Moto G53 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 09:19:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Moto G73 5G आणि Moto G53 5G जागतिक बाजारात लाँच https://www.91mobiles.com/marathi/moto-g73-5g-moto-g53-5g-launched-with-50mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g73-5g-moto-g53-5g-launched-with-50mp-camera/#respond Wed, 25 Jan 2023 05:50:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17223 Motorola नं जागतिक बाजारात एकाच वेळी पाच स्मार्टफोन सादर केले आहेत. ज्यात Moto G73 5G, Moto G53 5G, Moto G23, Moto G13 आणि Moto E13 चा समावेश आहे. यातील दोन 5G Phones कंपनीनं IP52 स्प्लॅश रेजिस्टन्स, 6.5 इंच डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह सादर केले आहेत. यांची किंमत आणि इतर स्पेक्स थोडे वेगळे आहेत. […]

The post Moto G73 5G आणि Moto G53 5G जागतिक बाजारात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Moto G73 5G फोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे.
  • Moto G53 5G स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा मिळतो.
  • हे स्मार्टफोन IP52 स्प्लॅश रेजिस्टन्ससह बाजारात आला आहेत.

Motorola नं जागतिक बाजारात एकाच वेळी पाच स्मार्टफोन सादर केले आहेत. ज्यात Moto G73 5G, Moto G53 5G, Moto G23, Moto G13 आणि Moto E13 चा समावेश आहे. यातील दोन 5G Phones कंपनीनं IP52 स्प्लॅश रेजिस्टन्स, 6.5 इंच डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह सादर केले आहेत. यांची किंमत आणि इतर स्पेक्स थोडे वेगळे आहेत. चला जाणून घेऊया या मोटोरोला स्मार्टफोनची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती.

Moto G73 5G आणि Moto G53 5G Price

Moto G73 5G स्मार्टफोन लुसेन्ट व्हाईट आणि मिडनाइट ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनची किंमत 300 युरो (सुमारे 26,670 रुपये) ठेवण्यात आली आहे, ज्यात 8GB रॅम व 256GB स्टोरेज मिळते. तर Moto G53 5G चे ब्लू, आर्टिक सिल्वर आणि पेल पिंक कलर व्हेरिएंट आले आहेत. या हँडसेटसाठी 250 युरो (सुमारे 22,230 रुपये) मोजावे लागतील, ही 4GB रॅम 128GB स्टोरेजची किंमत आहे.

Moto G73 5G Specifications

  • 6.5″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB storage
  • MediaTek Dimensity 930
  • 16MP Selfie Camera
  • 50MP Dual Rear Camera
  • 30W 5,000mAh battery

मोटो जी73 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन पंच-होल स्टाईलसह आला ज्यात एलसीडी पॅनलचा वापर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 405पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 161.42 x 73.84 x 8.29एमएम आणि वजन 181ग्राम आहे.

Moto G73 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 930 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आयएमजी बीएक्सएम-8-256 जीपीयू आहे. हा फोन 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी मोटो जी73 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Motorola Moto G73 5G फोनमध्ये 12 5जी बँडचा सपोर्ट देण्यात आले आहेत तसेच या मोबाइलमध्ये 4जी नेटवर्क देखील वापरता येतं. एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सारखे शानदार फीचर्स यात आहेत. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोटोरोला फोन 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 100MP Camera असेलल्या OPPO Reno 8T च्या भारतीय किंमतीचा खुलासा; पाहा तुमच्या बजेटमध्ये येतोय का

Moto G53 5G Specifications

  • 6.5″ FHD+ 120Hz Display
  • 4GB RAM + 128GB storage
  • Snapdragon 480+
  • 16MP Selfie Camera
  • 50MP Dual Rear Camera
  • 10W 5,000mAh battery

मोटो जी53 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे. कंपनीनं या एलसीडी डिस्प्लेयामध्ये पंच-होल स्टाईलचा वापर केला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 162.7 x 74.66x 8.19एमएम आणि वजन 183ग्राम आहे.

