Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरनं केली कमाल, सिंगल चार्जमध्ये गाठलं 300 किमीपेक्षा जास्त अंतर

Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होताच चर्चेचा विषय ठरली आहे. आता पुन्हा एकदा कंपनीची सर्वात प्रीमिमय स्कूटर Ola S1 Pro हेडलाईनमध्ये आली आहे. स्कूटरच्या एका युजरनं दावा केला आहे की, त्याला सिंगल चार्जमध्ये 300KM पेक्षा जास्त रेंज मिळाली आहे. Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल अशाप्रकारचा दावा आतापर्यंत दोन युजर्सनी केला आहे. युजर्सचा दावा आहे की MoveOS 2.0 अपडेटनंतर त्यांची Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर तीनशे किलोमीटर रेंज देऊ लागली आहे. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला मिळालेल्या नवीन अपडेट MoveOS 2.0 मध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरला इको मोड मिळाला आहे, त्यामुळे युजर्सनी दावा केला आहे की त्यांना सिंगल चार्जमध्ये 300 किमीची रेंज मिळाली आहे.

Ola S1 Pro सिंगल चार्जमध्ये 300km ची रेंज

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर दोन युजर्सनी पोस्ट केली आहे की ओलाच्या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Pro नं सिंगल चार्जमध्ये सुमारे 300 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज दिली आहे. सतेंद्र यादव नावाच्या एका युजरनं Ola S1 Pro च्या डॅशबोर्डचा फोटो शेयर करून हा दावा केला आहे. या प्रवासात युजरचा सरासरी स्पीड ताशी 20 किमी इतका होता आणि कमाल स्पीड ताशी 38 किलोमीटर होता. सतेंद्र यादवनी जो फोटो शेयर केला आहे, त्यानुसार त्याने 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे आणि त्यांच्या स्कूटरची 5 टक्के बॅटरी आणि 3 किलोमीटरची रेंज शिल्लक आहे. हे देखील वाचा: 6 लाखात इलेक्ट्रिक कार? ‘या’ कंपनीनं सुरु केली तयारी; मिळेल 200KM पर्यंतची रेंज

अजून एका युजर जिगर भरदमनं देखील Ola S1 Pro च्या डॅशबोर्ड की फोटो शेयर करत असाच काहीसा दावा केला आहे. जिगरनं शेयर केलेल्या फोटोवरून समजते की त्याचा सरासरी स्पीड ताशी 23 किलोमीटर आणि मॅक्सिमम स्पीड ताशी 40 किलोमीटर होता. जिगरच्या डॅशबोर्डनुसार स्कूटरमध्ये, 4 टक्के बॅटरी आणि 1 किलोमीटरची रेंज शिल्लक आहे.

लाँचच्या वेळी Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल कंपनीनं दावा केला होता की ही सिंगल चार्जमध्ये 180km की रेंज ऑफर करते. याआधी अनेक युजर्सना सिंगल चार्जमध्ये 200 किलोमीटरची रेंज मिळाली आहे. याआधी ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी काही टॉप रायडर्सना ओला एस1 प्रो गिफ्ट मध्ये दिली होती. इंडियन इलेक्ट्रिक टू व्हीलर सेग्मेंटमध्ये Ola S1 Pro एक मोठी दावेदार आहे आणि हीच टॉप टेनमध्ये समावेश आहे. ओला इलेक्ट्रिक गेल्या काही दिवसांपासून आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचे प्रयत्न करत आहे. हे देखील वाचा: जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा! पाहा 200MP सेन्सरचे कॅमेरा सॅम्पल; शाओमी-सॅमसंगच्या अडचणीत वाढ

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here