जियोफोन 2 साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, मिळेल 200 रुपयांचा कॅशबॅक पण

रिलायंस जियो ने एकीकडे टेलीकॉम बाजारात आपल्या 4जी सर्विस व स्वस्त प्लान्स ने हलचल निर्माण केली आहे. तर दुसरीकडे फीचर फोन बाजारात पण जियोफोन मुळे कंपनी नंबर वन बनली आहे. गेल्या वर्षी जियोफोनच्या यशानंतर कंपनी यावर्षी जियोफोन 2 घेऊन आली आहे आणि हा फोन पण जियोच्या प्रगतीत भर घालत आहे. जियोफोन आता पर्यंत फक्त फ्लॅश सेल मध्येच विकला जात होता, पण दिवाळीच्या निमित्ताने कंपनीने हा शानदार 4जी फीचर फोन ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे.

जियो ने आपल्या फॅन्सना दिवाळीची भेट देत जियोफोन 2 ओपन सेल साठी उपलब्ध केला आहे. रिलायंस जियो ने जियोफोन 2 ​कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वरच ओपन सेल अंर्तगत विकला जात आहे. आता पर्यंत फोन फक्त फ्लॅश सेल मध्येच विकला जात होता आणि सेल सुरु होताच काही मिनिटांत स्टॉक आउट होत असे. पण आज पासून हा फोन ओपन सेल साठी उपलब्ध झाला आहे. ओपन सेल अंतर्गत जियो फॅन कधीपण हा फोन कोणत्याही रजिस्ट्रेशन विना आॅनलाईन विकत घेऊ शकता.

जियोफोन 2 आज दुपारी 12 वाजल्यापासून कंंपनीच्या वेबसाइट वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. पहिल्यांदाच जियोफोन 2 फ्लॅश सेल ऐवजी ओपन सेल मध्ये विकला जात आहे. जियो ने हा खास सेल 8 दिवसांसाठी आयोजित केला आहे जो आज 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत चालेल. या 8 दिवसांत तुम्ही कधीही कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वर जाऊन जियोफोन 2 विकत घेऊ शकता.

असा विकत घ्या जियोफोन 2

जियोफोन 2 कंपनीने 2,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जियोच्या दिवाळी स्पेशल सेल मध्ये हा फोन याच किंमतीती सेल साठी उपलब्ध होईल. कंपनी जियोफोन 2 च्या खरेदीवर पेटीएम कॅशबॅक आॅफर पण देत आहे. जियो डॉट कॉम वरून जियोफोन 2 विकत घेताना जर पेटीएम वॉलेट ने पेमेंट केले तर यूजर्सना 200 रुपयांची पेटीएम कॅश मिळेल, या पेटीएम कॅशचा वापर कोणत्याही ट्रांजेक्शन मध्ये करता येईल.

विशेष म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने रिलायंस जियो ने जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड पण लॉन्च केला आहे. या स्पेशल आॅफर अंतर्गत फक्त 1095 रुपयांमध्ये 1,500 रुपयांचा जियोफोन 594 रुपयांच्या ​अतिरिक्त रिचार्ज बेनिफिट सह विकत घेता येईल. म्हणजे 1500 रुपयांचा फोन आणि 594 रुपयांचा रिचार्ज फक्त 1,095 रुपयांमध्ये. या फेस्टिवल गिफ्ट कार्ड सोबत जियोफोन आॅनलाइन स्टोर अमेझॉन इंडिया, रिलायंस डिजिटल स्टोर आणि रिलायंस फ्रेश सहित इतर कंपनी स्टोर वरून विकत घेता येईल.

जियोफोन 2 ओपन सेल मध्ये विकत घेण्यासाठी (इथे क्लिक करा)
जियोफोन फेस्टिवल गिफ्ट कार्ड चे डिटेल्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here