महिनाभर टिकेल या 4G फोनची बॅटरी; दोन स्क्रीन असलेला लो बजेट Nokia 2660 Flip भारतात लाँच

भारतात नोकियाच्या चाहत्यांना खुश करत कंपनीनं बाजारात नवीन फ्लिप फोन Nokia 2660 Flip (Nokia Feature Phone) लाँच केला आहे. नोकिया मोबाइल फोन बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपनी HMD Global नं हा फोन (Nokia Flip Phone) काही दिवसांपूर्वी चीनी मार्केट सादर केला होता. हा फोन ड्यूल स्क्रीन, वायरलेस एफएम रेडियो, दमदार बॅटरी आणि स्नेक गेम सारख्या शानदार फीचर्ससह येतो. हा फोन ग्राहक अ‍ॅमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या वेबसाइटवरून विकत घेता येईल. चला जाणून घेऊया नोकियाच्या या फिचर फोनचे स्पेसिफिकेशन्स, फिचर आणि किंमत.

Nokia 2660 Flip ची किंमत आणि उपलब्धता

Nokia 2660 Flip भारतीय बाजारात 4,699 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. हा फिचर फोन ब्लॅक, रेड आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये ग्राहकांना विकत घेता येईल. हा Nokia Feature Phone ग्राहक अ‍ॅमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या साइटवरून विकत घेता येईल. हे देखील वाचा: 165 रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळतो Nokia 6310 Mobile; सिंगल चार्जवर 35 दिवस चालेल याची बॅटरी

Nokia 2660 Flip चे स्पेसिफिकेशन्स

  • 2.8-इंच QVGA डिस्प्ले, 1.77 इंचाचा सेकंडरी QQVGA डिस्प्ले
  • Unisoc T107 प्रोसेसर
  • 48MB RAM आणि 128MB स्टोरेज
  • 0.3 मेगापिक्सल या VGA कॅमेरा सेन्सर
  • रिमूव्हेबल बॅटरी

Nokia 2660 Flip चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nokia 2660 Flip चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यात 2.8 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 240 x 320 पिक्सल आहे. तसेच फोनच्या मागील बाजूस 1.77 इंचाचा सेकंडरी QQVGA डिस्प्ले देखील देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 120 x 160 पिक्सल आहे. तसेच प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये Unisoc T107 प्रोसेसर देण्यात आला आहे.

स्टोरेज आणि रॅम पाहता, फोनमध्ये 48MB RAM आणि 128MB ची इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच फोटोग्राफीसाठी यात 0.3 मेगापिक्सलचा VGA कॅमेरा सेन्सर आणि एक एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये ब्लूटूथ 4.2, ड्युअल सिम सपोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक आणि एक मायक्रो USB पोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत लाँच झाला नोकियाचा 5G Phone; जाणून च्या Nokia G400 चे स्पेसिफिकेशन्स आणि प्राइस

26 दिवस टिकणारी बॅटरी

बॅटरी बॅकअप पाहता Nokia 2660 Flip मध्ये 2.75-वॅट अवर्सची रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी 20 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देते. तसेच सिंगल चार्जवर हा फोन 26.6 दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देतो. सॉफ्टवेयर पाहता यात ICE इमरजेंसी कॉल सिस्टमसह अ‍ॅक्सेसिबिलिटी मोड सपोर्ट देण्यात आला आहे. नोकिया 2660 फ्लिप फोन S30+ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. युजरच्या करमणुकीसाठी कंपनी यात स्नेक, रेसिंग अटॅक आणि डूडल जंप सारखे गेम देण्यात आले आहेत. तसेच फोनचे डायमेन्शन्स पाहता फोनची उंची 18.9mm, रुंदी 108mm, जाडी 55mm आणि वजन 123 ग्राम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here