Moto G53 5G लाँच पूर्वीच झाला GCF वेबसाइटवर लिस्ट; ग्लोबली होऊ शकतो लाँच

Highlights

  • Moto G53 5G फोन बेहद जल्द चीन के बाहर ग्लोबली लाँच होऊ शकतो.
  • हा मोबाइल फोन Global Certification Forum वर लिस्ट झाला आहे.
  • फोन के ग्लोबल मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेट दिला जाऊ शकतो.

मोटोरोला कंपनीनं गेल्यावर्षी आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘जी’ सीरीज अंतगर्त Moto G53 5G फोन सादर केला होता. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की हा मोबाइल फोन लवकरच जागतिक बाजारात देखील सेलसाठी उपलब्ध होईल. आता हाच मोटोरोला स्मार्टफोन GCF (Global Certification Forum) वर देखील लिस्ट झाला आहे. ग्लोबली लाँच होणाऱ्या मोटो जी53 5जी स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत चायना मॉडेल पेक्षा वेगळा असेल, अशी चर्चा आहे.

Moto G53 5G फोन GCF म्हणजे ग्लोबल सर्टिफिकेशन फोरम वर XT2335-1 मॉडेल नंबरसह दिसला आहे. या लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की हा मोटोरोला फोन आता लवकरच ग्लोबली लाँच होऊ शकतो. लिस्टिंगमध्ये कोणत्याही लाँच डेटचा उल्लेख करण्यात आलेला नाही परंतु या सर्टिफिकेशननंतर आशा व्यक्त केली जात आहे की येत्या काही आठवड्यांमध्ये मोटोरोला आपला हा लो बजेट 5जी फोन जागतिक बाजारात उपलब्ध करू शकते.

Moto G53 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • Snapdragon 4 Gen 1
  • 50MP Triple Rear Camera
  • 6.5 120Hz Display
  • 18W 5,000mAh Battery

ग्लोबल मार्केटमध्ये लाँच होणारा मोटो जी53 5जी फोन चीनमधील मॉडेल पेक्षा वेगळा असू शकतो. या दोन्ही व्हर्जनमध्ये एक मोठा फरक प्रोसेसरचा असू शकतो. चीनमध्ये हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 480प्लस चिपसेटवर लाँच झाला होता. क्वॉलकॉमनं हा प्रोसेसर अद्याप चायनाच्या बाहेर ऑफिशियल केला नाही. त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये येणाऱ्या Moto G53 5G मध्ये हा चिपसेट मिळणार नाही. त्यामुळे मोटोरोला आपला या स्वस्त 5जी फोनचा ग्लोबल मॉडेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेटवर लाँच करू शकते.

चिपसेट सोबतच दोन्ही मॉडेल्सच्या कॅमेरा सेग्मेंटमध्ये बदल केला जाऊ शकतो. चीनमध्ये मोटो जी53 5जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. परंतु फोनचा ग्लोबल मॉडेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपवर लाँच केला जाऊ शकतो. या व्हर्जनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ किंवा मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो.

Moto G53 5G ग्लोबल मार्केटमध्ये 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंच पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो एलसीडी पॅनल असू शकतो, तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित माययुआय 5.0 वर एंट्री करू शकतो. सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन दिलं जाऊ शकतं. तसेच पावर बॅकअपसाठी Moto G53 5G मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here