JioPhone 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जियो यूजर्स साठी पुन्हा आली वाईट बातमी, कंपनीने बंद केला 49 रुपयांचा प्लान https://www.91mobiles.com/marathi/jiophone-introduce-new-recharge-packs-and-discontinued-rs-49-prepaid-plan/ https://www.91mobiles.com/marathi/jiophone-introduce-new-recharge-packs-and-discontinued-rs-49-prepaid-plan/#respond Thu, 12 Dec 2019 09:03:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6038 आता याच्या रिचार्जची सुरवात 75 रुपयांपासून होत आहे.

The post जियो यूजर्स साठी पुन्हा आली वाईट बातमी, कंपनीने बंद केला 49 रुपयांचा प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने काही दिवसांपूर्वी आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवल्या होत्या. पण JioPhone Plans च्या किंमतीत कोणतीही वाढ केली नव्हती. परंतु आता रिलायंस जियोने जियोफोनच्या प्लान्सची किंमत वाढवण्याऐवजी आपला जुना किफायतशीर 49 रुपयांचा JioPhone रिचार्ज प्लान बंद केला आणि आता याच्या रिचार्जची सुरवात 75 रुपयांपासून होत आहे.

काही आठवड्यांपूर्वी जियोने JioPhone यूजर्स साठी ऑल-इन-वन (All-in-One) प्लान्स सादर केले होते आणि 75 रुपयांचा प्लान त्यातील एक आहे. जुन्या 49 रुपयांच्या प्लान व्यतिरिक्त 99 रुपये, 153 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांचे दुसरे प्लान्स पण आहेत. पण JioPhone यूजर्सना नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळा IUC टॉप-अप रिचार्ज करावा लागेल.

75 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर यात यूजर्सना अनलिमिटेड जियो-टू-जियो वॉइस कॉलिंग, 500 मिनिट्स नॉन-जियो कॉल्स, प्रति दिन 100 MB डेटा आणि कुल 50 SMS मिळतात. इतकेच नव्हे तर या प्लानची वैधता 28 दिवस आहे.

49 रुपयांचा प्लान घेणाऱ्या जियो फोन यूजर्सना नॉन-जियो मिनिट्स साठी अतिरिक्त पैसे द्यावे लागत होते आणि आता हा प्लान बंद करण्यात आला आहे. तसेच 75 रुपयांच्या प्लान मध्ये दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग साठी 500 मिनिट्स मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने JioPhone ऑल-इन-वन रिचार्ज सादर केले होते, ज्यात 75 रुपये, 125 रुपये, 155 रुपये आणि 185 रुपयांच्या प्लान्सचा समावेश होता.

125 रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचे तर यात अनलिमिटेड वॉयस कॉलिंग (500 मिनिट्स दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग साठी), 300 SMS आणि 500MB डेटा प्रतिदिन मिळतो. तर 155 रुपयांच्या प्लान मध्ये डेली 1GB डेटा, अनलिमिटेड जियो-टू-जियो (500 मिनिट्स ऑफ-नेट कॉल) आणि 100 SMS प्रतिदिन मिळतात. 185 रुपयांच्या प्लान मध्ये 2GB हाई-स्पीड डेटा प्रतिदिन, 500 मिनिट्स नॉन-जियो कॉलिंग, अनलिमिटेड जियो-टू-जियो आणि लँडलाईन कॉल आणि 100 SMS प्रतिदिन मिळतात. सर्व JioPhone All-in-One प्लानची वैधता 28 दिवस आहे.

The post जियो यूजर्स साठी पुन्हा आली वाईट बातमी, कंपनीने बंद केला 49 रुपयांचा प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jiophone-introduce-new-recharge-packs-and-discontinued-rs-49-prepaid-plan/feed/ 0
JioPhone यूजर्सना मिळाली दिवाळीची भेट, नवीन प्लान मध्ये मिळेल फ्री कॉलिंग https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-new-recharges-with-500-minutes/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-new-recharges-with-500-minutes/#respond Fri, 25 Oct 2019 11:41:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5593 आता कंपनीने JioPhone साठी पण ‘All-in-One’ प्लान सादर केला आहे. चला पुढे जाणून घेऊया या प्लान्सबद्दल सर्वकाही.

The post JioPhone यूजर्सना मिळाली दिवाळीची भेट, नवीन प्लान मध्ये मिळेल फ्री कॉलिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियोने 6 पैसे/मिनिट IUC चार्ज लावल्यामुळे अनेकांनी प्रश्न उठवले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात रिलायंस जियोने स्मार्टफोनसाठी ‘All-in-One’ प्रीपेड प्लानची घोषणा केली होती. तर आता कंपनीने JioPhone साठी पण ‘All-in-One’ प्लान सादर केला आहे. चला पुढे जाणून घेऊया या प्लान्सबद्दल सर्वकाही.

कंपनीने जारी केलेले हे प्लान चार प्रकारचे आहेत. यात 75 रुपये, 125 रुपये, 155 रुपये आणि 185 रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. या सर्व प्लान्स मध्ये अनलिमिटेड जियो ते जियो कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच यात नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळे मिनिट्स देण्यात आले आहेत. पुढे प्लानबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहोत.

