7000mAh च्या दणकट बॅटरीसह असलेल्या TECNO POVA 3 च्या किंमतीत कपात

टेक ब्रँड टेक्नो आपल्या स्वस्त स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीनं भारतात आपला लो बजेट स्मार्टफोन TECNO POVA 3 लाँच केला होता. यातील 7000mAh ची बॅटरी ही मोठी खासियत आहे. तसेच हा मोबाइल 50MP Triple rear camera आणि MediaTek Helio G88 चिपसेटला सपोर्ट करतो. लाँचच्या वेळी TECNO POVA 3 ची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली होती, परंतु आता ग्राहकांना नवीन इंग्रजी वर्षाची भेट देत कंपनीनं या फोनच्या किंमतीत थेट 2,000 रुपयांची कपात केली आहे. प्राइस कट नंतर टेक्नो पोवा 3 फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

TECNO POVA 3 ची नवीन किंमत

2 हजार रुपयांच्या प्राइस कटनंतर टेक्नो पोवा 3 ची किंमत आता फक्त 9,999 रुपये झाली आहे. ही किंमत फोनच्या 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेेरिएंटची आहे जो शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर नवीन किंमतीसह सेलसाठी उपलब्ध झाला आहे. TECNO POVA 3 स्मार्टफोन Tech Silver, Eco Black आणि Electric Blue कलरमध्ये विकत घेता येईल जो 10 हजारांच्या बजेटमधील स्वस्त स्मार्टफोन्स पैकी एक बेस्ट ऑप्शन म्हणता येईल. बँक ऑफर अंतर्गत तुम्ही आणखी डिस्काउंट देखील मिळवू शकता. हे देखील वाचा: Redmi Note 12 Pro+ ची भारतीय किंमत लीक; इतक्या रुपयांमध्ये लाँच होईल हा 200MP Camera Phone

TECNO Pova 3 चे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो पोवा 3 स्मार्टफोनमध्ये 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.9 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. हा स्मार्टफोन रॅम फ्यूजन टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे फोनमधील 4जीबी इंटरनल रॅममध्ये 7जीबी एक्स्ट्रा रॅम देखील जोडता येतो. या टेक्नॉलॉजीमुळे टेक्नो मोबाइल 11जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो.

TECNO Pova 3 फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला दोन 2 मेगापिक्सलच्या लेन्स आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनच्या फ्रंट पॅनलवर ड्युअल एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. हे देखील वाचा: एकच WhatsApp नंबर 2 फोनवर एकाचवेळी कसा वापरायचा? जाणून घ्या नवी आणि सेफ पद्धत

सिक्योरिटीसाठी टेक्नो पोवा 3 च्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर इम्बेडेड पावर बटन आहे, तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरलाही सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 7,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here