6,299 रुपयांमध्ये लॉन्च झाला Lava Z71, बघा या स्वस्त फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Lava चे नाव त्या निवडक स्मार्टफोन ब्रँडस मध्ये येते जे स्वस्त बजेट मध्ये शानदार स्मार्टफोन बनवतात. इंडियन मार्केटच्या एका खास गटाला करणाऱ्या या भारतीय टेक कंपनीने आज देशात आपला अजून एक नवीन स्मार्टफोन आणला आहे. लावा ने इंडियन मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘झेड सीरीज’ अंतर्गत Lava Z71 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. लो बजेट मध्ये आला Lava Z71 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. कंपनीने लावा झेड71 6,299 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध आहे.

लुक व डिजाईन

Lava Z71 कपंनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनल वर तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला रुंद बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मधोमध ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. लावा झेड71 च्या बॅक पॅनल वर उजवीकडे डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे.

Lava Z71 च्या बॅक पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच खालच्या बाजूला स्पीकर आहे. लावा झेड71 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर कंपनीने वेगळी Google Assistant key प्लेस केली आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन स्टील ब्लू आणि रूबी रेड कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

स्पेसिफिकेशन्स

LAVA Z71 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इचाच्या एचडी+ डॉटनॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. लावा झेड71 एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड क्वॉडकोर प्रोसेसर सह 16एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हीलियो ए22 चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये आईएमजी जीई8300 आहे.

लावा झेड71 2 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

LAVA Z71 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी लावा झेड71 मध्ये 3,200एमएएच ची बॅटरी आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्ज मध्ये 1.5 दिवस चालू शकते. LAVA Z71 6,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here