Ola S1 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 14:53:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Ola S1 Pro विरुद्ध Vida V1 Pro; हिरो आणि ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटीची तुलना https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-vs-vida-v1-pro-price-range-scale-design-comparison/ https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-vs-vida-v1-pro-price-range-scale-design-comparison/#respond Tue, 18 Oct 2022 04:08:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14071 Hero MotorCorp जगातील motorcycle बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे, जिने अलीकडेच EV सेक्टरमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी आपल्या सब-ब्रँड Vida मध्ये आपली पहिली electric scooter सादर केली आहे. ‘Vida’ brand अंतगर्त कंपनीच्या Vida V1 Plus आणि Vida V1 Pro स्कूटर लाँच झाल्या आहेत, यातील Vida V1 Pro ला भारतातील Ola S1 Pro कडून आव्हान […]

The post Ola S1 Pro विरुद्ध Vida V1 Pro; हिरो आणि ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटीची तुलना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Hero MotorCorp जगातील motorcycle बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे, जिने अलीकडेच EV सेक्टरमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी आपल्या सब-ब्रँड Vida मध्ये आपली पहिली electric scooter सादर केली आहे. ‘Vida’ brand अंतगर्त कंपनीच्या Vida V1 Plus आणि Vida V1 Pro स्कूटर लाँच झाल्या आहेत, यातील Vida V1 Pro ला भारतातील Ola S1 Pro कडून आव्हान मिळणार आहे. म्हणून आम्ही या दोन्ही ई-स्कूटरची तुलना केली आहे. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज आणि फीचर्सची तुलना करण्यात आली आहे.

Vida V1 Pro vs Ola S1 Pro price in India

Vida V1 Pro ची किंमत Rs 1.59 lakh (ex-showroom) आहे. तर, Ola S1 Pro यापेक्षा स्वस्त आहे जिची किंमत Rs 1.29 lakh (ex-showroom) आहे. काही राज्यांमध्ये FAME – II subsidies नंतर या किंमती कमी होऊ शकतात. Ola S1 Pro ची बुकिंग Ola Electric’s website वरून करता येते. Ola कडून या स्कुटीवर 3 year/40,000km पर्यंतची वॉरंटी मिळते. तर बॅटरी पॅकवर 3-year / unlimited-kilometre वॉरंटी मिळते. ग्राहक एक्स्ट्रा पैसे देऊन दोन वर्षांची एक्स्ट्रा वॉरंटी घेऊ शकतात. Ola S1 Pro स्कुटी Porcelain White, Khaki, Neo Mint, Coral Glam, Jet Black, Marshmellow, Liquid Silver, Millenial Pink, Anthracite Grey, Midnight Blue आणि Matt Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Hero MotorCorp च्या पहिल्या Vida V1 Pro ई-स्कूटरची बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. इच्छुक ग्राहक 4,999 रुपये देऊन ही स्कुटी बुक करू शकतात. ही स्कुटी Matte White, Matte Sports Red, Gloss Black आणि Matte Abrax Orange कलर मध्ये विकत घेता येईल. Hero MotorCorp कडून स्टँडर्ड 5-year / 50,000km वॉरंटी ई-स्कूटरवर आणि बॅटरीवर 3 years/ 30,000km ची वॉरंटी दिली जात आहे. तसेच हीरो मोटोकॉर्प 18 महिन्यांमध्ये 70 टक्के बायबॅकचं आश्वासन देखील देत आहे.

Vida V1 Pro vs Ola S1 Pro

1. Design: डिजाइनच्या बाबतीत Vida V1 Pro खूप वेगळी आहे. ओला एस1 प्रो मध्ये कमीत कमी लेयरिंगसह एक स्मूद-फ्लोइंग डिजाइन मिळते तर विडा वी1 प्रो मध्ये जास्त कंटूरेड आणि पॅनल असलेली स्टाइल आहे. विडा वी1 प्रो मध्ये समोरच्या एप्रन मध्ये हेडलॅम्प आहे जो ओला एस1 प्रो च्या हँडलबार कव्हरवर मिळतो. नवीन वी1 प्रो दिसायला खूप स्टाइलिश वाटते.

