6 लाखात इलेक्ट्रिक कार? ‘या’ कंपनीनं सुरु केली तयारी; मिळेल 200KM पर्यंतची रेंज

देशात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत आहे, त्यामुळे आता या कार्स कमी किंमतीत बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अहमदाबादची एक कंपनी जेनसोल इंजीनियरिंग (Gensol Engineering) नं दावा केला आहे की ते सुमारे 6 लाख रुपयांमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक कार देण्याच्या योजनेवर काम करत आहे. भारतातील रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन देणाऱ्या कंपनी जेनसोल इंजीनियरिंगनं गेल्या आठवड्यात यूएस-आधारित ईव्ही स्टार्टअपसह भागेदारी अधिकृत केली आहे. जेनसोल इंजीनियरिंगचं लक्ष्य स्वदेशी ईव्हीसाठी या स्टार्टअपच्या आरअँडडी सुविधांचा वापर करणे आहे.

5-6 लाख रुपयांमध्ये इलेक्ट्रिक कार

एक मीडिया रिपोर्टनुसार जेनसोलचे मॅनेजिंग डायरेक्टर अनमोल सिंह जग्गी यांनी म्हटलं आहे की, “भारतात स्वस्त इलेक्ट्रिक कारची गरज आहे. इथे अश्या कार्स हव्या आहेत ज्यांची किंमत 5-6 लाख रुपये असेल.” जग्‍गी यांच्या मते भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्‍ट्रीमध्ये मोठे बदल करण्याची आवश्यकता आहे. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा देशात इलेक्ट्रिक कार 5 लाखांपेक्षा कमी किंमतीत विकली जाईल. हे देखील वाचा: Hero Splendor सारखी दिसणारी electric bike लाँच, सिंगल चार्जमध्ये 140km रेंज

टाटा कंपनीकडे आहे भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

भारतात सध्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor आहे, जिची किंमत 12.4 लाख रुपये आहे. Hyundai देखील स्वस्त इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. एमजी मोटर्स इंडिया (MG Motor India) नं देखील माहिती दिली होती की, 10-12 लाख रुपयांच्या आत इलेक्ट्रिक कार बाजारात घेऊन येईल. जागतिक बाजारात 4,200 डॉलर म्हणजे सुमारे 3.15 लाख रुपयांची Wuling Hongguang Mini EV सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे.

जेनसोल इंजीनियरिंग भारत आणि विदेशांमध्ये सौर योजना सेटअप करण्याची सेवा देते. तसेच कंपनी जेनसोल समूहातील कंपन्यांचा एक भाग आहे. जेनसोल इंजीनियरिंगनं 7 जुलैला यूएस-आधारित ईव्ही स्टार्टअपसह एक टर्म शीट साइन केली आहे ज्यानुसार भारतीय बाजारात एक ईव्ही आणण्याची योजना आहे. जेनसोलनं आपल्या गुंतवणूकदारांना माहिती दिली आहे कंपनीनं टेक्निकल डेव्हलपमेंटसाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर बनवू इच्छित आहे आणि 2023 मध्ये पुण्यात निर्मिती सुरु करण्याची योजना आहे. हा प्लांट सुरुवातीला 12,000 कार निर्माण करू शकेल. हे देखील वाचा: बॅड न्यूज! Bajaj Chetak electric scooter महागली; जाणून घ्या नवीन किंमत

कंपनी भारतात हॅचबॅक सेगमेंटचा विचार करू शकते, जो भारतीय बाजाराचा 46 टक्के भाग आहे. जेनसोलनुसार ईव्ही हॅचबॅक सेगमेंटचे मूल्य जवळपास 70,983 कोटी रुपये आहे आणि आशा आहे की भारतात ईव्ही बाजार 2030 पर्यंत वार्षिक सेलप्रमाण जवळपास 2,00,000 युनिट्सपर्यंत पोहोचेल, थोडक्यात बाजारात 105 टक्के वृद्धी होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here