75 रुपयांचा प्लान

जियोच्या ऑल इन वन प्लानच्या पहिल्या आणि सर्वात स्वस्त 75 रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचे तर यात यूजर्सना 28 दिवसांची वैधता मिळते. या वैधतेसाठी 3जीबी डेटा दिला जात आहे, ज्यात 100एमबी डेटा रोज मिळेल. प्लान्स मध्ये अनलिमिटेड जियो ते जियो कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच यात नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळे 500 मिनिट्स मिळतील.

125 रुपयांचा प्लान

या प्लान मध्ये पण यूजर्सना अनलिमिटेड जियो टू जियो कॉलिंगची सुविधा मिळत आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे, ज्यात 14जीबी डेटा दिला जाईल. या प्लान मध्ये डेली 500एमबी डेटा वापर करण्यासाठी मिळेल. यात नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळे 500 मिनिट मिळतील.

155 रुपयांचा प्लान

इतर दोन्ही प्लान प्रमाणेच या प्लान मध्ये पण यूजर्सना अनलिमिटेड जियो टू जियो कॉलिंगची सुविधा मिळत आहे आणि या प्लानची वैधता पण 28 दिवसांची आहे. या वैधतेमध्ये यूजर्सना 28जीबी डेटा दिला जाईल. सोबत या प्लान मध्ये डेली 1जीबी डेटा वापर करण्यासाठी मिळेल. यात नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळे 500 मिनिटे मिळतील.

185 रुपयांचा प्लान

185 रुपयांचा प्लान पाहता यात पण सर्व प्लान प्रमाणे मिळणारे बेनिफिट्स जवळपास तेच आहेत. यात मिळणारा डेटा थोडा जास्त आहे. 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लान मध्ये यूजर्सना एकूण 56जीबी डेटा दिला जाईल. प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 2जीबी डेटा मिळेल. या प्लान मध्ये पण यूजर्सना अनलिमिटेड जियो टू जियो कॉलिंगची सुविधा मिळत आहे. यात नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळे 500 मिनिट्स मिळतील.

रिलायंस जियोफोन वीडियो

The post JioPhone यूजर्सना मिळाली दिवाळीची भेट, नवीन प्लान मध्ये मिळेल फ्री कॉलिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-new-recharges-with-500-minutes/feed/ 0
लॉन्च झाला जियोरेल ऍप, घर बसल्या बुक होईल तिकीट आणि मिळेल संपूर्ण माहिती अगदी मोफत https://www.91mobiles.com/marathi/jio-jiorail-app-launched-for-jiophone-and-jiophone-2-users-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-jiorail-app-launched-for-jiophone-and-jiophone-2-users-in-marathi/#respond Mon, 28 Jan 2019 09:52:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3472 आता आपल्या यूजर्सना अजून चांगली सुविधा देत रिलायंस जियो ने ‘जियोरेल’ ऍपची सुरवात केली आहे.

The post लॉन्च झाला जियोरेल ऍप, घर बसल्या बुक होईल तिकीट आणि मिळेल संपूर्ण माहिती अगदी मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो जेवढ्या वेगाने भारतीय बाजारात प्रगती केली आहे तेवढा वेग क्वचतीचं इतर टेलीकॉम कंपनीचा असेल. अनेक हिने फ्री इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा देणाऱ्या जियो मुळे आज भारतीय टेलीकॉम बाजारात सर्व सेवा स्वस्त झाल्या आहेत. टेलीकॉम विश्वात प्रथम स्थान मिळवल्यानंतर जियो ने 4जी फीचर फोन लॉन्च करून मोबाईल बाजारात पण यश मिळवले. आता आपल्या यूजर्सना अजून चांगली सुविधा देत रिलायंस जियो ने ‘जियोरेल’ ऍपची सुरवात केली आहे.

नावावरूनच समजले असेल कि जियोरेल ऍप रेल्वे संबंधित सुविधांसाठी लॉन्च करण्यात आलेले आहे. जियोरेल ऍप मधून यूजर्स एका क्लिक वर घर बसल्या तिकीट बुक करू शकतात. इतकेच नव्हे तर तिकीट कॅन्सल, वेटिंग लिस्ट ची माहिती, पीएनआर स्टेटस, तत्काल तिकीट, ट्रेनचे रनिंग स्टे्टस इत्यादी सुविधा पण जियोरेल ऍप वर मोफत मिळतील. जियोरेल ऍप भारतीय रेल्वे विभागाद्वारा देण्यात येणार सर्व सुविधा आपल्या यूजर्स पर्यंत पोहचवत आहे.

जियोरेल ऍप डिजीटल इंडिया मधील मोठे पाउल आहे जो गावागावात इंटरनेटच्या माध्यमातून भारत सरकारच्या सेवा अगदी मोफत देत आहे. जियोरेल ऍप मधून स्टेशन वर न जाता तसेच मोठ्या रांगेत न लागता मोबाईल वर ट्रेनचे टाईमिंग, ट्रेनचा रूट, ट्रेन मधील सीट्सची माहिती मिळेल. ई-वॉलेट तसेच बँक कार्डच्या माध्यमातून जियोरेल ऍप ने तिकीट चे पेमेंट पण केले जाऊ शकते. तसेच तिकीट रद्द करून ऑनलाइन पैसे परत पण मिळवता येतील.

