6000mAh ची अवाढव्य बॅटरी! 7,299 रुपयांमध्ये Infinix Smart 7 भारतात लाँच

Highlights

  • Infinix Smart 7 मध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 500nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
  • फोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • यात 6000mAH ची विशाल बॅटरी टाइप सी चार्जिंग पोर्टसह मिळते.

Infinix नं भारतात आपला नवा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Infinix Smart 7 सादर केला आहे. यात Unisoc SC9863A1 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात HD+ डिस्प्ले, 500nits पीक ब्राईटनेस, 6000mAh ची बॅटरी आणि 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीनं एवढे फिचर अत्यंत कमी किंमतीत सादर केले आहेत. चला जाणून घेऊया Infinix Smart 7 ची भारतातील किंमत, उपलब्धता, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.

Infinix Smart 7 Price in India

Infinix Smart 7 चा एकच व्हेरिएंट भारतीय बाजारात दाखल झाला आहे. या फोनची किंमत 7,299 रुपये ठेवण्यात आली आहे आणि यात 4GB रॅमसह 64GB स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन 27 फेब्रुवारीपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल. कंपनीनं हा हँडसेट Azure Blue, Emerald Green आणि Night Black अशा तीन रंगात सादर केला आहे. हे देखील वाचा: रेडमी-पोकोला टक्कर देण्यासाठी रियलमी सज्ज; लो बजेटमध्ये येणार Realme C55 आणि Realme C33 2023

Infinix Smart 7 Specifications

  • 6.6″ HD+ display
  • 4GB+3GB RAM= 7GB RAM
  • Unisoc Spreadtrum SC9863A1
  • 13MP Dual Rear Camera
  • 6,000mAh battery

Infinix Smart 7 मध्ये 6.6-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो HD+ (1612 × 720 पिक्सल) रिजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 500nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी एक वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. तर मागच्या बाजूला वेव्ह पॅटर्नसह अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनल मिळतो. फोनचे वजन 207 ग्राम आहे आणि डायमेन्शन 75.63 × 164.2 × 9.37 एमएम आहेत.

प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Unisoc SC9863A1 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जोडीला ग्राफिक्ससाठी PowerVR GPU मिळतो. हा फोन 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. तसेच युजर गरज पडल्यास 3GB पर्यंत अतिरक्त व्हर्चुअल रॅम मिळून एकूण 7GB रॅमची पावर मिळवू शकतात. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित XOS 12 वर चालतो.

नवीन Smart 7 मोबाइल फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशकाह मुख्य कॅमेरा 13MP चा सेन्सर आहे, जोडीला 2MP ची सेकंडरी सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश देखील मिळतो. हे देखील वाचा: 1 मार्चला येतोय Vivo V27e; सीरिज मधील स्वस्त फोनमध्ये देखील दमदार फिचर

पावर बॅकअपसाठी Infinix Smart 7 मध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी मिळते, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक मिळतं. तर कनेक्टव्हिटीसाठी टाइप सी पोर्ट, ड्युअल सिम, 4G, WiFi 802.11 b/g/n, Bluetooth 4.2 आणि GPS चा सपोर्ट मिळतो. यात मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं स्टोरेज देखील वाढवता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here