KRAFTON - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 19 May 2023 09:29:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 खुशखबर : BGMI Unban कंपनीनं केलं कंफर्म, पुन्हा खेळता येणार हा मोबाइल गेम, भारतात करता येणार डाउनलोड https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-in-india-confirmed-by-krafton/ https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-in-india-confirmed-by-krafton/#respond Fri, 19 May 2023 09:29:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21029 BGMI म्हणजे BATTLEGROUNDS MOBILE INDIA संबंधित बातमी समोर आली आहे. हा मोबाइल गेम पुन्हा भारतात पुनरागमन करणार आहे. बीजीएमआयची ही माहिती गेम डेव्हलपर कंपनी KRAFTON नं दिली आहे. क्राफ्टननं स्पष्ट केलं आहे की ते गेम ऑपरेशन भारतात पुन्हा सुरु करणार आहेत. पुढे तुम्ही कंपनीचं निवेदन वाचू शकता. कंपनीचं विधान KRAFTON चे सीईओ Sean Hyunil Sohn […]

The post खुशखबर : BGMI Unban कंपनीनं केलं कंफर्म, पुन्हा खेळता येणार हा मोबाइल गेम, भारतात करता येणार डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा गेम लवकरच डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.
  • KRAFTON CEO नी अधिकृत घोषणा केली आहे.
  • BGMI गेम भारतात जुलै 2022 को बॅन झाला होता.

BGMI म्हणजे BATTLEGROUNDS MOBILE INDIA संबंधित बातमी समोर आली आहे. हा मोबाइल गेम पुन्हा भारतात पुनरागमन करणार आहे. बीजीएमआयची ही माहिती गेम डेव्हलपर कंपनी KRAFTON नं दिली आहे. क्राफ्टननं स्पष्ट केलं आहे की ते गेम ऑपरेशन भारतात पुन्हा सुरु करणार आहेत. पुढे तुम्ही कंपनीचं निवेदन वाचू शकता.

कंपनीचं विधान

KRAFTON चे सीईओ Sean Hyunil Sohn यांनी अधिकृत निवेदन जाहीर करून सांगितलं आहे की ते BATTLEGROUNDS MOBILE INDIA (BGMI) भारतात रि-लाँच करणार आहेत. गेम पुन्हा लाँच करण्यासोबतच कंपनीच्या सीईओनी आपल्या विधानात भारत सरकार तसेच इंडियन गेमिंग कम्यूनिटीचे आभार व्यक्त केले आहेत.

कधी लाँच होईल बीजीएमआय

BGMI भारतात पुन्हा लाँच होत आहे ही बातमी तर कंपनीनं कंफर्म केली आहे परंतु हा गेम कधी उपलब्ध होईल, ही माहिती अद्याप देण्यात आली नाही. क्राफ्टन सीईओनं सांगितलं आहे की येत्या काही दिवसांत लवकरच हा Mobile Game भारतात डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. आशा आहे की जूनपर्यंत मोबाइल युजर हा गेम भारतात पुन्हा खेळू शकतील.

BGMI वरील बंदीची कारणे

  • डेटा प्रायव्हसी
  • राष्ट्रीय सुरक्षेला धोका
  • लहान मुलांना व्यसन
  • चोरी आणि हिंसा

BATTLEGROUNDS MOBILE INDIA नं भारतात खूप प्रसिद्धी मिळवली होती. परंतु प्रसिद्धीनंतर युजर्सच्या डेटा प्रायव्हसीच्या घटना समोर येऊ लागल्या होत्या. अशा बातम्या आल्या होत्या की ह्या गेमचे सर्व्हर चीनमध्ये आहेत आणि तिथून भारतीयांचा डेटा चोरला जात आहे. युजर्सच्या प्रायव्हसी सोबतच हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक गेम असल्याचं सांगण्यात आलं होतं.

तसेच PUBG Mobile आणि BGMI गेममध्ये अपग्रेड करण्यासाठी तसेच वरच्या लेव्हलवर जाण्यासाठी अनेक युजर्स विचार न करता पैसे खर्च करत होते. मुलं पालकांकडून पैसे चोरत होते. तसेच गेम ना खेळू दिल्यास मुलं हिंसक होत असल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या.