Moto G53 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या स्नॅपड्रॅगन 480+ ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आयएमजी अ‍ॅड्रीनो 619 जीपीयू आहे. हा फोन 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी मोटो जी53 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. समोर एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: हार्दिक पंड्या वापरत असलेल्या मोबाइलचे नाव माहित आहे का? जाणून घ्या रॅम आणि प्रोसेसरविषयी

Motorola Moto G53 5G फोनमध्ये 5जीसह 4जी देखील वापरता येतं. एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि स्टिरियो स्पीकरचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपसाठी हा मोटोरोला फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Moto G73 5G आणि Moto G53 5G जागतिक बाजारात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g73-5g-moto-g53-5g-launched-with-50mp-camera/feed/ 0
Moto G53 5G लाँच पूर्वीच झाला GCF वेबसाइटवर लिस्ट; ग्लोबली होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/moto-g53-5g-phone-to-launch-soon-in-global-market-with-snapdragon-4-gen-1/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g53-5g-phone-to-launch-soon-in-global-market-with-snapdragon-4-gen-1/#respond Thu, 12 Jan 2023 06:30:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16806 मोटोरोला कंपनीनं गेल्यावर्षी आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘जी’ सीरीज अंतगर्त Moto G53 5G फोन सादर केला होता. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की हा मोबाइल फोन लवकरच जागतिक बाजारात देखील सेलसाठी उपलब्ध होईल. आता हाच मोटोरोला स्मार्टफोन GCF (Global Certification Forum) वर देखील लिस्ट झाला आहे. ग्लोबली लाँच होणाऱ्या मोटो जी53 5जी स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत चायना […]

The post Moto G53 5G लाँच पूर्वीच झाला GCF वेबसाइटवर लिस्ट; ग्लोबली होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Moto G53 5G फोन बेहद जल्द चीन के बाहर ग्लोबली लाँच होऊ शकतो.
  • हा मोबाइल फोन Global Certification Forum वर लिस्ट झाला आहे.
  • फोन के ग्लोबल मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेट दिला जाऊ शकतो.

मोटोरोला कंपनीनं गेल्यावर्षी आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘जी’ सीरीज अंतगर्त Moto G53 5G फोन सादर केला होता. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की हा मोबाइल फोन लवकरच जागतिक बाजारात देखील सेलसाठी उपलब्ध होईल. आता हाच मोटोरोला स्मार्टफोन GCF (Global Certification Forum) वर देखील लिस्ट झाला आहे. ग्लोबली लाँच होणाऱ्या मोटो जी53 5जी स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत चायना मॉडेल पेक्षा वेगळा असेल, अशी चर्चा आहे.

Moto G53 5G फोन GCF म्हणजे ग्लोबल सर्टिफिकेशन फोरम वर XT2335-1 मॉडेल नंबरसह दिसला आहे. या लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की हा मोटोरोला फोन आता लवकरच ग्लोबली लाँच होऊ शकतो. लिस्टिंगमध्ये कोणत्याही लाँच डेटचा उल्लेख करण्यात आलेला नाही परंतु या सर्टिफिकेशननंतर आशा व्यक्त केली जात आहे की येत्या काही आठवड्यांमध्ये मोटोरोला आपला हा लो बजेट 5जी फोन जागतिक बाजारात उपलब्ध करू शकते.

Moto G53 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • Snapdragon 4 Gen 1
  • 50MP Triple Rear Camera
  • 6.5 120Hz Display
  • 18W 5,000mAh Battery

ग्लोबल मार्केटमध्ये लाँच होणारा मोटो जी53 5जी फोन चीनमधील मॉडेल पेक्षा वेगळा असू शकतो. या दोन्ही व्हर्जनमध्ये एक मोठा फरक प्रोसेसरचा असू शकतो. चीनमध्ये हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 480प्लस चिपसेटवर लाँच झाला होता. क्वॉलकॉमनं हा प्रोसेसर अद्याप चायनाच्या बाहेर ऑफिशियल केला नाही. त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये येणाऱ्या Moto G53 5G मध्ये हा चिपसेट मिळणार नाही. त्यामुळे मोटोरोला आपला या स्वस्त 5जी फोनचा ग्लोबल मॉडेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेटवर लाँच करू शकते.

चिपसेट सोबतच दोन्ही मॉडेल्सच्या कॅमेरा सेग्मेंटमध्ये बदल केला जाऊ शकतो. चीनमध्ये मोटो जी53 5जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. परंतु फोनचा ग्लोबल मॉडेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपवर लाँच केला जाऊ शकतो. या व्हर्जनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ किंवा मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो.

