1 मार्चला येऊ शकतो येणार Vivo V27e; कंपनीचं दिली माहिती

Highlights

  • Vivo V27e’s ची डिजाईन समोर आली आहे.
  • या फोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट मिळेल.
  • Vivo V27 series मध्ये तीन स्मार्टफोन सादर केले जातील.

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo येत्या 1 मार्चला जागतिक बाजारात Vivo V27 series सादर करणार आहे, जी भारतात देखील येईल. या सीरिजमध्ये Vivo V27e स्मार्टफोनचा देखील समावेश असेल. कंपनीनं आपल्या आगामी स्मार्टफोनसाठी एक मायक्रोसाइट बनवली आहे, जिथून आगामी Vivo V27e स्मार्टफोनच्या डिजाईन आणि काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हा स्मार्टफोन Vivo V27 आणि Vivo V27 Pro सोबत लाँच केला जाईल. चला या स्मार्टफोनची इतर माहिती जाणून घेऊया.

Vivo V27e चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

अपकमिंग Vivo V27e ची संपूर्ण डिजाईन या मायक्रोसाईटवरून समोर आली आहे. V27 Pro मध्ये कर्व 3डी स्क्रीन मिळू शकते परंतु यात एक फ्लॅट स्क्रीन असू शकते, जिच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंचहोल दिला जाऊ शकतो. प्रो व्हर्जन सारखा कॅमेरा सेटअप यात देखील मिळू शकतो, ज्यात रिंग शेप एलईडी फ्लॅश मिळू शकतो. हा फोन फक्त 7.8 एमएम जाड आहे आणि याचे वजन 186 ग्राम असू शकतं. हे देखील वाचा: कमी किंमतीत लाँच झाली ही किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 80km धावणार

बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64MP चा अल्ट्रा सेन्सिंग कॅमेरा आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन मिळू शकतं, ज्यामुळे कमी प्रकाशात देखील चांगले फोटोज येऊ शकतात. प्रो मॉडेलप्रमाणे Vivo V27e मध्ये देखील एक ऑरा लाइट फिचर देण्यात आलं आहे, जे रात्रीच्या वेळी पोट्रेट काढल्यास चांगल्या रिजल्ट्ससाठी स्टुडिओसारखी लायटिंग मिळू शकते.

लिक्सनुसार Vivo V27e मध्ये 6.5-इंचाचा ई4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. तर गुगल प्ले कन्सोलच्या डेटाबेसनुसार या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच यात पवार बॅकअपसाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकतो. हे देखील वाचा: रेडमी-पोकोला टक्कर देण्यासाठी रियलमी सज्ज; लो बजेटमध्ये येणार Realme C55 आणि Realme C33 2023

Vivo V27 Price

लीकमध्ये Vivo V27 आणि Vivo V27 Pro ची किंमत शेयर करण्यात आली आहे. वी27 ची प्राइस 35,000 रुपयांच्या आसपास असू शकते. तसेच प्रो मॉडेलबद्दल सांगण्यात आलं आहे की हा 8 जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो, जोडीला 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. या फोनची प्रारंभिक किंमत 40 हजार रुपयांच्या आसपास असल्याच असू शकते. V27e ची किंमत समोर आली नसली तरी हा या सीरिजमधील सर्वात स्वस्त फोन असू शकतो आणि याची किंमत 30 हजारांच्या आसपास असू शकते, असा अंदाज लावला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here