The post खुशखबर : BGMI Unban कंपनीनं केलं कंफर्म, पुन्हा खेळता येणार हा मोबाइल गेम, भारतात करता येणार डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-in-india-confirmed-by-krafton/feed/ 0
PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव https://www.91mobiles.com/marathi/pubg-bgmi-maker-krafton-released-new-game-in-india-defense-derby/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-bgmi-maker-krafton-released-new-game-in-india-defense-derby/#respond Fri, 28 Apr 2023 07:25:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20554 PUBG आणि BGMI इंडियन गेमिंग इंडस्ट्रीचे असे गेम्स आहेत ज्यांनी लाखो लोकांना वेड लावलं होतं. हे दोन्ही सुपरहिट मोबाइल गेम्स बनवणाऱ्या कंपनी Krafton नं आता भारतात अजून एक नवीन गेम रिलीज केला आहे. हा डिफेंस डर्बी (Defense Derby) Game नावानं लाँच करण्यात आला आहे जो गुगल प्ले स्टोर (Google Play) वर डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे. […]

The post PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • नवीन गेमचं नाव Defense Derby आहे.
  • हा Google Play वरून डाउनलोड करता येईल.
  • 11 मे पर्यंत याचं प्रीव्यू व्हर्जन उपलब्ध असेल.

PUBG आणि BGMI इंडियन गेमिंग इंडस्ट्रीचे असे गेम्स आहेत ज्यांनी लाखो लोकांना वेड लावलं होतं. हे दोन्ही सुपरहिट मोबाइल गेम्स बनवणाऱ्या कंपनी Krafton नं आता भारतात अजून एक नवीन गेम रिलीज केला आहे. हा डिफेंस डर्बी (Defense Derby) Game नावानं लाँच करण्यात आला आहे जो गुगल प्ले स्टोर (Google Play) वर डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे.

Defense Derby गेम Krafton द्वारे रिलीज करण्यात आला आहे ज्याची निर्मिती स्वतंत्र स्टूडियो राइजिंगविंग्सनं केली आहे. कंपनीनं सध्या या गेमचं प्रीव्यू व्हर्जन जारी केलं आहे जो अर्ली अ‍ॅक्सेससाठी उपलब्ध झाला आहे. येत्या 11 मेपर्यंत डिफेंस डर्बीचं हे प्रीव्यू व्हर्जन गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड व इन्स्टाल करता येईल. हे देखील वाचा: 6,000mAh battery सह लाँच झाला Infinix Hot 30 Play; जाणून घ्या किंमत

कसा आहे डिफेंस डर्बीचा गेम प्ले

सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की Defense Derby गेम PUBG आणि BGMI सारखा अजिबात नाही. हा एक स्ट्रॅटेजी गेम आहे तर बीजीएमआय आणि पबजी मोबाइल बॅटल रॉयल-स्टाइल गेम होते. डिफेंस डर्बीमध्ये टॉवर डिफेंस शैलीचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे प्लेयर्सना एक ठराविक लक्ष्य दिलं जाईल ज्याची सुरक्षा करावी लागेल.

डिफेंस डर्बीमध्ये एक साथ 4 प्लेयर एक संघात खेळू शकतात. प्रत्येक राउंडमध्ये चारही खेळाडूंना स्काउटिंगच्या माध्यमातून कार्ड्स दिले जातील आणि या कार्ड्सचा वापर करून त्यांना डेक बनवावा लागेल. हा डेक मॉन्स्टर म्हणजे राक्षसांपासून वाचण्यासाठी बनवला जाईल. जोपर्यंत संघातील सर्व खेळाडू मरत नाहीत तोपर्यंत गेम सुरु राहील.

मोफत खेळात येईल डिफेंस डर्बी गेम

Krafton नं Defense Derby ‘फ्री गेम’ श्रेणी अंतगर्त लाँच केला आहे. हा गेम Google Play वर उपलब्ध झाला आहे जिथे हा मोफत डाउनलोड करता येईल. वर सांगितल्याप्रमाणे या गेमचं प्रीव्यू व्हर्जन आलं आहे, परंतु नंतर फुल व्हर्जन रिलीज झाल्यानंतर देखील डिफेंस डर्बी गेम पूर्णपणे फ्री राहील. हे देखील वाचा: OPPO F23 Pro 5G भारतात 15 मेला होऊ शकतो लाँच; किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

क्राफ्टननं इंडियन युजर्ससाठी एक्सक्सूलिव्ह गिफ्ट्स देखील गेममध्ये ठेवले आहेत. यात अर्ली अ‍ॅक्सेस टेस्टिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी 700 रुपयांचे गेम रिवॉर्ड मिळत आहेत. या रिवॉर्ड्समध्ये 2500 क्रिस्टल, 500 गोल्ड, 500 एलिक्सिर आणि 500 मॅनास्टोनचा समावेश आहे.