विशेष म्हणजे जियोरेल ऍप सध्या कंपनीच्या 4जी फीचर फोन जियोफोन आणि जियोफोन 2 मधेच इंस्टाल करून वापरता येईल. हा ऍप जियो ऍप स्टोर मधून डाउनलोड केला जाऊ शकतो. अशा आहे कि ​कंपनी येत्या काळात हा ऍप एंडरॉयड तसेच आईओएस वर पण सादर करेल.

The post लॉन्च झाला जियोरेल ऍप, घर बसल्या बुक होईल तिकीट आणि मिळेल संपूर्ण माहिती अगदी मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-jiorail-app-launched-for-jiophone-and-jiophone-2-users-in-marathi/feed/ 0
जियोफोन 2 साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, मिळेल 200 रुपयांचा कॅशबॅक पण https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiophone-2-open-sale-diwali-offer-paytm-rs200-cashback-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiophone-2-open-sale-diwali-offer-paytm-rs200-cashback-in-marathi/#respond Mon, 05 Nov 2018 11:10:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2793 जियोफोन 2 आज दुपारी 12 वाजल्यापासून कंंपनीच्या वेबसाइट वर सेल साठी उपलब्ध झाला आहे.

The post जियोफोन 2 साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, मिळेल 200 रुपयांचा कॅशबॅक पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने एकीकडे टेलीकॉम बाजारात आपल्या 4जी सर्विस व स्वस्त प्लान्स ने हलचल निर्माण केली आहे. तर दुसरीकडे फीचर फोन बाजारात पण जियोफोन मुळे कंपनी नंबर वन बनली आहे. गेल्या वर्षी जियोफोनच्या यशानंतर कंपनी यावर्षी जियोफोन 2 घेऊन आली आहे आणि हा फोन पण जियोच्या प्रगतीत भर घालत आहे. जियोफोन आता पर्यंत फक्त फ्लॅश सेल मध्येच विकला जात होता, पण दिवाळीच्या निमित्ताने कंपनीने हा शानदार 4जी फीचर फोन ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे.

जियो ने आपल्या फॅन्सना दिवाळीची भेट देत जियोफोन 2 ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे. रिलायंस जियो ने जियोफोन 2 ​कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वरच ओपन सेल अंर्तगत विकला जात आहे. आता पर्यंत फोन फक्त फ्लॅश सेल मध्येच विकला जात होता आणि सेल सुरु होताच काही मिनिटांत स्टॉक आउट होत असे. पण आज पासून हा फोन ओपन सेल साठी उपलब्ध झाला आहे. ओपन सेल अंतर्गत जियो फॅन कधीपण हा फोन कोणत्याही रजिस्ट्रेशन विना आॅनलाईन विकत घेऊ शकता.

जियोफोन 2 आज दुपारी 12 वाजल्यापासून कंंपनीच्या वेबसाइट वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. पहिल्यांदाच जियोफोन 2 फ्लॅश सेल ऐवजी ओपन सेल मध्ये विकला जात आहे. जियो ने हा खास सेल 8 दिवसांसाठी आयोजित केला आहे जो आज 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत चालेल. या 8 दिवसांत तुम्ही कधीही कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वर जाऊन जियोफोन 2 विकत घेऊ शकता.

असा विकत घ्या जियोफोन 2

जियोफोन 2 कंपनीने 2,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जियोच्या दिवाळी स्पेशल सेल मध्ये हा फोन याच किंमतीती सेल साठी उपलब्ध होईल. कंपनी जियोफोन 2 च्या खरेदीवर पेटीएम कॅशबॅक आॅफर पण देत आहे. जियो डॉट कॉम वरून जियोफोन 2 विकत घेताना जर पेटीएम वॉलेट ने पेमेंट केले तर यूजर्सना 200 रुपयांची पेटीएम कॅश मिळेल, या पेटीएम कॅशचा वापर कोणत्याही ट्रांजेक्शन मध्ये करता येईल.

विशेष म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने रिलायंस जियो ने जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड पण लॉन्च केला आहे. या स्पेशल आॅफर अंतर्गत फक्त 1095 रुपयांमध्ये 1,500 रुपयांचा जियोफोन 594 रुपयांच्या ​अतिरिक्त रिचार्ज बेनिफिट सह विकत घेता येईल. म्हणजे 1500 रुपयांचा फोन आणि 594 रुपयांचा रिचार्ज फक्त 1,095 रुपयांमध्ये. या फेस्टिवल गिफ्ट कार्ड सोबत जियोफोन आॅनलाइन स्टोर अमेझॉन इंडिया, रिलायंस डिजिटल स्टोर आणि रिलायंस फ्रेश सहित इतर कंपनी स्टोर वरून विकत घेता येईल.

