जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वापरताना सावधान, या समस्या येतील समोर

रिलायंस जियो ने गेल्याच महिन्यात आपला दुसरा 4जी फीचर फोन जियोफोन 2 भारतीय मोबाईल बाजारात सादर केला आहे. जियोफोन 2 सोबत रिलायंस कंपनी ने घोषणा केली होती की जियोफोन वर पण व्हाट्सॅप वापरता येईल. त्यानुसार जियो ने जियोफोन वर व्हाट्सॅप सादर केला आहे. जियोफोन मध्ये पण आता व्हाट्सॅप इंस्टाल होऊ शकतो आणि जियोफोन यूजर्स आपल्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी चॅटिंग करू शकतात. जियो ने जियोफोन मध्ये व्हाट्सॅप आणून आपल्या यूजर्सना आनंद तर दिला आहे पण हा आनंद मर्यादित असेल. म्हणजे जियोफोन मध्ये व्हाट्सॅप तर आला आहे पण त्यात काही मर्यादा आहेत ज्यांचा सामना जियोफोन यूजर्सना करावा लागेल.

जियोफोन मध्ये व्हाट्सॅप म्हणजे आनंदाची बातमी पण जियोफोन यूजर्स साठी व्हाट्सॅप वापरण्याचा अनुभव इतर स्मार्टफोन्स इतका चांगला नसेल. विशेष म्हणजे जियोफोन काईओएस आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो आणि यातील व्हाट्सॅप पण खासकरून काईओएस साठी बनवण्यात आला आहे. जियोफोन मध्ये व्हाट्सॅप कसे इंस्टाल करावे हे जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा). जर तुम्ही पण जियोफोन वापरत असाल तर लक्षात घ्या की या 4जी फीचर फोन मध्ये व्हाट्सॅप वापरताना तुम्ही निराश होऊ शकता.

1.
जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वर चॅटिंग होईल पण यूजर वॉयस कॉल किंवा वीडियो कॉल करू शकणारा नाहीत. म्हणजे यूजर्स टेक्स्ट लिहून किंवा वॉईस रेकॉर्ड करून मेसेज पाठवू शकतात पण वॉयस कॉल आणि वीडियो कॉल करू शकणार नाहीत.

2.
त्याचप्रमाणे दुसर्‍या स्मार्टफोन वाल्या व्हाट्सॅप यूजरने जियोफोन वाल्या व्हाट्सॅप नंबर वर वॉयस किंवा वीडियो कॉल केला तर तो कॉल पण कनेक्ट होणार नाही. दुसर्‍या यूजरला कॉल फेल दाखवण्यात येईल.

3.
व्हाट्सॅप चा स्टेट्स फीचर खुप प्रसिद्ध आहे, ज्यात 24 तासांसाठी फोटो किंवा वीडियो दिसतो. पण जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वर तुम्ही स्वतःचा स्टेटस ठेऊ शकणार नाही तसेच इतरांचे स्टेट्स बघू पण शकणार नाही. हे खुप निराशाजनक आहे.

4.
व्हाट्सॅप वर मीडिया फाइल्स पाठवल्या जातात. जियोेफोन मध्ये ईमेज आणि वीडियो सेंड करता येतील पण यूजर्स यात जीफ फाईल, पीडीएफ तसेच डाक्यूमेंट फाइल्स शेयर करू शकणार नाहीत. यातून फक्त फोटो आणि वीडियो सेंड आणि रिसीव केले जाऊ शकतात.

5.
व्हाट्सॅप ने वेब व्हाट्सॅप फीचर सुरू केला आहे. या फीचर मुळे लॅपटॉप किंवा कम्प्यूटर वर काम करताना यूजर कंम्प्यूटर वर व्हाट्सॅप यूज करू शकतात. त्यामुळे वारंवार फोन हातात घ्यावा लागत नाही. पण जियोफोन यूजर्सना इथे पण जास्त मेहनत करावी लागेल. जियोफोन च्या व्हाट्सॅप मध्ये वेब व्हाट्सॅप फीचर नाही म्हणजे जियोफोन यूजर्सना लॅपटॉप वर काम करताना प्रत्येक मेसेज ला उत्तर देण्यासाठी फोन उचलावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here