खुशखबर : BGMI Unban कंपनीनं केलं कंफर्म, पुन्हा खेळता येणार हा मोबाइल गेम, भारतात करता येणार डाउनलोड

Highlights

  • हा गेम लवकरच डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.
  • KRAFTON CEO नी अधिकृत घोषणा केली आहे.
  • BGMI गेम भारतात जुलै 2022 को बॅन झाला होता.

BGMI म्हणजे BATTLEGROUNDS MOBILE INDIA संबंधित बातमी समोर आली आहे. हा मोबाइल गेम पुन्हा भारतात पुनरागमन करणार आहे. बीजीएमआयची ही माहिती गेम डेव्हलपर कंपनी KRAFTON नं दिली आहे. क्राफ्टननं स्पष्ट केलं आहे की ते गेम ऑपरेशन भारतात पुन्हा सुरु करणार आहेत. पुढे तुम्ही कंपनीचं निवेदन वाचू शकता.

कंपनीचं विधान

KRAFTON चे सीईओ Sean Hyunil Sohn यांनी अधिकृत निवेदन जाहीर करून सांगितलं आहे की ते BATTLEGROUNDS MOBILE INDIA (BGMI) भारतात रि-लाँच करणार आहेत. गेम पुन्हा लाँच करण्यासोबतच कंपनीच्या सीईओनी आपल्या विधानात भारत सरकार तसेच इंडियन गेमिंग कम्यूनिटीचे आभार व्यक्त केले आहेत.

कधी लाँच होईल बीजीएमआय

BGMI भारतात पुन्हा लाँच होत आहे ही बातमी तर कंपनीनं कंफर्म केली आहे परंतु हा गेम कधी उपलब्ध होईल, ही माहिती अद्याप देण्यात आली नाही. क्राफ्टन सीईओनं सांगितलं आहे की येत्या काही दिवसांत लवकरच हा Mobile Game भारतात डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. आशा आहे की जूनपर्यंत मोबाइल युजर हा गेम भारतात पुन्हा खेळू शकतील.

BGMI वरील बंदीची कारणे

  • डेटा प्रायव्हसी
  • राष्ट्रीय सुरक्षेला धोका
  • लहान मुलांना व्यसन
  • चोरी आणि हिंसा

BATTLEGROUNDS MOBILE INDIA नं भारतात खूप प्रसिद्धी मिळवली होती. परंतु प्रसिद्धीनंतर युजर्सच्या डेटा प्रायव्हसीच्या घटना समोर येऊ लागल्या होत्या. अशा बातम्या आल्या होत्या की ह्या गेमचे सर्व्हर चीनमध्ये आहेत आणि तिथून भारतीयांचा डेटा चोरला जात आहे. युजर्सच्या प्रायव्हसी सोबतच हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक गेम असल्याचं सांगण्यात आलं होतं.

तसेच PUBG Mobile आणि BGMI गेममध्ये अपग्रेड करण्यासाठी तसेच वरच्या लेव्हलवर जाण्यासाठी अनेक युजर्स विचार न करता पैसे खर्च करत होते. मुलं पालकांकडून पैसे चोरत होते. तसेच गेम ना खेळू दिल्यास मुलं हिंसक होत असल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here