The post PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-bgmi-maker-krafton-released-new-game-in-india-defense-derby/feed/ 0
अश्याप्रकारे करा BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम, भारतात रजिस्ट्रेशन झाले सुरु https://www.91mobiles.com/marathi/how-to-pre-register-battlegrounds-mobile-india-in-android-smartphone-full-steps/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-pre-register-battlegrounds-mobile-india-in-android-smartphone-full-steps/#respond Tue, 18 May 2021 12:28:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10955 BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम आजपासून भारतात प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला आहे. KRAFTON कंपनीने आज भारतात PUBG Mobile च्या नवीन आणि देशी वर्जनच्या प्री-रजिस्ट्रेशन लिंक ऑफिशियल केली आहे आणि अश्याप्रकारे गुगल प्ले स्टोरवर पण या गेमचे पदार्पण झाले आहे.

The post अश्याप्रकारे करा BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम, भारतात रजिस्ट्रेशन झाले सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आज जे लोक अंथरुणावर पडून इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हिडीओज स्क्रॉल करत आहेत ते गेल्यावर्षी वेगळ्याच एडवेंचरमध्ये आयुष्य घालवत होते. आणि हे एडवेंचर होते PUBG Mobile. पबजी मोबाईल भारतात बॅन झाल्यावर हजारो लोकांच्या आयुष्य रटाळ झाले होते. परंतु जेव्हा गेल्या आठवड्यात घोषणा झाली कि PUBG Mobile गेम BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने भारतात पुन्हा येणार आहे तेव्हा लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हाच आनंद आता चार पाऊले पुढे नेत गेम निर्माता कंपनी KRAFTON ने घोषणा केली आहे कि आजपासून BATTLEGROUNDS MOBILE INDIA देशात प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध होत आहे. (How to pre register Battlegrounds Mobile India in android smartphone full steps)

BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम आजपासून भारतात प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाला आहे. KRAFTON कंपनीने आज भारतात PUBG Mobile च्या नवीन आणि देशी वर्जनच्या प्री-रजिस्ट्रेशन लिंक ऑफिशियल केली आहे आणि अश्याप्रकारे गुगल प्ले स्टोरवर पण या गेमचे पदार्पण झाले आहे. या गेमची आतुरतेने वाट बघणाऱ्या मोबाईल युजर्सना नक्कीच जाणून घ्यायचे असेल कि कशाप्रकारे आणि कुठून बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेमसाठी रजिस्ट्रर करता येईल. लोकांच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही पुढे दिले आहे. परंतु सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि हा आनंद फक्त Android युजर्सच्या वाट्याला आला आहे, iPhone ग्राहकांना अजून वाट बघावी लागू शकते.

battlegrounds mobile india pre register image

BATTLEGROUNDS MOBILE INDIA अश्याप्रक्रारे करा रजिस्टर

PUBG Mobile भारतात BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने पुन्हा येत आहे, ज्याचे प्री-रजिस्ट्रेशन 18 मेपासून सुरु झाले आहे. हा गेम लॉन्च होण्यापूर्वी यावर तुमचे अकाउंट बनवता येईल. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

1. तुमच्या Android SmartPhone मध्ये Google Play Store ओपन करा.

2. गुगल प्ले स्टोरमध्ये BATTLEGROUNDS MOBILE INDIA सर्च करा, किंवा (या लिंकवर ) क्लिक करा.

3. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम उघडल्यानंतर तिथे “Pre-Register” चे बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.

4. तिथे युजरचे नाव, वय, ईमेल आयडी आणि डिवायस कम्पॅटबिलटी चेक केली जाईल.

5. आवश्यक डिटेल सबमिट केल्यानंतर मोबाईल गेम मध्ये युजरचे अकाउंट तयार होईल.

सांगू इच्छितो कि BATTLEGROUNDS MOBILE INDIA साठी प्री-रजिस्टर केल्यावर गेम निर्माता कंपनीकडून युजर्सना काही स्पेशल रिवॉर्ड्स पण दिले जातील जे गेममध्ये वापरता येतील. रजिस्टर झाल्यावर जेव्हा गेम लॉन्च होईल आणि फोनमध्ये डाउनलोड करून रन केला जाईल, तेव्हा हे स्पेशल रिवॉर्ड तुमच्या युजरच्या गेम अकाउंटवर क्रेडिट केले जातील. या रिवॉर्ड्समध्ये गेम स्कीन, प्लेयर ड्रेस, एक्स्ट्रा पॉईंट्स व गन इत्यादींचा समावेश होऊ शकतो.

