Moto G73 5G आणि Moto G53 5G जागतिक बाजारात लाँच

Highlights

  • Moto G73 5G फोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे.
  • Moto G53 5G स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा मिळतो.
  • हे स्मार्टफोन IP52 स्प्लॅश रेजिस्टन्ससह बाजारात आला आहेत.

Motorola नं जागतिक बाजारात एकाच वेळी पाच स्मार्टफोन सादर केले आहेत. ज्यात Moto G73 5G, Moto G53 5G, Moto G23, Moto G13 आणि Moto E13 चा समावेश आहे. यातील दोन 5G Phones कंपनीनं IP52 स्प्लॅश रेजिस्टन्स, 6.5 इंच डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह सादर केले आहेत. यांची किंमत आणि इतर स्पेक्स थोडे वेगळे आहेत. चला जाणून घेऊया या मोटोरोला स्मार्टफोनची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती.

Moto G73 5G आणि Moto G53 5G Price

Moto G73 5G स्मार्टफोन लुसेन्ट व्हाईट आणि मिडनाइट ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनची किंमत 300 युरो (सुमारे 26,670 रुपये) ठेवण्यात आली आहे, ज्यात 8GB रॅम व 256GB स्टोरेज मिळते. तर Moto G53 5G चे ब्लू, आर्टिक सिल्वर आणि पेल पिंक कलर व्हेरिएंट आले आहेत. या हँडसेटसाठी 250 युरो (सुमारे 22,230 रुपये) मोजावे लागतील, ही 4GB रॅम 128GB स्टोरेजची किंमत आहे.

Moto G73 5G Specifications

  • 6.5″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB storage
  • MediaTek Dimensity 930
  • 16MP Selfie Camera
  • 50MP Dual Rear Camera
  • 30W 5,000mAh battery

मोटो जी73 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन पंच-होल स्टाईलसह आला ज्यात एलसीडी पॅनलचा वापर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 405पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 161.42 x 73.84 x 8.29एमएम आणि वजन 181ग्राम आहे.

Moto G73 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 930 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आयएमजी बीएक्सएम-8-256 जीपीयू आहे. हा फोन 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी मोटो जी73 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Motorola Moto G73 5G फोनमध्ये 12 5जी बँडचा सपोर्ट देण्यात आले आहेत तसेच या मोबाइलमध्ये 4जी नेटवर्क देखील वापरता येतं. एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सारखे शानदार फीचर्स यात आहेत. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोटोरोला फोन 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 100MP Camera असेलल्या OPPO Reno 8T च्या भारतीय किंमतीचा खुलासा; पाहा तुमच्या बजेटमध्ये येतोय का

Moto G53 5G Specifications

  • 6.5″ FHD+ 120Hz Display
  • 4GB RAM + 128GB storage
  • Snapdragon 480+
  • 16MP Selfie Camera
  • 50MP Dual Rear Camera
  • 10W 5,000mAh battery

मोटो जी53 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे. कंपनीनं या एलसीडी डिस्प्लेयामध्ये पंच-होल स्टाईलचा वापर केला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 162.7 x 74.66x 8.19एमएम आणि वजन 183ग्राम आहे.

Moto G53 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या स्नॅपड्रॅगन 480+ ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आयएमजी अ‍ॅड्रीनो 619 जीपीयू आहे. हा फोन 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी मोटो जी53 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. समोर एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: हार्दिक पंड्या वापरत असलेल्या मोबाइलचे नाव माहित आहे का? जाणून घ्या रॅम आणि प्रोसेसरविषयी

Motorola Moto G53 5G फोनमध्ये 5जीसह 4जी देखील वापरता येतं. एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि स्टिरियो स्पीकरचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपसाठी हा मोटोरोला फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here