भारतात गुपचूप सुरु झाली Vivo Y100 विक्री

Highlights

  • Vivo Y100 भारतात ऑनलाइन रिटेल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
  • फोनची विक्री ज्या राज्यांमध्ये Vivo Y75 4G स्टॉक संपला आहे तिथे केली जात आहे.
  • Vivo Y100 8GB RAM आणि MediaTek Dimensity 900 प्रोसेसरवर चालतो.

परवडणाऱ्या किंमतीत शानदार स्पेक्स देण्यासाठी विवोची वाय सीरिज ओळखली जाते. आता या सीरिजमध्ये Vivo Y100 ची एंट्री झाली आहे. विशेष म्हणजे हा फोन जरी भारतात उपलब्ध झाला असला तरी याची विक्री त्या राज्यांमध्ये केली जात आहे, जिथे Vivo Y75 4G चा स्टॉक संपला आहे. देशातील ऑनलाइन रिटेल स्टोर्सवरून विवो वाय100 स्मार्टफोन 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. संपूर्ण भारतात Vivo Y100 16 फेब्रुवारीपासून सेलसाठी उपलब्ध होईल.

Vivo Y100 Price

विवो वाय100 स्मार्टफोनमध्ये कंपनीनं 8GB RAM सह 128GB स्टोरेज दिली आहे, ज्याची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Color Changing AG Fluorite Glass डिजाईन असलेला हा स्मार्टफोन Twilight Gold, Pacific Blue आणि Metal Black कलरमध्ये विकत घेता येईल. 28 फेब्रुवारीपर्यंत हा विवो फोन ऑफर्स अंतगर्त आणखी स्वस्तात विकत घेता येईल. हे देखील वाचा: शानदार कॅमेऱ्यासह येतायत Vivo V27 आणि V27 Pro; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y100 Specifications

  • 6.38″ FHD+ 90Hz Display
  • 8GB + 8GB = 16GB RAM
  • MediaTek Dimensity 900
  • 64MP Triple Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 44W 4,500mAh Battery

विवो वाय100 स्मार्टफोनमध्ये 6.38 इंचाचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1300निट्स ब्राइटनेस, 360हर्ट्ज टच रिस्पांस रेट, 60000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 96% डीसीआई-पी3 कलर गामुटला सपोर्ट करतो. फोनच्या मागे असलेली Color Changing AG Fluorite Glass उन्हात गेल्यावर रंग बदलते.

Vivo Y100 अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बना मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेट ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये एआरएम माली जी68 जीपीयू आहे. हा विवो फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅमला सपोर्ट करतो जो इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून 16जीबी रॅमची ताकद देतो.

फोटोग्राफीसाठी विवो वाय100 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, ज्यात एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे ओआयएससह देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेन्स आणि तेवढ्याच अपर्चरसह 2 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सेन्सरला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 150km रेंज सह आली स्टायलिश Hop Oxo electric bike; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo Y100 ड्युअल सिम सपोर्टसह येतो, जोडीला 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील मिळतात. आयपी54 सर्टिफाइड असल्यामुळे हा फोन पाणी आमी धुळीपासून काही प्रमाणात सुरक्षित राहू शकतो. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 4,500एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here