Lava Mobiles - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-lava-agni-2-5g-launch-in-india-soon-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-lava-agni-2-5g-launch-in-india-soon-specifications-leaked/#respond Thu, 02 Mar 2023 03:29:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18309 भारतातील टेलिकॉम कंपन्या स्वदेशी आणि नॉन चायनीज बनावटीची उपकरणं वापरून 5G नेटवर्कचा विस्तार करत आहेत. परंतु ते नेटवर्क वापरण्यासाठी चिनी स्मार्टफोन्सना पसंती दिली जात आहे. अशात फक्त इंडियन मोबाइल ब्रँड लावानं Lava Agni 5G स्मार्टफोन सादर करून एक स्वदेशी पर्याय दिला होता. आता बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘अग्नी’ सीरीज अंतगर्त देखील नवीन मोबाइल […]

The post लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Lava Agni 2 5G बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • फोनमध्ये 8GB RAM आणि MediaTek Dimensity 1080 दिला जाऊ शकतो.
  • या लावा मोबाइलची किंमत 20 ते 25 हजार दरम्यान असू शकते.

भारतातील टेलिकॉम कंपन्या स्वदेशी आणि नॉन चायनीज बनावटीची उपकरणं वापरून 5G नेटवर्कचा विस्तार करत आहेत. परंतु ते नेटवर्क वापरण्यासाठी चिनी स्मार्टफोन्सना पसंती दिली जात आहे. अशात फक्त इंडियन मोबाइल ब्रँड लावानं Lava Agni 5G स्मार्टफोन सादर करून एक स्वदेशी पर्याय दिला होता. आता बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘अग्नी’ सीरीज अंतगर्त देखील नवीन मोबाइल सादर करेल जो Lava Agni 2 5G नावानं लाँच होऊ शकतो. ताज्या लीकमधून लाँचपूर्वीच लावा अग्नी 2 5जी फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

Lava Agni 2 5G ची माहिती टिपस्टर पारस गुगलानीच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरनुसार हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे फोनचा मॉडेल नंबर LXX504 असल्याचं सांगण्यात आलं आहे. लिस्टिंगमधून फोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. चर्चा आहे की हा लावा मोबाइल लवकरच भारतात लाँच होऊ शकतो आणि याची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: यंदाही दरवाढीपासून सुटका नाही! एयरटेलचे रिचार्ज प्लॅन महागणार; सुनिल मित्तलनी दिला इशारा

Lava Agni 2 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ 90Hz display
  • 8GB RAM
  • MediaTek Dimensity 1080
  • 50MP Rear camera
  • 16MP Selfie Sensor
  • 44W 5,000mAh battery

समोर आलेल्या माहितीनुसार लावा अग्नी 2 5जी फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 8 जीबी रॅम मिळू शकतो तसेच बाजारात हा फोन एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट्समध्ये एंट्री करू शकतो. हा स्मार्टफोन सर्वात नवीन अँड्रॉइड 13 ओएससह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.

Lava Agni 2 5G फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस फीचरसह येऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G देखील लाँचसाठी सज्ज; फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

लावा अग्नी 2 5जी फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की यात 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. तसेच पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो.

The post लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-lava-agni-2-5g-launch-in-india-soon-specifications-leaked/feed/ 0
Lava ने आणला जगातील पहिला तापमान मोजणारा फोन, स्पर्श न करता बॉडी टेंपरेचर दाखवेल हा स्वस्त इंडियन मोबाईल https://www.91mobiles.com/marathi/lava-pulse-1-feature-phone-launched-with-temperature-measuring-price-rs-1999/ https://www.91mobiles.com/marathi/lava-pulse-1-feature-phone-launched-with-temperature-measuring-price-rs-1999/#respond Tue, 27 Oct 2020 14:39:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8694 भारतीयांचा हा विश्वास अजून वाढवत लावा मोबाईल्सने आज देशात आपला नवीन आणि अनोखा फोन Lava Pulse 1 लॉन्च केला आहे. या फोनची खासियत आहे कि हा infrared thermometer प्रमाणे स्पर्श न करता बॉडी टेंपरेचर मोजू शकतो.

The post Lava ने आणला जगातील पहिला तापमान मोजणारा फोन, स्पर्श न करता बॉडी टेंपरेचर दाखवेल हा स्वस्त इंडियन मोबाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अलीकडेच साइबर मीडिया रिसर्च फर्मचा एका रिपोर्ट समोर आला होता, ज्यात खुलासा केला गेला होता कि देशात इंडियन मोबाईल कंपनी Lava च्या प्रति लोकांचा विश्वास वेगाने वाढत आहे आणि लोक Xiaomi, Realme आणि oppo, vivo ऐवजी Lava कंपनीच्या फोन्स मध्ये रस दाखवत आहेत. भारतीयांचा हा विश्वास अजून वाढवत लावा मोबाईल्सने आज देशात आपला नवीन आणि अनोखा फोन Lava Pulse 1 लॉन्च केला आहे. या फोनची खासियत आहे कि हा infrared thermometer प्रमाणे स्पर्श न करता बॉडी टेंपरेचर मोजू शकतो.

