Nokia X30 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 11:47:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अरारारा खतरनाक! फोनवर तीन वर्षांची वॉरंटी; Nokia X30 5G च्या भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-sale-in-india-start-from-20-febuary/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-sale-in-india-start-from-20-febuary/#respond Wed, 15 Feb 2023 09:32:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17836 HMD Global India VP, Sanmeet S Kochhar यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की नोकिया आपल्या ‘एक्स’ सीरीजचा 5जी मोबाइल फोन Nokia X30 5G भारतात सादर करणार आहे. आता कंपनीनं फोनची सेल डेट देखील सांगितली आहे. नोकिया एक्स30 5जी फोन 20 फेब्रुवारीपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. […]

The post अरारारा खतरनाक! फोनवर तीन वर्षांची वॉरंटी; Nokia X30 5G च्या भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia X30 5G फोन 20 फेब्रुवारीपासून भारतात विकला जाईल.
  • हा 3 वर्ष अँड्रॉइड ओएस आणि सिक्योरिटी पॅच अपडेटसह येईल.
  • नोकिया एक्स30 5जी 100% रीसायकल्ड अ‍ॅल्युमिनियम तसेच 65% रीसायकल्ड प्लास्टिकपासून बनवण्यात आला आहे.

HMD Global India VP, Sanmeet S Kochhar यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की नोकिया आपल्या ‘एक्स’ सीरीजचा 5जी मोबाइल फोन Nokia X30 5G भारतात सादर करणार आहे. आता कंपनीनं फोनची सेल डेट देखील सांगितली आहे. नोकिया एक्स30 5जी फोन 20 फेब्रुवारीपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Nokia X30 5G Price

नोकिया एक्स30 5जी फोन भारतात सिंगल मेमरी वेरिएंटमध्ये आला आहे. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला स्पोर्ट करतो ज्याची किंमत 48,999 रुपये आहे. हा मोबाइल प्री-बुकिंगसाठी आजपासून उपलब्ध होईल जो 20 फेब्रुवारीपासून Cloudy Blue आणि Ice White कलरमध्ये खरेदी करता येईल. ऑफर्स अंतर्गत या नोकिया फोनसह 33W fast charger आणि Nokia earbuds मोफत मिळतील. नोकिया एक्स30 5जी फोन 3 वर्षांच्या अँड्रॉइड ओएस अपडेट आणि 3 वर्षांच्या सिक्योरिटी पॅच अपडेटसह येईल. या फोनवर 3 वर्षांची वॉरंटी देखील मिळेल. हा मोबाइल फोन शंभर टक्के रीसायकल्ड अ‍ॅल्युमिनियम तसेच 65% रीसायकल्ड प्लास्टिकपासून बनवण्यात आला आहे.हे देखील वाचा: डब्बा TV वर पाहायचंय युट्युब-नेटफ्लिक्स? Xiaomi TV Stick 4K बनवेल कोणत्याची टीव्हीला Smart

Nokia X30 5G Specifications

  • 6.43″ 90Hz AMOLED display
  • 8GB RAM + 256GB storage
  • Qualcomm Snapdragon 695
  • 50MP + 13MP rear camera
  • 33W 4,200mAh battery

Nokia X30 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 6.43 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबतच 700निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. फोन स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीनं सुसज्ज आहे. जिला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.

प्रोसेसिंगसाठी या 5जी फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा मोबाइल 8 जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे जो 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: उन्हात होणार चार्ज! येतेय भारतातील Solar Electric Car, पुण्यातील कंपनीची कमाल

हा नोकिया मोबाइल फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फोनची कॅमेरा लेन्स गोरिल्ला ग्लास डीएक्स4 नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. नोकिया एक्स30 5जी फोनमध्ये आयपी67 रेटिंग, आयआर ब्लास्टर व एनएफसी सारखे फीचर्स देखील मिळतात.

The post अरारारा खतरनाक! फोनवर तीन वर्षांची वॉरंटी; Nokia X30 5G च्या भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-sale-in-india-start-from-20-febuary/feed/ 0
भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Nokia X30 5G; अधिकाऱ्यांनी दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-launching-in-india-soon-know-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-launching-in-india-soon-know-specifications/#respond Mon, 13 Feb 2023 04:20:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17730 नोकियानं सप्टेंबर 2022 मध्ये एक्स सीरीज अंतगर्त फ्लॅगशिप डिवायस Nokia X30 5G सादर केला होता. हा ब्रँडचा ‘most eco-friendly smartphone’ असल्याचं सांगण्यात आलं होतं. हा मोबाइल फोन आता भारतीय बाजारात येण्याची तयारी करत आहे. HMD Global India VP, Sanmeet S Kochhar यांनी एक्स30 5जी फोनच्या भारतीय लाँचची माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. विशेष म्हणजे हा […]

The post भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Nokia X30 5G; अधिकाऱ्यांनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia X30 5G फोन लवकरच भारतीय बाजारात येईल.
  • हा मोबाइल रीसायकल्ड अ‍ॅल्युमिनियम तसेच 65% रीसायकल्ड प्लास्टिक पासून बनवण्यात आला आहे.
  • हा नोकिया फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो.

