचा समावेश असू शकतो. तसेच कलर मॉडेल्स पाहता रिपोर्टनुसार हा रियलमी स्मार्टफोन भारतीय बाजारात Rainforest (Green), Rainy Night (black) आणि Sunshower (orange) कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

जुना Realme C33

  • 6.5″ HD+ LCD Display
  • 3GB RAM + 32GB Storage
  • Unisoc T612 Processor
  • 50MP Dual Rear Camera
  • 5,000mAh Battery

जुन्या रियलमी सी33 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे ज्यात 3GB RAM + 32GB Storage मिळते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 2.0 सह 1.82गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या Unisoc T612 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा मोबाइल ड्युअल सिम, 4जी एलटीई आणि 3.5एमएम जॅक सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

Realme C33 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. सिक्योरिटीसाठी याच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा रियलमी मोबाइल 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: कमी किंमतीत लाँच झाली ही किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 80km धावणार

Realme C33 फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.8 अपर्चर असलेली 0.3 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी सी33 मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here