जियोफोन 2 ओपन सेल मध्ये विकत घेण्यासाठी (इथे क्लिक करा)
जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड चे डिटेल्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post जियोफोन 2 साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, मिळेल 200 रुपयांचा कॅशबॅक पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jiophone-2-open-sale-diwali-offer-paytm-rs200-cashback-in-marathi/feed/ 0
जियोफोनला टक्कर देईल नोकिया, घेऊन येत आहे नवीन 4जी फीचर फोन https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-mat-launch-new-nokia-4g-feature-phones-after-nokia-8110-4g-jio-phone-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-mat-launch-new-nokia-4g-feature-phones-after-nokia-8110-4g-jio-phone-in-india-in-marathi/#respond Wed, 24 Oct 2018 12:20:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2621 नोकिया 8110 4जी आल्यामुळे रिलायंसच्या जियोफोन आणि जियोफोन 2 ला थेट टक्कर मिळणार आहे.

The post जियोफोनला टक्कर देईल नोकिया, घेऊन येत आहे नवीन 4जी फीचर फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने याच महिन्यात भारतीय मोबाईल बाजारात आपला 4जी फीचर फोन नोकिया 8110 लॉन्च केला आहे. हा शानदार फोन आज पासून देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे. नोकिया 8110 4जी 22 वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या नोकिया 8110 मॅट्रिक्सचे नवे स्वरूप आहे. नवीन नोकिया 8110 भारतात लॉन्च झालेला कंपनीचा पहिला 4जी फीचर फोन आहे. पण अशीही बातमी येत आहे कि नोकिया लवकरच यांची संख्या वाढवणार आहे आणि येत्या काही दिवसांत अजून 4जी फीचर फोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे,

नोकिया चे मालकी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल चे इंडिया वाइस प्रेजीडेंट अजय मेहता यांनी नोकियाच्या योजनेचा खुलासा केला आहे. हि माहिती अजय मेहता यांनी डीएनए इंडिया सोबत झालेल्या मुलाखतीती दिली. डीएनएच्या रिपोर्ट नुसार नोकिया ब्रांड नोकिया 8110 4जी भारतात लॉन्च केल्यानंतर अजून पण 4जी फीचर फोन देशात आणू इच्छित आहे. नोकियाचे हे नवीन 4जी फीचर फोन लवकरच बाजारात येतील.

विशेष म्हणजे रिलायंस जियो ने लॉन्च केलेले जियोफोन आणि जियोफोन 2 भारतातील फीचर फोन बाजारात नंबर वन आहेत. हे असे फीचर फोन आहेत जे 4जी कनेक्टिविटी सह येतात आणि देशाच्या फीचरफोन बाजारावर राज्य करतात. नोकिया 8110 4जी आल्यामुळे रिलायंसच्या जियोफोन आणि जियोफोन 2 ला थेट टक्कर मिळणार आहे. इंडियन मार्केट मध्ये जियो ने आपला दबदबा आधीच बनवला असल्यामुळे नोकिया 8110 साठी हि स्पर्धा सोप्पी नसेल.

जियोशी स्पर्धा करण्यासाठी आणि इंडियन फीचर फोन बाजारात आपले नाव कमावण्यासाठी नोकिया येत्या काळात नवीन 4जी फीचर फोन घेऊन येऊ इच्छित आहे. किंमतीच्या बाबतीत जियोफोन आणि जियोफोन 2 नोकिया 8110 4जी पेक्षा स्वस्त आहेत तसेच या 4जी फीचर फोनला नेटवर्क कनेक्टिविटी साठी एखाद्या टेलीकॉम आॅपरेटरची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे भारतीय फीचर फोन बाजारात नोकियाला अडचणी येऊ शकतात.

नोकिया 8110 4जी फीचर फोन पाहता हा फोन आज पासून देशात सेल साठी उपलब्ध होणार आहे. हा फोन आॅनलाईन प्लेटफॉर्म सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल. नोकिया 8110 4जी ची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन जियो इंटीग्रेशन सह येतो ज्यामुळे फोन मध्ये जियोचा नंबर वापरल्यास ग्राहकांना 544जीबी 4जी डेटा मोफत मिळेल.

The post जियोफोनला टक्कर देईल नोकिया, घेऊन येत आहे नवीन 4जी फीचर फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hmd-global-mat-launch-new-nokia-4g-feature-phones-after-nokia-8110-4g-jio-phone-in-india-in-marathi/feed/ 0
जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वापरताना सावधान, या समस्या येतील समोर https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-problem-in-jio-phone-tips-and-tricks-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-problem-in-jio-phone-tips-and-tricks-in-marathi/#respond Tue, 11 Sep 2018 15:23:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2035 जियोफोन मध्ये व्हाट्सॅप तर आला आहे पण त्यात काही मर्यादा आहेत ज्यांचा सामना जियोफोन यूजर्सना करावा लागेल.

The post जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वापरताना सावधान, या समस्या येतील समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने गेल्याच महिन्यात आपला दुसरा 4जी फीचर फोन जियोफोन 2 भारतीय मोबाईल बाजारात सादर केला आहे. जियोफोन 2 सोबत रिलायंस कंपनी ने घोषणा केली होती की जियोफोन वर पण व्हाट्सॅप वापरता येईल. त्यानुसार जियो ने जियोफोन वर व्हाट्सॅप सादर केला आहे. जियोफोन मध्ये पण आता व्हाट्सॅप इंस्टाल होऊ शकतो आणि जियोफोन यूजर्स आपल्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी चॅटिंग करू शकतात. जियो ने जियोफोन मध्ये व्हाट्सॅप आणून आपल्या यूजर्सना आनंद तर दिला आहे पण हा आनंद मर्यादित असेल. म्हणजे जियोफोन मध्ये व्हाट्सॅप तर आला आहे पण त्यात काही मर्यादा आहेत ज्यांचा सामना जियोफोन यूजर्सना करावा लागेल.

