Snapdragon 4 Gen 1, 50MP ट्रिपल कॅमेऱ्यासह Moto G53 5G येऊ शकतो

Motorola नं गेल्या आठवड्यात चीनमध्ये Moto X40 आणि Moto G53 5G फोन लाँच केले आहेत. यातील एक्स40 कंपनीचा फ्लॅगशिप फोन असून यात हायएन्ड स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. दुसरीकडे जी53 एक लो बजेट 5जी फोन आहे जो जवळपास 10 हजारांच्या रेंज मध्ये आला आहे. हा स्वस्त मोबाइल 50MP Dual Real Camera आणि Qualcomm Snapdragon 480+ चिपसेटला सपोर्ट करू शकतो. या मोटोरोला स्मार्टफोनबद्दल आता बातमी येत आहे की कंपनी Moto G53 5G ग्लोबल मार्केटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 4 Gen 1 चिपसेटसह सादर करण्याची योजना बनवत आहे.

Moto G53 5G ग्लोबल मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो परंतु चिनी मॉडेलपेक्षा वेगळा असू शकतो. टिपस्टर योगेश बरारनं या फोनच्या ग्लोबल व्हर्जनची माहिती दिली आहे. त्यानुसार, चीनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480प्लस चिपसेटसह येणारा हा फोन चीनच्या बाहेर Moto G53 5G स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेटसह एंट्री करू शकतो. प्रोसेसर व्यतिरिक्त दुसरा मोठा बदल या फोनच्या कॅमेरा सेग्मेंटमध्ये दिसू शकतो. हे देखील वाचा: 9 हजारांच्या रेंजमध्ये 7000mAh ची बॅटरी दणकट बॅटरी असलेला फोन; 11GB RAM असलेल्या फोनच्या किंमतीत कपात

चिनी मोटो जी53 5जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. परंतु ग्लोबल मॉडेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल असा दावा टिपस्टरनं केला आहे. या आगामी व्हर्जनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर दिला जाऊ शकतो जो डेप्थ किंवा मॅक्रो सेन्सर असू शकतो.

चीनमध्ये Moto G53 5G चे स्पेसिफिकेशन्स

चीनमध्ये आलेल्या Moto G53 स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टकोर चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 8GB RAM आणि 128GB storage मिळते, ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हा Android 13 आधारित MyUX वर चालतो. हे देखील वाचा: Redmi Note 12 Pro+ ची भारतीय किंमत लीक; इतक्या रुपयांमध्ये लाँच होईल हा 200MP Camera Phone

Moto G53 च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP ची सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. तर फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. Moto G53 मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट मिळतो. तर सिक्योरिटीसाठी कंपनीनं साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here