Moto G53 5G ग्लोबल मार्केटमध्ये 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंच पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो एलसीडी पॅनल असू शकतो, तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित माययुआय 5.0 वर एंट्री करू शकतो. सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन दिलं जाऊ शकतं. तसेच पावर बॅकअपसाठी Moto G53 5G मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.

The post Moto G53 5G लाँच पूर्वीच झाला GCF वेबसाइटवर लिस्ट; ग्लोबली होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g53-5g-phone-to-launch-soon-in-global-market-with-snapdragon-4-gen-1/feed/ 0
Snapdragon 4 Gen 1, 50MP ट्रिपल कॅमेऱ्यासह Moto G53 5G येऊ शकतो https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-qualcomm-snapdragon-4-gen-1-phone-moto-g53-5g-global-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-qualcomm-snapdragon-4-gen-1-phone-moto-g53-5g-global-specifications-leaked/#respond Thu, 22 Dec 2022 05:15:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16241 Motorola नं गेल्या आठवड्यात चीनमध्ये Moto X40 आणि Moto G53 5G फोन लाँच केले आहेत. यातील एक्स40 कंपनीचा फ्लॅगशिप फोन असून यात हायएन्ड स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. दुसरीकडे जी53 एक लो बजेट 5जी फोन आहे जो जवळपास 10 हजारांच्या रेंज मध्ये आला आहे. हा स्वस्त मोबाइल 50MP Dual Real Camera आणि Qualcomm Snapdragon 480+ चिपसेटला […]

The post Snapdragon 4 Gen 1, 50MP ट्रिपल कॅमेऱ्यासह Moto G53 5G येऊ शकतो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola नं गेल्या आठवड्यात चीनमध्ये Moto X40 आणि Moto G53 5G फोन लाँच केले आहेत. यातील एक्स40 कंपनीचा फ्लॅगशिप फोन असून यात हायएन्ड स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. दुसरीकडे जी53 एक लो बजेट 5जी फोन आहे जो जवळपास 10 हजारांच्या रेंज मध्ये आला आहे. हा स्वस्त मोबाइल 50MP Dual Real Camera आणि Qualcomm Snapdragon 480+ चिपसेटला सपोर्ट करू शकतो. या मोटोरोला स्मार्टफोनबद्दल आता बातमी येत आहे की कंपनी Moto G53 5G ग्लोबल मार्केटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 4 Gen 1 चिपसेटसह सादर करण्याची योजना बनवत आहे.

Moto G53 5G ग्लोबल मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो परंतु चिनी मॉडेलपेक्षा वेगळा असू शकतो. टिपस्टर योगेश बरारनं या फोनच्या ग्लोबल व्हर्जनची माहिती दिली आहे. त्यानुसार, चीनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480प्लस चिपसेटसह येणारा हा फोन चीनच्या बाहेर Moto G53 5G स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेटसह एंट्री करू शकतो. प्रोसेसर व्यतिरिक्त दुसरा मोठा बदल या फोनच्या कॅमेरा सेग्मेंटमध्ये दिसू शकतो. हे देखील वाचा: 9 हजारांच्या रेंजमध्ये 7000mAh ची बॅटरी दणकट बॅटरी असलेला फोन; 11GB RAM असलेल्या फोनच्या किंमतीत कपात

चिनी मोटो जी53 5जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. परंतु ग्लोबल मॉडेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल असा दावा टिपस्टरनं केला आहे. या आगामी व्हर्जनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर दिला जाऊ शकतो जो डेप्थ किंवा मॅक्रो सेन्सर असू शकतो.

चीनमध्ये Moto G53 5G चे स्पेसिफिकेशन्स

चीनमध्ये आलेल्या Moto G53 स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टकोर चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 8GB RAM आणि 128GB storage मिळते, ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हा Android 13 आधारित MyUX वर चालतो. हे देखील वाचा: Redmi Note 12 Pro+ ची भारतीय किंमत लीक; इतक्या रुपयांमध्ये लाँच होईल हा 200MP Camera Phone

Moto G53 च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP ची सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. तर फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. Moto G53 मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट मिळतो. तर सिक्योरिटीसाठी कंपनीनं साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला आहे.

The post Snapdragon 4 Gen 1, 50MP ट्रिपल कॅमेऱ्यासह Moto G53 5G येऊ शकतो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-qualcomm-snapdragon-4-gen-1-phone-moto-g53-5g-global-specifications-leaked/feed/ 0