जियोफोन मध्ये व्हाट्सॅप म्हणजे आनंदाची बातमी पण जियोफोन यूजर्स साठी व्हाट्सॅप वापरण्याचा अनुभव इतर स्मार्टफोन्स इतका चांगला नसेल. विशेष म्हणजे जियोफोन काईओएस आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो आणि यातील व्हाट्सॅप पण खासकरून काईओएस साठी बनवण्यात आला आहे. जियोफोन मध्ये व्हाट्सॅप कसे इंस्टाल करावे हे जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा). जर तुम्ही पण जियोफोन वापरत असाल तर लक्षात घ्या की या 4जी फीचर फोन मध्ये व्हाट्सॅप वापरताना तुम्ही निराश होऊ शकता.

1.
जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वर चॅटिंग होईल पण यूजर वॉयस कॉल किंवा वीडियो कॉल करू शकणारा नाहीत. म्हणजे यूजर्स टेक्स्ट लिहून किंवा वॉईस रेकॉर्ड करून मेसेज पाठवू शकतात पण वॉयस कॉल आणि वीडियो कॉल करू शकणार नाहीत.

2.
त्याचप्रमाणे दुसर्‍या स्मार्टफोन वाल्या व्हाट्सॅप यूजरने जियोफोन वाल्या व्हाट्सॅप नंबर वर वॉयस किंवा वीडियो कॉल केला तर तो कॉल पण कनेक्ट होणार नाही. दुसर्‍या यूजरला कॉल फेल दाखवण्यात येईल.

3.
व्हाट्सॅप चा स्टेट्स फीचर खुप प्रसिद्ध आहे, ज्यात 24 तासांसाठी फोटो किंवा वीडियो दिसतो. पण जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वर तुम्ही स्वतःचा स्टेटस ठेऊ शकणार नाही तसेच इतरांचे स्टेट्स बघू पण शकणार नाही. हे खुप निराशाजनक आहे.

4.
व्हाट्सॅप वर मीडिया फाइल्स पाठवल्या जातात. जियोेफोन मध्ये ईमेज आणि वीडियो सेंड करता येतील पण यूजर्स यात जीफ फाईल, पीडीएफ तसेच डाक्यूमेंट फाइल्स शेयर करू शकणार नाहीत. यातून फक्त फोटो आणि वीडियो सेंड आणि रिसीव केले जाऊ शकतात.

5.
व्हाट्सॅप ने वेब व्हाट्सॅप फीचर सुरू केला आहे. या फीचर मुळे लॅपटॉप किंवा कम्प्यूटर वर काम करताना यूजर कंम्प्यूटर वर व्हाट्सॅप यूज करू शकतात. त्यामुळे वारंवार फोन हातात घ्यावा लागत नाही. पण जियोफोन यूजर्सना इथे पण जास्त मेहनत करावी लागेल. जियोफोन च्या व्हाट्सॅप मध्ये वेब व्हाट्सॅप फीचर नाही म्हणजे जियोफोन यूजर्सना लॅपटॉप वर काम करताना प्रत्येक मेसेज ला उत्तर देण्यासाठी फोन उचलावा लागेल.

The post जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वापरताना सावधान, या समस्या येतील समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-problem-in-jio-phone-tips-and-tricks-in-marathi/feed/ 0
जियोफोन वर व्हाट्सॅप झाला सुरू, लगेच करा आपल्या फोन मध्ये इंस्टाल, जाणून घ्या इथे https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-whatsapp-support-rollout-in-india-how-to-install-use-whatsapp-on-jio-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-whatsapp-support-rollout-in-india-how-to-install-use-whatsapp-on-jio-phone-in-marathi/#respond Tue, 11 Sep 2018 09:12:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2025 विशेष म्हणजे जियो ने जियोफोन मध्ये व्हाट्सॅप अपडेट द्यायला सुरवात केली आहे पण संपूर्ण देशात हा अपडेट होण्यासाठी 10 दिवस लागतील.

The post जियोफोन वर व्हाट्सॅप झाला सुरू, लगेच करा आपल्या फोन मध्ये इंस्टाल, जाणून घ्या इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जियोफोन देशातील सर्वात जास्त विकला जाणारा 4जी फीचर फोन आहे. रिलायंस जियो ने जेव्हा आपला हा फीचर फोन बाजारात आणला होता तेव्हा हा घेण्यासाठी मोबाईलच्या दुकानात लांबलचक रांगा लागल्या होत्या. गेल्या महिन्यात​ रिलायंस जियो चा जियोफोन 2 पण विक्री साठी उपलब्ध झाला आहे. जियोफोन 2 सोबतच कंपनी ने घोषणा केली आहे लवकरच जियोफोन वर इतर स्मार्टफोन्स प्रमाणे व्हाट्सॅप वापरता येईल. त्यानुसार आज आपल्या यूजर्सना भेट देत जियो ने जियोफोन वर व्हाट्सॅप सपोर्ट आणला आहे.