2. Specifications: Hero Vida V1 Pro मध्ये 3.94 kWh चा बॅटरी पॅक 8bhp ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. हे पावरट्रेन 165km ड्राईव्हिंग रेंजसह येते. तसेच Vida V1 फक्त 3.2 सेकंदात 0 ते 40 किमी ताशी वेग गाठते. दुसरीकडे, Ola S1 Pro मध्ये जास्त शक्तीशाली सेटअप मिळतो ज्यात 58Nm च्या टॉर्कसह 8.5kW ची मोटर असते जी स्कूटरला 3 सेकंदात 0 ते 40kmph पर्यंत घेऊन जाते. ही मोटर 3.97 kWh बॅटरी पॅकशी जोडण्यात आली आहे आणि Ola चा दावा आहे की सिंगल चार्जवर 181km ची सर्टिफाइड रेंज मिळू शकते. वीडा वी 1 प्रो ताशी 80 किमीचा कमाल वेगाने धावू शकते, तर ओला एस 1 प्रो ताशी 115 किमीचा कामाला वेग देते.

3. Battery and Charging: Vida V1 Pro मध्ये 3.94kWh चा मोठा बॅटरी पॅक मिळतो. कंपनीनं या ई-स्कूटरचे बॅटरी पॅक दोन भागांमध्ये विभागले आहेत. यात एक बॅटरी सीटच्या खाली ठेवण्यात आली तर दुसरा बॅटरी पॅक काढता येतो. प्रत्येक बॅटरीचं वजन जवळपास 11 किलो आहे. हीरोनुसार ग्राहक चार्जिंगसाठी बॅटरी पॅक घरी देखील घेऊन जाऊ शकतात. तसेच Vida V1 Pro स्कुटी DC फास्ट चार्जरनं चार्ज होण्यासाठी 2 तास घेते. तर AC आउटलेट द्वारे 5 तास 55 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. ओलामधील 3.97 kWh चा बॅटरी पॅक जवळपास 6 तास 30 मिनिटांत चार्ज होतो.

10000 Rs Discount On Ola Electric S1 Pro Festive Offer

4. Features: वीडा वी1 प्रो 7 इंचाच्या टचस्क्रीन इंस्ट्रूमेंट क्लस्टर, कीलेस कंट्रोल, क्रूज कंट्रोल, एसओएस अलर्ट, टू-वे थ्रॉटल आणि ओटीए अपडेटसह सादर करण्यात आली आहे. यात स्पोर्ट, राइड, इको आणि कस्टम सारखे चार राइडिंग मोड आहेत. यात एक ‘लिम्प मोड’ मिळतो जो स्कूटरची चार्जिंग कमी असल्यास जवळपास ताशी 8 किमी ते ताशी 10 किमी वेगानं पार्किंग स्पीडवर क्रॉल करू शकते. ओला एस1 प्रो फीचर डिपार्टमेंटमध्ये पुढे आहे आणि यात 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, मल्टीपल मायक्रोफोन, ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 3 जीबी रॅम, 4 जी, वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच यात हिल डिसेंट कंट्रोल, रिवर्स मोड, मल्टीपल राइडिंग मोड्स, क्रूज कंट्रोल, नेव्हिगेशन, म्यूजिक प्लेबॅक आणि खूप काही फीचर्स मिळतात.

5. Verdict: Vida V1 Pro लेटेस्ट आणि नवीन डिजाइन असलेली ई-स्कूटर आहे. कागदावर देखील ही स्कूटर मजबूत वाटते, ज्यात फ्यूचरिस्टिक स्टाइल, दमदार कामगिरी, पुरेशी रेंज आणि नवीन सुविधांचा समावेश आहे. ओला एस1 प्रो देखील या सर्व गोष्टींमध्ये मागे नाही. फक्त मोटोकॉर्पची कुशलता आणि मोठा डीलरशिप टचपॉइंट नेटवर्कचा फायदा या नव्या खेळाडूला होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Ola S1 Pro विरुद्ध Vida V1 Pro; हिरो आणि ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटीची तुलना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-vs-vida-v1-pro-price-range-scale-design-comparison/feed/ 0
Ola Electric Offer: या इलेक्ट्रिक स्कूटीवर पहिल्यांदाच मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/10000-rs-discount-on-ola-electric-s1-pro-festive-offer/ https://www.91mobiles.com/marathi/10000-rs-discount-on-ola-electric-s1-pro-festive-offer/#respond Tue, 27 Sep 2022 09:11:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13480 Ola Electric offers festive discount on S1 Pro: दिवाळी सुरु होण्यास एक महिन्यापेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. परंतु त्याआधी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तामिळनाडुमधील इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी Ola Electric (ओला इलेक्ट्रिक) नं पहिल्यांदाच आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटरवर जबरदस्त डिस्काउंटची घोषणा केली आहे. फेस्टिव सीजनच्या निमित्ताने कंपनीनं Ola S1 Pro वर 10,000 रुपयांची सूट देण्याची घोषणा […]