लावाच्या या नवीन फोन Pulse 1 ची सर्वात मोठी खासियत या फोनचे बॉडी टेंपरेचर मोजण्याचे फीचर आहे. जगात हा अशाप्रकारचा पहिला फोन आहे जो स्पर्श न करता शरीराचे तापमान सांगू शकतो. लावा पल्स 1 मध्ये इंफ्रारेड सेंसर देण्यात आला आहे. हा सेंसर व्यक्तीच्या कपाळावर किंवा उलट्या हाताजवळ ठेवावे लागेल आणि काही सेकंदात त्या व्यक्तीचा बॉडी टेंपरेचर येईल. कंपनीनुसार हे फीचर FDA अप्रूव्ड आहे जो 99.9 टक्क्यांपर्यंत अचूक मोजणी करतो.

Lava Pulse 1

फोनचे इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा की-पॅड असलेला फीचर फोन आहे ज्यात टी9 न्यूमरिक कीपॅड देण्यात आली आहे. हा मोबाईल फोन 2.4 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या वरच्या बाजूला स्पीकर आहे तसेच खाली Lava ब्रँडिंग सोबतच कीपॅड आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्याच्या बाजूला स्पीकर आहे. हा फोन पॉलीकार्बोनेट बॉडी वर बनवण्यात आला आहे जो मिलिट्री ग्रेड सर्टिफाइड आहे आणि पडल्यावर तुटत नाही.

Lava Pulse 1 च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो एक वीजीए कॅमेरा आहे. या सेंसरच्या खाली नीचे एलईडी लाईट आहे. कॅमेरा सेटअपच्या बाजूला स्पीकर देण्यात आला आहे. ईमेज फाइल्स आणि गाणी फोन मध्ये स्टोर करण्यासाठी फोन मध्ये 32 जीबी पर्यंतचा माइक्रोएसडी कार्ड वापरून मेमरी वाढवता येते. या फोन मध्ये मनोरंजनसाठी वायरलेस एफएम रेडियो देण्यात आला आहे. हा एक डुअल सिम फोन आहे जो 1,800एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्ज मध्ये हा फीचर फोन 6 दिवस पर्यंतचा बॅकअप देऊ शकतो.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणला पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स वर टाका एक नजर

लावा पल्स 1 चे इतर फीचर्स पाहता यात ऑटो कॉल रिकॉर्डिंग, नंबर टॉकर आणि कॉन्टेक्टसाठी फोटो आइकन्स सारखे ऑप्शन्स देण्यात आले आहेत, जे फीचर फोनला स्मार्ट बनवतात. हा फोन हिंदी आणि इंग्लिश सोबतच गुजराती, पंजाबी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड इत्यादी भारतीय भाषांना पण सपोर्ट करतो. भारतीय बाजारात Lava Pulse 1 फक्त 1,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो रोज गोल्ड कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. लावा पल्स 1 ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वरून विकत घेता येईल.

The post Lava ने आणला जगातील पहिला तापमान मोजणारा फोन, स्पर्श न करता बॉडी टेंपरेचर दाखवेल हा स्वस्त इंडियन मोबाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-pulse-1-feature-phone-launched-with-temperature-measuring-price-rs-1999/feed/ 0
Lava घेऊन येत आहे 5 नवीन स्वस्त ‘इंडियन’ फोन, चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी लो बजेट मध्ये होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lava-mobiles-to-launch-5-new-low-budget-smartphone-in-india-xiaomi-realme-oppo-vivo/ https://www.91mobiles.com/marathi/lava-mobiles-to-launch-5-new-low-budget-smartphone-in-india-xiaomi-realme-oppo-vivo/#respond Wed, 30 Sep 2020 12:35:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8356 Lava संबंधित एक मोठी बातमी समोर आला आहे, त्यानुसार हि भारतीय कंपनी येत्या काही दिवसांत भारतात 5 नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची प्लानिंग करत आहे.

The post Lava घेऊन येत आहे 5 नवीन स्वस्त ‘इंडियन’ फोन, चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी लो बजेट मध्ये होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lava Mobiles स्मार्टफोन मार्केट मधील निवडक भारतीय मोबाईल कंपन्यांपैकी एक आहे. इंडियन स्मार्टफोन मार्केट वर पूर्णपणे चीनी कंपन्यांचे राज्य आहे आणि परदेशी ब्रँड्सचे प्रोडक्ट्स पण देशात यूजर्स द्वारे वापरले जातात, हे आता काही गुपित राहिलेले नाही. कधीतरी आवाज उठवला जातो कि भारतीय कंपन्यात चांगले प्रोडक्ट्स घेऊन येत नाही आणि त्यामुळे विदेशी कंपन्या निवडावा लागतात. पण आता वाटत आहे कि लावा कंपनी देशातील ग्राहकांच्या तक्रारी सोडवणार आहे.