जियो ने जियोफोन वर व्हाट्सॅप सपोर्ट आणला आहे. म्हणजे आता जियोफोन यूजर्स पण आपल्या फीचर फोन जियोफोन मध्ये व्हाट्सॅप इंस्टाल करू शकतील आणि आपल्या मित्रांशी व्हाट्सॅप वर चॅटिंग करू शकतील. जियोफोन यूजर चॅटिंग सोबतच व्हाट्सॅप वर ईमेज व वीडियो पण शेयर करू शकतील. व्हाट्सॅप ने आईओएस आणि एंडरॉयड नंतर आता काईओएस आॅपरेटिंग सिस्टम वर पण अॅपचा नवीन वर्जन आणला आहे आणि जियोफोन पण काईओएस आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो.

जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वापरण्यासाठी…

जियोफोन मधील जियो अॅप स्टोर वर जा आणि तो ओपन करा

जियो स्टोर मध्ये सोशल कॅटेगरी मध्ये तुम्हाला व्हाट्सॅप दिसेल, तिथे इंस्टाल चे बटन क्लिक करा

व्हाट्सॅप डाउनलोड झाल्यानंतर यात तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकावा लागेल जो ओटीपी नंतर व्हाट्सॅप एक्टिव करेल.

व्हाट्सॅप एक्टिवेट झाल्यावर तुम्ही तुमच्या जियोफोन मध्ये पण हा अॅप वापरू शकता आणि मित्रांशी चॅटिंग करू शकता.

विशेष म्हणजे जियो ने जियोफोन मध्ये व्हाट्सॅप अपडेट द्यायला सुरवात केली आहे पण संपूर्ण देशात हा अपडेट होण्यासाठी 10 दिवस लागतील. त्यामुळे जर तुमच्या ​जियोफोन च्या अॅप स्टोर मध्ये आता व्हाट्सॅप उपलब्ध नसल्यास, 20 सप्टेंबर पर्यंत हा अॅप तुम्हाला नक्की मिळेल.

The post जियोफोन वर व्हाट्सॅप झाला सुरू, लगेच करा आपल्या फोन मध्ये इंस्टाल, जाणून घ्या इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-whatsapp-support-rollout-in-india-how-to-install-use-whatsapp-on-jio-phone-in-marathi/feed/ 0
जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल होत आहे सुरू, बघा कसा बुक करता येईल जियोचा 4जी फीचर फोन https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-2-second-flash-sale-30-september-12-pm-how-to-buy-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-2-second-flash-sale-30-september-12-pm-how-to-buy-in-marathi/#respond Wed, 29 Aug 2018 13:01:17 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1863 हा सेल उद्या म्हणजे 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजता सुरू होईल.

The post जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल होत आहे सुरू, बघा कसा बुक करता येईल जियोचा 4जी फीचर फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने इंडियन मोबाईल मार्केट मध्ये आपला नवीन 4जी फीचर फोन जियोफोन 2 लॉन्च केला आहे. हा जियोफोन चा अपडेटेड वर्जन आहे जो फर्स्ट जेनरेशन जियोफोन पेक्षा खुप एडवांस आहे तसेच यात शानदार फीचर्स आहेत. रिलायंस​ जियो ने जियोफोन 2 चा पहिला फ्लॅश सेल 16 ऑगस्टला केला होता, ज्यात हा काही मिनिटांत सोल्ड आउट झाला. अनेक जियो फॅन्स जियोफोन 2 च्या आॅनलाईन सेल मध्ये निराश झाले. आपल्या त्याच फॅन्स साठी कंपनी आता जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल आयोजित करत ही. हा सेल उद्या म्हणजे 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजता सुरू होईल.

रिलायंस जियोच्या 4जी फीचर फोन जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजता सुरू होईल. या फ्लॅश सेल मध्ये पण सर्व प्रक्रिया आधीच्या फ्लॅश सेल प्रमाणे करावी लागेल. जियोफोन 2 फक्त कंपनी च्या आॅफिशियल वेबसाइट जियो डॉट कॉम वरून विकत घेता येईल. पण जियो आपल्या या दुसर्‍या फ्लॅश सेल मध्ये किती यूनिट घेऊन येणार आहे याची कंपनी ने कोणतीही माहिती दिली नाही.

कशी करावी जियोफोनची बुकिंग
रिलायंस जियोफोन 2 ची बुकिंग तुम्ही कंपनी च्या वेबसाइट किंवा माय जियो अॅप मधून करू शकता. जर तुम्ही वेबसाइट वरून बुकिंग करत असाल तर तुम्हाला जियोफोन 2 फ्लॅश सेलचा बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा. किंवा तुम्ही या लिंक वर क्लिक करून सरळ बुकिंग वर जाऊ शकता. 30 ऑगस्टला दुपारी 12 वाजता बुकिंग बटन एक्टिव होईल.

