6,000mAh battery सह लाँच झाला Infinix Hot 30 Play; जाणून घ्या किंमत

Highlights

  • हा फोन नायजेरियामध्ये लाँच झाला आहे.
  • यात 6,000एमएएचची बॅटरी आहे.
  • या इनफिनिक्स फोनची किंमत जवळपास 14 हजार रुपये आहे.

इनफिनिक्सनं ग्लोबल मंचावर आपली ‘हॉट 30’ सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन Infinix Hot 30 Play सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या नायजेरियामध्ये लाँच करण्यात आला आहे जो लवकरच इतर मार्केट्समध्ये एंट्री करेल. हॉट 30 प्ले एक लो बजेट 4जी फोन आहे ज्याची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.

इनफिनिक्स हॉट 30 प्ले चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.82″ HD+ Display
  • 90Hz REFRESH RATE

Infinix Hot 30 Play स्मार्टफोन 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह चालते. ही स्क्रीन 500निट्स ब्राइटनेस आणि 85% कलर गामुटला सपोर्ट करते. हे देखील वाचा: इंटरनेटविना करा UPI Payment; बटनवाल्या फोनवरून देखील होतील पैसे ट्रान्सफर, जाणून घ्या पद्धत

  • 16MP Rear Camera
  • 8MP Front Camera

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 30 प्ले ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एआय लेन्ससह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये फ्लॅश लाईट आणि एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

  • 4GB RAM expansion
  • MediaTek Helio G37

Infinix Hot 30 Play अँड्रॉइड 13 आधारित एक्सओएस 12 वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी37 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा मोबाइल फोन 4जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो जो इंटरनल 4जीबी रॅमसह 8जीबी रॅमची पावर देतो.

  • 6,000mAh battery
  • 18W fast charging

पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 30 प्ले मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार सिंगल चार्जमध्ये हा फोन 47 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो. या फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे. हे देखील वाचा: Realme 11 Pro+ 5G च्या लाँचपूर्वीच समोर आली डिजाइन; कर्व्ड डिस्प्ले आणि 200MP कॅमेऱ्यासह करेल दणक्यात एंट्री

इनफिनिक्स हॉट 30 प्लेची किंमत

Infinix Hot 30 Play ची किंमत नायजेरियामध्ये NGN 80,000 पासून सुरु होते. ही किंमत भारतीय करंसीनुसार 14,000 रुपयांच्या आसपास आहे. इनफिनिक्सनं आपला नवीन फोन Bora Purple, Mirage White आणि Blade Black कलरमध्ये लाँच केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here