The post Ola Electric Offer: या इलेक्ट्रिक स्कूटीवर पहिल्यांदाच मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Ola Electric offers festive discount on S1 Pro: दिवाळी सुरु होण्यास एक महिन्यापेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. परंतु त्याआधी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तामिळनाडुमधील इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी Ola Electric (ओला इलेक्ट्रिक) नं पहिल्यांदाच आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटरवर जबरदस्त डिस्काउंटची घोषणा केली आहे. फेस्टिव सीजनच्या निमित्ताने कंपनीनं Ola S1 Pro वर 10,000 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जर तुम्ही एखादी इलेक्ट्रिक स्कूटी विकत घेण्याची योजना बनवत असाल तर ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेता येईल. चला जाणून घेऊया या ऑफरची लास्ट डेट आणि Electric Scooter चे फीचर्स व किंमत.

10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घ्या इलेक्ट्रिक स्कूटर

ओला इलेक्ट्रिकनं फेस्टिव ऑफरची घोषणा आपल्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून केली आहे. कंपनीनं आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, “ओलाच्या फेस्टिव ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि ओला एस 1 प्रोवर 10,000 रुपयांच्या डिस्काउंटचा आनंद मिळवा. अन्य फायन्यासिंग ऑप्शन देखील तुमची वाट पाहत आहेत.” हे देखील वाचा: Netflix Upcoming Series: तब्बूच्या ‘खुफिया’ पासून Rana Daggubati च्या ‘राणा नायडू’; नेटफ्लिक्सवर येतायत या जबरदस्त Movies आणि Web Series

ऑफरची लास्ट डेट

ही ऑफर दसरा, 5 ऑक्टोबर पर्यंत वैध आहे. त्यामुळे जर तुम्हाला 10,000 रुपयांचा डिस्काउंट हवा असेल तर ही इलेक्ट्रिक स्कूटर दसऱ्याच्या आधी खरेदी करावी लागेल. तसेच फेस्टिव डिस्काउंटसाठी शॉपिंग विंडो आधीच ओपन करण्यात आली आहे.

10000 Rs Discount On Ola Electric S1 Pro Festive Offer

अशाप्रकारे खरेदी करा इलेक्ट्रिक स्कूटर

ओला इलेक्ट्रिकच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कंपनीच्या साइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर साइटवर दिसणाऱ्या फेस्टिव ऑफर टॅबवर क्लिक केल्यानंतर, एस1 प्रो सवलतीच्या दरात विकत घेण्याचा पर्याय निवडा. 10,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर ही इलेक्ट्रिक स्कूटी तुम्हाला 1.30 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) मिळेल. हिची मूळ किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे देखील वाचा: जगातील सर्वात स्वस्त 5G Phone! Jio Phone 5G ची किंमत आली समोर, जाणून घ्या

10000 Rs Discount On Ola Electric S1 Pro Festive Offer

OLA S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर 58Nm टार्क, 8.5kW च्या मोटरसह येते ज्यामुळे स्कूटर 3 सेकंदात 0-40kmph चा स्पीड गाठू शकते. याव्यतिरिक्त कंपनीचा दावा आहे की स्कूटरमध्ये ताशी 115 किमीचा टॉप स्पीड मिळेल. स्कूटरमध्ये पुढे आणि मागे एक डिस्क ब्रेक आहे आणि यात 36L अंडर-सीट बूट स्पेस मिळते. तसेच ओला एस1 प्रो बद्दल कंपनीनं दावा केला आहे की यात 181 किमी आणि जवळपास 135 किमीची वास्तविक रेंज मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज होण्यास जवळपास 6.5 तास लागतात.