जर तुम्ही अॅप मधून ​बुकिंग केली तर माईजियो अॅप ओपन करताच दुसरा आॅप्शन जियोफोन 2 चा मिळेल. त्यावर क्लिक करताच नवीन विंडो उघडेल आणि तुम्ही तिथून बुकिंग करू शकता.

विशेष म्हणजे या फ्लॅश सेल साठी तुम्हाला आधी पासून रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट सेल मध्ये भाग घेऊ शकता.

कधी मिळेल फोन
कंपनी चे म्हणणे आहे की बुकिंग नंतर 5-7 दिवसांमध्ये हा फोन तुम्हाला मिळेल. पण काही ठिकाणी हा फोन उशिरा पोहोचू शकतो.

कोणते प्लान आहेत
जियोफोन 2 सोबत कंपनी ने कोणत्याही नवीन प्लानची घोषणा केली नाही. जे प्लान जियोफोन सोबत होते तेच नवीन जियोफोन 2 सोबत मिळतील. कंपनी ने फोन सोबत 3 प्लान चा उल्लेख केला आहे. पहिला प्लान 49 चा आहे ज्यात 28 दिवस 1 जीबी 4जी डाटा देण्यात येत आहे. हा इंटरनेट डेटा कोणत्याही दैनिक लिमिट विना 28 दिवस वापरता येईल. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तसेच 50 एसएमएएस मोफत मिळतील.

तसेच कंपनीचा दुसरा प्लान 99 रुपयांचा आहे आणि या प्लान ची वैधता 28 दिवस आहे. यात तुम्हाला 14जीबी 4जी डेटा मिळेल. या प्लान सोबत पण तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळेल आणि महिन्याला 300 एसएसएस मिळतील.

The post जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल होत आहे सुरू, बघा कसा बुक करता येईल जियोचा 4जी फीचर फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-2-second-flash-sale-30-september-12-pm-how-to-buy-in-marathi/feed/ 0
30 ऑगस्टला होईल जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल, पहिल्या सेल मध्ये मिनिटांत झाला स्टॉक आउट https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-2-second-flash-sale-august-30-12-pm-how-to-book-and-purchase-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-2-second-flash-sale-august-30-12-pm-how-to-book-and-purchase-in-marathi/#respond Thu, 16 Aug 2018 13:12:13 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1725 पण पहिल्या फ्लॅश सेल नंतर थोड्या वेळाने जियो ने जियोफोन 2 च्या दुसर्‍या फ्लॅश सेलची घोषणा पण केली आहे. 30 ऑगस्टला जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल आयोजित करण्यात येईल.

The post 30 ऑगस्टला होईल जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल, पहिल्या सेल मध्ये मिनिटांत झाला स्टॉक आउट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जियो फॅन्सनी इतके दिवस वाट पाहिल्यानंतर आखिरीसे तो दिवस उजाडला जेव्हा रिलायंस चा दुसरा 4जी फीचर फोन जियोफोन 2 पहिल्यांदा सेल साठी उपलब्ध होणार होता. कंपनी ने आधीच सांगितले होते की हा फोन जियो च्या आॅफिशियल वेबसाइट वर फ्लॅश सेल अंतर्गत उपलब्ध होईल. पण ज्याची भीती होती तेच झाले. काही मिनिटांतच जियोफोन 2 चा सर्व स्टॉक विकला गेला आणि जियोफोन 2 वर सोल्ड आउटचा बोर्ड लावण्यात आला. पण पहिल्या फ्लॅश सेल नंतर थोड्या वेळाने जियो ने जियोफोन 2 च्या दुसर्‍या फ्लॅश सेलची घोषणा पण केली आहे. 30 ऑगस्टला जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल आयोजित करण्यात येईल.

रिलायंस जियो ने सांगितले की​ जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजता सुरू होईल. या फ्लॅश सेल मध्ये पण सर्व तेच करावे लागेल जे आज केले होते. पहिल्या फ्लॅश सेल मध्ये काही मिनीटांत स्टॉक आउट होणार्‍या जियोफोन 2 बद्दल रिलायंस जियो ने खुलासा केला नाही की आज जियोफोन 2 चे किती यूनिट विकले गेले आणि 30 ऑगस्टला किती युनिट येणार आहेत.

कशी करावी जियोफोनची बुकिंग
रिलायंस जियोफोन 2 ची बुकिंग तुम्ही कंपनी च्या वेबसाइट https://www.jio.com किंवा माय जियो अॅप मधून करू शकता. जर तुम्ही वेबसाइट वरून बुकिंग करत असाल तर तुम्हाला जियोफोन 2 फ्लॅश सेलचा बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा. किंवा तुम्ही या लिंक वर क्लिक करून https://www.jio.com/en-in/jiophone2 सरळ बुकिंग वर जाऊ शकता. 30 ऑगस्टला दुपारी 12 वाजता बुकिंग बटन एक्टिव होईल.

जर तुम्ही अॅप मधून ​बुकिंग केली तर माईजियो अॅप ओपन करताच दुसरा आॅप्शन जियोफोन 2 चा मिळेल. त्यावर क्लिक करताच नवीन विंडो उघडेल आणि तुम्ही तिथून बुकिंग करू शकता.

