
Xiaomi सबब्रँड Redmi नं आपल्या ‘नोट 12 सीरीज’ अंतगर्त तीन मोबाइल फोन भारतात लाँच केले आहेत जे Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G नावाने सेलसाठी उपलब्ध आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12 4G लाँच करू शकते. नवीन लीकमध्ये नोट 12 4जी फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
Redmi Note 12 4G संबंधित हा लीक स्नूपीटेकनं शेयर केला आहे. या टिपस्टरनं आपल्या ट्वीटर हँडलवर रेडमी नोट 12 सीरीजचा एक पोस्टर अपलोड केला आहे ज्यात चार मोबाइल फोन दाखवण्यात आले आहेत. यात Redmi Note 12 5G, Pro आणि Pro+ सह Note 12 4G चा देखील समावेश आहे. हा नवीन फोन आहे जो अजून ग्लोबली लाँच झाला नाही. आशा आहे की कंपनी येत्या काही दिवसांत हा स्मार्टफोन भारतात सादर करेल. हे देखील वाचा: उन्हात रंग बदलणारा मोबाइल फोन Vivo V27 5G आला भारतात; इतकी आहे किंमत
Redmi Note 12 4G चे लीक स्पेसिफिकेशन्स
- 6.67″ 120Hz AMOLED display
- 50MP Triple Rear Camera
- 6nm Qualcomm Snapdragon
- 4GB RAM + 128 GB Storage
- 33W 5,000mAh battery
समोर आलेल्या माहितीनुसार, रेडमी नोट 12 4जी फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते. फोटोवरून स्पष्ट झालं आहे की यात पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल ज्यात सेल्फी कॅमेरा असलेला होल वरच्या बाजूला मध्यभागी दिला जाईल.
Redmi Note 12 4G बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह लाँच केला जाईल जो 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला असू शकतो. नाव समोर आले नसले तरी चर्चा आहे की हा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट असू शकतो. या फोनमध्ये लेटेस्ट मीयुआय 14 दिला जाऊ शकतो. तसेच लीकमध्ये फोनचा 4जीबी रॅम रॅम व्हेरिएंट समोर आला आहे जोडीला 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
फोटोग्राफीसाठी या रेडमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. समोर आलेल्या डिटेलनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो, जोडीला 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 12 4G मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. हे देखील वाचा: यंदाही दरवाढीपासून सुटका नाही! एयरटेलचे रिचार्ज प्लॅन महागणार; सुनिल मित्तलनी दिला इशारा
Redmi Note 12 4G मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. हा मोबाइल फोन आयपी53 रेटेड असू शकतो. फोनमध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ व वायफाय सारखे फीचर्स मिळू शकतात. रिपोर्टनुसार हा मोबाइल फोन Onyx Gray, Ice Blue आणि Mint Green कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

















