POCO X5 आणि POCO X5 Pro लवकरच येऊ शकतात भारतात; गिकबेंचवर झाला लिस्ट

Highlights

  • POCO X5 बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • हा फोन 8GB RAM सह बाजारात येईल.
  • पोको एक्स3 Qualcomm Snapdragon 695 सह येऊ शकतो.

पोको एक्स5 सीरीज भारतात येण्यासाठी तयार आहे. कंपनीनं सांगितलं नसलं तरी लवकरच POCO X5 आणि POCO X5 Pro भारतात लाँच केले जातील. सध्या रोज या मोबाइल फोन्स संबंधित लीक्स समोर येत आहेत. विशेष म्हणजे यातील POCO X5 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या हातात दिसला होता. जो आता बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमधून फोनच्या महत्वाच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

पोको एक्स5 स्मार्टफोनची ही गीकबेंच लिस्टिंग 22 जानेवारीची आहे. इथे फोन 22111317PG मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. यात फोनच्या नावाचा उल्लेख नाही परंतु चर्चा आहे की हा मोबाइल मार्केटमध्ये POCO X5 नावानं एंट्री करेल. बेंचमार्क स्कोर पाहता याला सिंगल-कोर मध्ये 693 आणि मल्टी-कोर मध्ये 2113 स्कोर मिळाला आहे. हे देखील वाचा: How To Start DigiLocker: पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स सारखे महत्वाचे ठेवा फोनमध्ये; काही स्टेप्समध्ये सुरु करा डिजीलॉकर

POCO X5 Specifications

  • 6.7″ FHD+ AMOLED डिस्प्ले
  • 120Hz Refresh Rate
  • Qualcomm Snapdragon 695
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 33W 5,000mAh battery

गीकबेंचवर पोको एक्स5 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसरसह येऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे जो 2.21गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर काम करू शकतो. तसेच ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये एड्रेनो 619 जीपीयू असल्याचं दिसलं आहे. गीकबेंचवर हा मोबाइल फोन 8जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे. लिस्टिंग नुसार हा फोन अँड्रॉइड 12 ओएससह बाजारात येऊ शकतो.

POCO X5 संबंधित लीक पाहता अशी चर्चा आहे की हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच होऊ शकतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. तसेच या पोको फोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकते जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला असू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. हे देखील वाचा: 100MP Camera असेलल्या OPPO Reno 8T च्या भारतीय किंमतीचा खुलासा; पाहा तुमच्या बजेटमध्ये येतोय का

फोटोग्राफीसाठी पोको एक्स5 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. लीकनुसार या फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलची फ्रंट लेन्स मिळू शकते. POCO X5 च्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी फोन लाँचची वाट पाहावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here