विशेष म्हणजे या फ्लॅश सेल साठी तुम्हाला आधी पासून रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट सेल मध्ये भाग घेऊ शकता.

कधी मिळेल फोन
कंपनी चे म्हणणे आहे की बुकिंग नंतर 5-7 दिवसांमध्ये हा फोन तुम्हाला मिळेल. पण काही ठिकाणी हा फोन उशिरा पोहोचू शकतो.

कोणते प्लान आहेत
जियोफोन 2 सोबत कंपनी ने कोणत्याही नवीन प्लानची घोषणा केली नाही. जे प्लान जियोफोन सोबत होते तेच नवीन जियोफोन 2 सोबत मिळतील. कंपनी ने फोन सोबत 3 प्लान चा उल्लेख केला आहे. पहिला प्लान 49 चा आहे ज्यात 28 दिवस 1 जीबी 4जी डाटा देण्यात येत आहे. हा इंटरनेट डेटा कोणत्याही दैनिक लिमिट विना 28 दिवस वापरता येईल. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तसेच 50 एसएमएएस मोफत मिळतील.

तसेच कंपनीचा दुसरा प्लान 99 रुपयांचा आहे आणि या प्लान ची वैधता 28 दिवस आहे. यात तुम्हाला 14जीबी 4जी डेटा मिळेल. या प्लान सोबत पण तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळेल आणि महिन्याला 300 एसएसएस मिळतील.

The post 30 ऑगस्टला होईल जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल, पहिल्या सेल मध्ये मिनिटांत झाला स्टॉक आउट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-2-second-flash-sale-august-30-12-pm-how-to-book-and-purchase-in-marathi/feed/ 0
जियोफोन मध्ये यू-ट्यूब, बघता येतील अनलिमिटेड ​वीडियोज अगदी मोफत, जाणून घ्या कसा करावा फोन मध्ये डाउनलोड https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-in-jio-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-in-jio-phone-in-marathi/#respond Tue, 14 Aug 2018 14:11:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1709 यू-ट्यूब डाउनलोड होताच तुमच्या जीमेल ने अॅप मध्ये लॉग इन करा आणि बघा 4जी स्पीड ने अनलिमिटेड वीडियो आणि तुमची आवडती गाणी.

The post जियोफोन मध्ये यू-ट्यूब, बघता येतील अनलिमिटेड ​वीडियोज अगदी मोफत, जाणून घ्या कसा करावा फोन मध्ये डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
15 ऑगस्ट म्हणजे उद्या पासून रिलायंस जियो च्या दुसर्‍या 4जी फीचर फोन जियोफोन 2 ची प्री-बुकिंग सुरू होईल. या फोन मध्ये असे अनेक नवीन फीचर्स आहेत जे जियोफोन मध्ये नव्हते. पण जियो ने जियोफोन 2 सादर करण्यासोबत ज्या यूजर कडे जियोफोन आहे त्यांना पण निराश केले नाही आणि जियोफोन मध्ये पण जियोफोन 2 प्रमाणे सोशल मीडिया अॅप वापरता येतील याची काळजी घेतली आहे. तर आज जियोफोन यूजर साठी ​ रिलायंस जियो ने नवीन भेट देण्यात आली आहे. आज पासून जियोफोन मध्ये यू-ट्यूब वापरता येईल.

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी जियोफोन मध्ये यू-ट्यूब सपोर्ट मिळेल. कंपनी ने जियोफोन ग्राहकांसाठी गूगल चा हा वीडियो स्ट्रीमिंग अॅप रोलआउट केला आहे. ​जियोफोन यूजर आता मोफत अनलिमिटेड वीडियो आणि फिल्म्स ची मजा घेऊ शकतील. जियोफोन मध्ये यू-ट्यूब डाउनलोड करण्यासाठी:

जियोफोन मध्ये यू-ट्यूब डाउनलोड करण्यासाठी जियो स्टोर अॅप मध्ये जा.

तिथे तुम्हाला यूटिलिटी, सोशल व इंटरटेनमेंट सारखे आॅप्शन मिळतील, इंटरटेनमेंट कॅटेगरी मध्ये जा.

काही जियोफोन यूजर्सना अॅप च्या होम पेज वर पण यू-ट्यूब चा आॅप्शन मिळू शकतो.

इंटरटेनमेंट कॅटेगरी किंवा होम पेज वर यू-ट्यूब लोगो वर उजवीकडे ‘डाउनलोड’ चे ​चिन्ह असेल, त्यावर क्लिक करा.

यू-ट्यूब डाउनलोड वर क्लिक करताच फोन मध्ये अॅप डाउनलोड व्हायला सुरवात होईल.

यू-ट्यूब डाउनलोड होताच तुमच्या जीमेल ने अॅप मध्ये लॉग इन करा आणि बघा 4जी स्पीड ने अनलिमिटेड वीडियो आणि तुमची आवडती गाणी.

The post जियोफोन मध्ये यू-ट्यूब, बघता येतील अनलिमिटेड ​वीडियोज अगदी मोफत, जाणून घ्या कसा करावा फोन मध्ये डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-youtube-in-jio-phone-in-marathi/feed/ 0