नोकियानं सप्टेंबर 2022 मध्ये एक्स सीरीज अंतगर्त फ्लॅगशिप डिवायस Nokia X30 5G सादर केला होता. हा ब्रँडचा ‘most eco-friendly smartphone’ असल्याचं सांगण्यात आलं होतं. हा मोबाइल फोन आता भारतीय बाजारात येण्याची तयारी करत आहे. HMD Global India VP, Sanmeet S Kochhar यांनी एक्स30 5जी फोनच्या भारतीय लाँचची माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. विशेष म्हणजे हा नोकिया मोबाइल 100% recycled aluminium आणि 65% recycled plastic पासून बनवण्यात आला आहे.

Nokia X30 5G India Launch

एचएमडी ग्लोबलचे वाइस प्रेजिडेंट सनमीत सिंघ कोचर यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून घोषणा केली आहे की कंपनी भारतात लवकरच एक्स सीरीजचा हायएन्ड स्मार्टफोन Nokia X30 5G लाँच करेल. ट्वीटमध्ये कंपनी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की नोकिया एक्स50 5जी फोन शंभर टक्के रीसायकल्ड अ‍ॅल्युमिनियम तसेच 65% रीसायकल्ड प्लास्टिक पासून बनला आहे.

Nokia X30 5G Specifications

  • 6.43″ 90Hz AMOLED display
  • 8GB RAM + 256GB storage
  • Qualcomm Snapdragon 695
  • 50MP + 13MP rear camera
  • 33W 4,200mAh battery

नोकिया एक्स30 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता, हा फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबतच 700निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.

Nokia X30 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो 3 वर्षांच्या ओएस अपडेट, 3 वर्षांच्या सिक्योरिटी पॅच तसेच 3 वर्षांच्या फोन वॉरंटीसह येतो. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नोकिया मोबाइलमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनच्या कॅमेरा लेन्सला देखील गोरिल्ला ग्लास डीएक्स4 ची सुरक्षा देण्यात आली आहे.

Nokia X30 5G सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करते तसेच पावर बॅकअपसाठी यात 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,200एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया एक्स30 5जी फोन आयपी67 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. तसेच या फोनमध्ये आयआर ब्लास्टर व एनएफसीसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.

The post भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Nokia X30 5G; अधिकाऱ्यांनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-launching-in-india-soon-know-specifications/feed/ 0
अ‍ॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-launched-most-eco-friendly-nokia-smartphone-know-price-specifications-sale-offer-deals/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-launched-most-eco-friendly-nokia-smartphone-know-price-specifications-sale-offer-deals/#respond Fri, 02 Sep 2022 07:22:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12747 Nokia ब्रँडची मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी HMD Global नं IFA 2022 च्या मंचावरून आपल्या टेक्नॉलॉजीचं शक्तिप्रदर्शन करत अनेक नवीन प्रोडक्ट सादर केले आहेत. यात Nokia G60 5G, Nokia C31 आणि Nokia X30 5G चा समावेश आहे. यातील एक नोकिया एक्स30 5जी कंपनीनं most eco-friendly Nokia smartphone असल्याचं म्हटलं आहे, ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची […]

The post अ‍ॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँडची मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी HMD Global नं IFA 2022 च्या मंचावरून आपल्या टेक्नॉलॉजीचं शक्तिप्रदर्शन करत अनेक नवीन प्रोडक्ट सादर केले आहेत. यात Nokia G60 5G, Nokia C31 आणि Nokia X30 5G चा समावेश आहे. यातील एक नोकिया एक्स30 5जी कंपनीनं most eco-friendly Nokia smartphone असल्याचं म्हटलं आहे, ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Nokia X30 5G Phone ची सर्वात मोठी यूएसपी याची डिजाईन आणि इको फ्रेंडली बॉडी आहे. हा मोबाइल मेटल फ्रेमवर बनलेला आहे ज्यात 100 टक्के रीसायकल होणाऱ्या अ‍ॅल्युमिनियम फ्रेम तसेच 65 टक्क्यापर्यंत रिसायकल होणाऱ्या प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या रिटेल बॉक्समध्ये देखील अशाचा कागदाचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा

nokia x30 5g launched most eco friendly nokia smartphone know price specifications sale offer deals

Nokia X30 5G Specifications

नोकिया एक्स30 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता, हा फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबतच 700निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.