Lava संबंधित एक मोठी बातमी समोर आला आहे, त्यानुसार हि भारतीय कंपनी येत्या काही दिवसांत भारतात 5 नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची प्लानिंग करत आहे. द मोबाईल इंडियनच्या रिपोर्टनुसार लावा मोबाईल्स नोव्हेंबर मध्ये हे पाच नवीन स्मार्टफोन बाजारात घेऊन येईल. हे सर्व Lava स्मार्टफोन लो बजेट मधेच लॉन्च केले जातील, त्यातले 4 स्मार्टफोन्सची किंमत 10,000 रुपयांपेक्षा पण कमी असेल, तसेच यातील एक फोन यापेक्षा जास्त किंमतीत मार्केट मध्ये एंट्री घेईल.

लावाने आपल्या आगामी पाचही स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत, पण आशा आहे कि यातील काही फोन लावाच्या ‘झेड सीरीज’ मध्ये जोडले जातील. रिपोर्टनुसार लावाने दावा केला आहे कि हे सर्व 5 स्मार्टफोन पूर्णपणे मेक इन इंडिया असतील आणि याची निर्मिती भारतात केली जाईल. Lava Mobiles च्या या आगामी स्मार्टफोन्सना Xiaomi, Realme, Tecno, Infinix सोबतच लो बजेट मध्ये Samsung आणि Vivo कडून पण टक्कर मिळणार मिलने वाली आहे.

LAVA Z66

लावा झेड66 ‘मेड इन इंडिया’ फोन आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनीने हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.08 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. LAVA Z66 डिस्प्ले 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे.

LAVA Z66 एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर Unisoc प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लावा झेड66 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबतच 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर उपलब्द आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी लावा झेड66 फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

लावा झेड66 एक डुअल सिम फोन आहे ज्यात 128 जीबी पर्यंतचा माइक्रोएसडी कार्ड वापरता येतो. 4जी वोएलटीई व अइतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी LAVA Z66 मध्ये 3,950एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. लावा झेड66 फ्लिपकार्ट वर 7,899 रुपयांमध्ये विक्री साठी उपलब्ध आहे.

The post Lava घेऊन येत आहे 5 नवीन स्वस्त ‘इंडियन’ फोन, चायनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी लो बजेट मध्ये होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-mobiles-to-launch-5-new-low-budget-smartphone-in-india-xiaomi-realme-oppo-vivo/feed/ 0
6,299 रुपयांमध्ये लॉन्च झाला Lava Z71, बघा या स्वस्त फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/lava-z71-launched-in-india-price-rs-6299-dual-rear-camera-google-assistant-key/ https://www.91mobiles.com/marathi/lava-z71-launched-in-india-price-rs-6299-dual-rear-camera-google-assistant-key/#respond Thu, 16 Jan 2020 12:37:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6307 लावा झेड71 मध्ये 3,200एमएएच ची बॅटरी आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्ज मध्ये 1.5 दिवस चालू शकते.

The post 6,299 रुपयांमध्ये लॉन्च झाला Lava Z71, बघा या स्वस्त फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lava चे नाव त्या निवडक स्मार्टफोन ब्रँडस मध्ये येते जे स्वस्त बजेट मध्ये शानदार स्मार्टफोन बनवतात. इंडियन मार्केटच्या एका खास गटाला करणाऱ्या या भारतीय टेक कंपनीने आज देशात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन आणला आहे. लावा ने इंडियन मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘झेड सीरीज’ अंतर्गत Lava Z71 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. लो बजेट मध्ये आला Lava Z71 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. कंपनीने लावा झेड71 6,299 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध आहे.

लुक व डिजाईन

Lava Z71 कपंनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनल वर तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला रुंद बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. लावा झेड71 च्या बॅक पॅनल वर उजवीकडे डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे.

Lava Z71 च्या बॅक पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच खालच्या बाजूला स्पीकर आहे. लावा झेड71 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर कंपनीने वेगळी Google Assistant key प्लेस केली आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन स्टील ब्लू आणि रूबी रेड कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

स्पेसिफिकेशन्स

LAVA Z71 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इचाच्या एचडी+ डॉटनॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. लावा झेड71 एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड क्वॉडकोर प्रोसेसर सह 16एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हीलियो ए22 चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये आईएमजी जीई8300 आहे.

लावा झेड71 2 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

LAVA Z71 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी लावा झेड71 मध्ये 3,200एमएएच ची बॅटरी आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्ज मध्ये 1.5 दिवस चालू शकते. LAVA Z71 6,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 6,299 रुपयांमध्ये लॉन्च झाला Lava Z71, बघा या स्वस्त फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-z71-launched-in-india-price-rs-6299-dual-rear-camera-google-assistant-key/feed/ 0