The post Ola Electric Offer: या इलेक्ट्रिक स्कूटीवर पहिल्यांदाच मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10000-rs-discount-on-ola-electric-s1-pro-festive-offer/feed/ 0
Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरनं केली कमाल, सिंगल चार्जमध्ये गाठलं 300 किमीपेक्षा जास्त अंतर https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-electric-scooter-runs-300km-on-single-charge/ https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-electric-scooter-runs-300km-on-single-charge/#respond Fri, 15 Jul 2022 06:29:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11428 Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल कंपनी सिंगल चार्जमध्ये 180km रेंज देण्याचा दावा करते.

The post Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरनं केली कमाल, सिंगल चार्जमध्ये गाठलं 300 किमीपेक्षा जास्त अंतर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होताच चर्चेचा विषय ठरली आहे. आता पुन्हा एकदा कंपनीची सर्वात प्रीमिमय स्कूटर Ola S1 Pro हेडलाईनमध्ये आली आहे. स्कूटरच्या एका युजरनं दावा केला आहे की, त्याला सिंगल चार्जमध्ये 300KM पेक्षा जास्त रेंज मिळाली आहे. Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल अशाप्रकारचा दावा आतापर्यंत दोन युजर्सनी केला आहे. युजर्सचा दावा आहे की MoveOS 2.0 अपडेटनंतर त्यांची Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर तीनशे किलोमीटर रेंज देऊ लागली आहे. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला मिळालेल्या नवीन अपडेट MoveOS 2.0 मध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरला इको मोड मिळाला आहे, त्यामुळे युजर्सनी दावा केला आहे की त्यांना सिंगल चार्जमध्ये 300 किमीची रेंज मिळाली आहे.

Ola S1 Pro सिंगल चार्जमध्ये 300km ची रेंज

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर दोन युजर्सनी पोस्ट केली आहे की ओलाच्या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Pro नं सिंगल चार्जमध्ये सुमारे 300 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज दिली आहे. सतेंद्र यादव नावाच्या एका युजरनं Ola S1 Pro च्या डॅशबोर्डचा फोटो शेयर करून हा दावा केला आहे. या प्रवासात युजरचा सरासरी स्पीड ताशी 20 किमी इतका होता आणि कमाल स्पीड ताशी 38 किलोमीटर होता. सतेंद्र यादवनी जो फोटो शेयर केला आहे, त्यानुसार त्याने 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे आणि त्यांच्या स्कूटरची 5 टक्के बॅटरी आणि 3 किलोमीटरची रेंज शिल्लक आहे. हे देखील वाचा: 6 लाखात इलेक्ट्रिक कार? ‘या’ कंपनीनं सुरु केली तयारी; मिळेल 200KM पर्यंतची रेंज

अजून एका युजर जिगर भरदमनं देखील Ola S1 Pro च्या डॅशबोर्ड की फोटो शेयर करत असाच काहीसा दावा केला आहे. जिगरनं शेयर केलेल्या फोटोवरून समजते की त्याचा सरासरी स्पीड ताशी 23 किलोमीटर आणि मॅक्सिमम स्पीड ताशी 40 किलोमीटर होता. जिगरच्या डॅशबोर्डनुसार स्कूटरमध्ये, 4 टक्के बॅटरी आणि 1 किलोमीटरची रेंज शिल्लक आहे.

लाँचच्या वेळी Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल कंपनीनं दावा केला होता की ही सिंगल चार्जमध्ये 180km की रेंज ऑफर करते. याआधी अनेक युजर्सना सिंगल चार्जमध्ये 200 किलोमीटरची रेंज मिळाली आहे. याआधी ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी काही टॉप रायडर्सना ओला एस1 प्रो गिफ्ट मध्ये दिली होती. इंडियन इलेक्ट्रिक टू व्हीलर सेग्मेंटमध्ये Ola S1 Pro एक मोठी दावेदार आहे आणि हीच टॉप टेनमध्ये समावेश आहे. ओला इलेक्ट्रिक गेल्या काही दिवसांपासून आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचे प्रयत्न करत आहे. हे देखील वाचा: जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा! पाहा 200MP सेन्सरचे कॅमेरा सॅम्पल; शाओमी-सॅमसंगच्या अडचणीत वाढ

The post Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरनं केली कमाल, सिंगल चार्जमध्ये गाठलं 300 किमीपेक्षा जास्त अंतर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-electric-scooter-runs-300km-on-single-charge/feed/ 0