Nokia X30 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो 3 वर्षांच्या ओएस अपडेट, 3 वर्षांच्या सिक्योरिटी पॅच तसेच 3 वर्षांच्या फोन वॉरंटीसह येतो. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

nokia x30 5g launched most eco friendly nokia smartphone know price specifications sale offer deals

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नोकिया मोबाइलमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनच्या कॅमेरा लेन्सला देखील गोरिल्ला ग्लास डीएक्स4 ची सुरक्षा देण्यात आली आहे.

Nokia X30 5G सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करते तसेच पावर बॅकअपसाठी यात 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,200एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया एक्स30 5जी फोन आयपी67 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. तसेच या फोनमध्ये आयआर ब्लास्टर व एनएफसीसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: महिनाभर टिकेल या 4G फोनची बॅटरी; दोन स्क्रीन असलेला लो बजेट Nokia 2660 Flip भारतात लाँच

nokia x30 5g launched most eco friendly nokia smartphone know price specifications sale offer deals

Nokia X30 5G Price

ग्लोबल मार्केटमध्ये नोकिया एक्स30 5जी फोन दोन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे यात 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता Nokia X30 5G ची प्रारंभिक किंमत भारतीय करंसीनुसार 42,000 रुपयांच्या आसपास आहे. नोकिया एक्स30 5जी फोननं Cloudy Blue आणि Ice White कलरमध्ये एंट्री घेतली आहे.

The post अ‍ॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x30-5g-launched-most-eco-friendly-nokia-smartphone-know-price-specifications-sale-offer-deals/feed/ 0
रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-launched-with-nokia-c31-nokia-x30-5g-smartphone-check-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-launched-with-nokia-c31-nokia-x30-5g-smartphone-check-price-specifications-details/#respond Fri, 02 Sep 2022 06:40:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12742 Nokia नं काही दिवसांपूर्वी भारतात आपले क्लासिक फिचर फोन नव्या अवतारात सादर केले आहेत. यात Nokia 2660 Flip आणि Nokia 5710 XpressAudio चा देखील समावेश आहे. हे फोन्स आधी जागतिक बाजारात सादर करण्यात आले होते. तसेच आता नोकियानं आपले तीन नवीन स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. हे मोबाइल फोन IFA 2022 च्या मंचावरून सादर करण्यात […]

The post रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia नं काही दिवसांपूर्वी भारतात आपले क्लासिक फिचर फोन नव्या अवतारात सादर केले आहेत. यात Nokia 2660 Flip आणि Nokia 5710 XpressAudio चा देखील समावेश आहे. हे फोन्स आधी जागतिक बाजारात सादर करण्यात आले होते. तसेच आता नोकियानं आपले तीन नवीन स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. हे मोबाइल फोन IFA 2022 च्या मंचावरून सादर करण्यात आले आहेत, जे Nokia C31, Nokia X30 5G आणि Nokia G60 5G नावानं लाँच झाले आहेत. या लेखात आम्ही नोकिया जी60 5जी फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसचीमाहिती दिली आहे.

Nokia G60 5G Specifications

नोकिया जी60 5जी फोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला गेला आहे. या मोबाइलची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच 500निट्स ब्राइटनेससह बाजारात आली आहे. फोनच्या डिस्प्लेला कंपनीनं कोर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा दिली आहे. हे देखील वाचा: 165 रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळतो Nokia 6310 Mobile; सिंगल चार्जवर 35 दिवस चालेल याची बॅटरी

50mp camera phone Nokia G60 5G launched with Nokia C31 Nokia X30 5G smartphone check price specifications details

प्रोसेसिंगसाठी या मोबाइलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. Nokia G60 5G अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia G60 5G Phone ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तथा एक डेप्थ सेन्सरसह चालतो. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

50mp camera phone Nokia G60 5G launched with Nokia C31 Nokia X30 5G smartphone check price specifications details

Nokia G60 5G इको फ्रेंडली मटेरियलपासून बनवण्यात आला आहे. कंपनीनं आपला मोबाइल आयपी52 रेटिंगसह सादर केली आहे ज्यामुळे हा फोन वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरीसह सादर करण्यात आला आहे जी 20वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हे देखील वाचा: महिनाभर टिकेल या 4G फोनची बॅटरी; दोन स्क्रीन असलेला लो बजेट Nokia 2660 Flip भारतात लाँच

Nokia G60 5G Price

नोकिया जी60 5जी फोन तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. नोकिया जी60 5जी फोन प्राइस जवळपास 25,000 रुपयांपासून सुरु होते. या फोन सोबत कंपनीनं तीन वर्षांचे अपडेट, तीन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट आणि तीन वर्षांची वॉरंटी देत आहे.

The post रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-launched-with-nokia-c31-nokia-x30-5g-smartphone-check-price-specifications-details/feed/ 0