जियोफोन मध्ये यू-ट्यूब, बघता येतील अनलिमिटेड ​वीडियोज अगदी मोफत, जाणून घ्या कसा करावा फोन मध्ये डाउनलोड

15 ऑगस्ट म्हणजे उद्या पासून रिलायंस जियो च्या दुसर्‍या 4जी फीचर फोन जियोफोन 2 ची प्री-बुकिंग सुरू होईल. या फोन मध्ये असे अनेक नवीन फीचर्स आहेत जे जियोफोन मध्ये नव्हते. पण जियो ने जियोफोन 2 सादर करण्यासोबत ज्या यूजर कडे जियोफोन आहे त्यांना पण निराश केले नाही आणि जियोफोन मध्ये पण जियोफोन 2 प्रमाणे सोशल मीडिया अॅप वापरता येतील याची काळजी घेतली आहे. तर आज जियोफोन यूजर साठी ​ रिलायंस जियो ने नवीन भेट देण्यात आली आहे. आज पासून जियोफोन मध्ये यू-ट्यूब वापरता येईल.

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी जियोफोन मध्ये यू-ट्यूब सपोर्ट मिळेल. कंपनी ने जियोफोन ग्राहकांसाठी गूगल चा हा वीडियो स्ट्रीमिंग अॅप रोलआउट केला आहे. ​जियोफोन यूजर आता मोफत अनलिमिटेड वीडियो आणि फिल्म्स ची मजा घेऊ शकतील. जियोफोन मध्ये यू-ट्यूब डाउनलोड करण्यासाठी:

जियोफोन मध्ये यू-ट्यूब डाउनलोड करण्यासाठी जियो स्टोर अॅप मध्ये जा.

तिथे तुम्हाला यूटिलिटी, सोशल व इंटरटेनमेंट सारखे आॅप्शन मिळतील, इंटरटेनमेंट कॅटेगरी मध्ये जा.

काही जियोफोन यूजर्सना अॅप च्या होम पेज वर पण यू-ट्यूब चा आॅप्शन मिळू शकतो.

इंटरटेनमेंट कॅटेगरी किंवा होम पेज वर यू-ट्यूब लोगो वर उजवीकडे ‘डाउनलोड’ चे ​चिन्ह असेल, त्यावर क्लिक करा.

यू-ट्यूब डाउनलोड वर क्लिक करताच फोन मध्ये अॅप डाउनलोड व्हायला सुरवात होईल.

यू-ट्यूब डाउनलोड होताच तुमच्या जीमेल ने अॅप मध्ये लॉग इन करा आणि बघा 4जी स्पीड ने अनलिमिटेड वीडियो आणि तुमची आवडती गाणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here