उन्हात होणार चार्ज! येतेय भारतातील Solar Electric Car, पुण्यातील कंपनीची कमाल

Highlights

  • Auto Expo 2023 मध्ये सोलर ईव्ही Eva प्रदर्शित करण्यात आली होती.
  • या कारच्या छतावर सोलर पॅनल आहे.
  • सिंगल फुल चार्जमध्ये कार 250 किमी पर्यंत चालेल.

पुण्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप वायवे मोबिलिटीनं यावर्षी Auto Expo 2023 मध्ये First Solar Car of India सादर केली होती. आता बातमी आली आहे की भारतातील सर्वात पहिली सोलर इलेक्ट्रिक कार Eva कंपनी पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये लाँच करणार आहे. तसेच, लाँच नंतर या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी 2024 मधेच सुरु केली जाईल. या ई-कारची खासियत पाहता या कारमध्ये 14kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी सिंगल फुल चार्जवर 250 किमी पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज देऊ शकते.

India first solar electric car

ही एक इलेक्ट्रिक कार आहे, ज्यात सोलर रूफ पॅनेलचा ऑप्शन मिळेल. पॅनल या कारच्यावर फिट करता येईल, जो चार्जिंगमध्ये मदत करेल. यासाठी कारला उघड्यावर उभी करावे लागेल. कंपनी सोलर रूफ वेगळा विकेल. पॅनल दिसणार नाही अशा पद्धतीनं कंपनीनं लावला आहे. लुकच्या बाबतीत देखील ही कार खूप क्यूट वाटते. कंपनीनुसार ही सोलर पॅनल आणि बॅटरी दोन्ही पद्धतीनं चालवता येईल. बॅटरीद्वारे चालवल्यावर या कारचा खर्च एक रुपयांपेक्षा कमी पडतो. हे देखील वाचा: BSNL 4G: 1 लाख ठिकाणी सुरु होणार 4जी नेटवर्क; 24500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स मंजूर

45 मिनिटांत होणार चार्ज

कंपनीनं या ई-कारमध्ये लिक्विड कूल्ड PMSM मोटार देण्यात आली आहे जी 6kW ची पावर देऊ शकते. तसेच यातील 14 kWh चा बॅटरी पॅक फास्ट चार्ज केल्यावर फक्त 45 मिनिटांचा वेळ घेतो. म्हणजे ही कार 45 मिनिटांत चार्ज होईल आणि सिंगल चार्जवर 250KM ची रेंज देईल. यात चार्जिंगसाठी 15A सॉकेट दिले आहे. या कारचे फीचर्स पाहता इलेक्ट्रिक कार (ईवा) मध्ये रिवर्स कॅमेरा, अ‍ॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टम, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेकिंग सारखे फीचर्स आहेत.

पॅनारोमिक सनरूफची मजा देखील मिळणार

तसेच तुम्हाला कारमध्ये पॅनारोमिक सनरूफ देखली मिळेल. या कारचे इंटीरियर देखील शानदार लुक देतं. या ई-कारमध्ये दोन दरवाजे आहेत, तसेच कारमध्ये दोन प्रौढ आणि एक लहान मुल बसू शकतं. वायवे मोबिलिटी पुढील वर्षी पुणे आणि बेंगळुरू मध्ये ईव्ही सुरू करणार आहे. कारची बुकिंग आणि किंमतीची घोषणा नंतर केली जाईल. हे देखील वाचा: डब्बा TV वर पाहायचंय युट्युब-नेटफ्लिक्स? Xiaomi TV Stick 4K बनवेल कोणत्याची टीव्हीला Smart

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here