Xiaomi TV Stick 4K भारतात लाँच; किंमत 4,999 रुपये

Highlights

  • Xiaomi TV Stick 4K भारतीय बाजारात लाँच झाली आहे.
  • या 4K स्टिकच्या मदतीनं जुना टीव्ही स्मार्ट बनेल.
  • येत्या 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होणार विक्री.

मोबाइल निर्माता Xiaomi नं इंडियन युजर्ससाठी नवीन Xiaomi TV Stick 4K बाजारात लाँच केली आहे. तुम्ही या खास डिवाइसच्या मदतीनं तुमच्या साध्य टीव्हीला 4K स्मार्ट टीव्ही बनवू शकता. इतकेच नव्हे तर तुमच्या नार्मल टीव्हीमध्ये ही स्टिक जोडून अनेक स्मार्ट फीचर्स आणि OTT अ‍ॅप्स वापरू शकाल. विशेष म्हणजे जास्त पैसे खर्चून स्मार्ट टीव्ही घेण्याची गरज नाही आणि ही नवीन Xiaomi TV Stick 4,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या नवीन शाओमी डिवाइसच्या सर्व फीचर्स आणि किंमतीची संपूर्ण माहिती.

Xiaomi TV Stick 4K Specifications

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Xiaomi TV Stick 4K सामान्य टीव्हीला जोडून अ‍ॅडव्हान्स फीचर्सचा आनंद घेता येईल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जर तुम्ही ही साध्या टीव्हीला जोडली तर तुम्हाला 4K कंटेन्ट पाहता येईल, परंतु त्यासाठी टीव्हीचे रिजोल्यूशन आणि 4K कंटेंट असणं आवश्यक आहे. तसेच या स्मार्ट टीव्ही स्टिकमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस, डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट देखील मिळेल. हे देखील वाचा: येत आहे कमी किंमत असलेला स्वस्त Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन; या तारखेला होईल भारतात लाँच

Xiaomi TV Stick 4K चा प्रोसेसर पाहता डिवाइसमध्ये क्वॉड कोर कॉर्टेक्स ए35 प्रोसेसर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल बँड वाय-फाय 802.11 एसी सारखे फीचर्स मिळतात. OS पाहता स्टिक Android TV 11 ओएसवर काम करते. कंपनीनं या डिवाइसमध्ये बिल्ट इन क्रोमकास्ट देखील दिलं आहे, त्यामुळे तुमच्या मोबाइलवरील कन्टेन्ट सहज टीव्हीवर पाहता येईल.

या नवीन डिवाइसमध्ये एमआय व्हॉइस रिमोट देखील मिळतो. ज्यात Netflix, Disney Hotstar आणि Amazon Prime Video सारखे ऑप्शन उपलब्ध आहेत. रिमोटद्वारे से युजर्स व्हॉइस कंट्रोल असिस्टंटचा वापर करू शकतात. विशेष म्हणजे Xiaomi TV Stick 4K याआधी साल 2021 मध्ये जागतिक बाजारात लाँच करण्यात आली होती. जी आता भारतीय बाजारात आली आहे. हे देखील वाचा: BSNL 4G: 1 लाख ठिकाणी सुरु होणार 4जी नेटवर्क; 24500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स मंजूर

Xiaomi TV Stick 4K Price

कंपनीनं Xiaomi TV Stick 4K भारतात फक्त 4,999 रुपयांमध्ये लाँच केली आहे. जर तुम्ही ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर हिची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com वर एक्सक्लूसिव्हली केली जाईल. या डिवाइसची विक्री येत्या 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here