The post अश्याप्रकारे करा BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम, भारतात रजिस्ट्रेशन झाले सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-pre-register-battlegrounds-mobile-india-in-android-smartphone-full-steps/feed/ 0
नवीन PUBG मोबाईल येईल भारतात, यावेळी नाव असेल Battle Ground Mobile India, जाणून घ्या कधीपासून करता येईल डाउनलोड https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-release-date-download-battle-ground-mobile-india-game/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-release-date-download-battle-ground-mobile-india-game/#respond Thu, 06 May 2021 12:29:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10829 BATTLEGROUNDS MOBILE INDIA चा गेमिंग एक्सपीरियंस PUBG Mobile पेक्षा पण जास्त मजेशीर आणि रोमांचक असेल. क्रॉफ्टन ने सांगितले आहे कि हा पण एक फ्री-टू-प्ले गेम असेल ज्यात आधीच्या पबजी प्रमाणे टूर्नामेंट्स आणि लीग्स आयोजित होतील.

The post नवीन PUBG मोबाईल येईल भारतात, यावेळी नाव असेल Battle Ground Mobile India, जाणून घ्या कधीपासून करता येईल डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही त्या लोकांपैकी आहेत जे PUBG Mobile ची आतुरतेने वाट बघत आहेत? कोरोना विषाणूमुळे घर बसल्या तरुण आणि लहान मुलांना नक्कीच या मोबाईल गेमची खूप आठवण येत असेल. पण आता तुमचे ‘दुःख’ लवकरच संपणार आहे. पबजी फॅन्ससाठी खूप मोठी बातमी समोर आली आहे. KRAFTON कंपनीने आज भारतात PUBG Mobile चा नवीन वर्जन ऑफिशियली लॉन्च केला आहे. हा नवा, अ‍ॅडव्हान्स आणि मजेशीर पबजी गेम आता भारतात BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने खेळाला जाईल. (PUBG Mobile Release date Download Battle Ground Mobile India game)

वरील व्हिडीओ बघून तुमचा उत्साह शिगेला पोहोचला असेल. साउथ कोरियन व्हिडीओ गेम डेवलेपर कंपनी KRAFTON ने आज अधिकृतपणे आपल्या नवीन गेमच्या इंडिया लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनीने हा मोबाईल गेम BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने सादर केला आहे जो PUBG Mobile चा नवीन आणि उन्नत वर्जन आहे. हा पण वर्ल्ड क्लॉस AAA multiplayer गेम आहे जो खास भारतीय ग्राहकांना लक्षात थुइन बनवण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे Galaxy F22 स्मार्टफोन, असू शकतो कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन

पूर्वीपेक्षा जास्त मजेदार

BATTLEGROUNDS MOBILE INDIA चा गेमिंग एक्सपीरियंस PUBG Mobile पेक्षा पण जास्त मजेशीर आणि रोमांचक असेल. क्रॉफ्टन ने सांगितले आहे कि हा पण एक फ्री-टू-प्ले गेम असेल ज्यात आधीच्या पबजी प्रमाणे टूर्नामेंट्स आणि लीग्स आयोजित होतील. तसेच गेममध्ये प्लेयर स्कीन आणि आउटफिट पण आधीप्रमाणे मिळतील. गेमच्या टीजरने पण याचा अनुभव पण पूर्वीसारखा असेल याची हिंट दिली आहे.

पबजी मोबाईल गेममधील स्क्रिनशॉट

कधी करता येईल डाउनलोड

टीजर प्रसिद्ध करताना कंपनीने BATTLEGROUNDS MOBILE INDIA देशात सादर तर केला पण कंपनीने अजूनतरी या गेमच्या डाउनलोड डेटवरून पडदा हटवला नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे कि फोन डाउनलोड किंवा इंस्टालसाठी उपलब्ध करवण्याआधी कंपनी रजिस्ट्रेशन सुरु करेल आणि या मोबाईल गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करावे लागेल. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया फक्त भारतीय बाजारात खेळण्यासाठी उपलब्ध होईल आणि अशा आहे कि या महिन्याच्या शेवटी किंवा या जूनमध्ये हा गेम सर्व युजर्ससाठी डाउनलोड आणि खेळण्यासाठी उपलब्ध होईल.

The post नवीन PUBG मोबाईल येईल भारतात, यावेळी नाव असेल Battle Ground Mobile India, जाणून घ्या कधीपासून करता येईल डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-release-date-download-battle-ground-mobile-india-game/feed/ 0