Ola S1 Pro विरुद्ध Vida V1 Pro; हिरो आणि ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटीची तुलना

Hero MotorCorp जगातील motorcycle बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे, जिने अलीकडेच EV सेक्टरमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी आपल्या सब-ब्रँड Vida मध्ये आपली पहिली electric scooter सादर केली आहे. ‘Vida’ brand अंतगर्त कंपनीच्या Vida V1 Plus आणि Vida V1 Pro स्कूटर लाँच झाल्या आहेत, यातील Vida V1 Pro ला भारतातील Ola S1 Pro कडून आव्हान मिळणार आहे. म्हणून आम्ही या दोन्ही ई-स्कूटरची तुलना केली आहे. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज आणि फीचर्सची तुलना करण्यात आली आहे.

Vida V1 Pro vs Ola S1 Pro price in India

Vida V1 Pro ची किंमत Rs 1.59 lakh (ex-showroom) आहे. तर, Ola S1 Pro यापेक्षा स्वस्त आहे जिची किंमत Rs 1.29 lakh (ex-showroom) आहे. काही राज्यांमध्ये FAME – II subsidies नंतर या किंमती कमी होऊ शकतात. Ola S1 Pro ची बुकिंग Ola Electric’s website वरून करता येते. Ola कडून या स्कुटीवर 3 year/40,000km पर्यंतची वॉरंटी मिळते. तर बॅटरी पॅकवर 3-year / unlimited-kilometre वॉरंटी मिळते. ग्राहक एक्स्ट्रा पैसे देऊन दोन वर्षांची एक्स्ट्रा वॉरंटी घेऊ शकतात. Ola S1 Pro स्कुटी Porcelain White, Khaki, Neo Mint, Coral Glam, Jet Black, Marshmellow, Liquid Silver, Millenial Pink, Anthracite Grey, Midnight Blue आणि Matt Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Hero MotorCorp च्या पहिल्या Vida V1 Pro ई-स्कूटरची बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. इच्छुक ग्राहक 4,999 रुपये देऊन ही स्कुटी बुक करू शकतात. ही स्कुटी Matte White, Matte Sports Red, Gloss Black आणि Matte Abrax Orange कलर मध्ये विकत घेता येईल. Hero MotorCorp कडून स्टँडर्ड 5-year / 50,000km वॉरंटी ई-स्कूटरवर आणि बॅटरीवर 3 years/ 30,000km ची वॉरंटी दिली जात आहे. तसेच हीरो मोटोकॉर्प 18 महिन्यांमध्ये 70 टक्के बायबॅकचं आश्वासन देखील देत आहे.

Vida V1 Pro vs Ola S1 Pro

1. Design: डिजाइनच्या बाबतीत Vida V1 Pro खूप वेगळी आहे. ओला एस1 प्रो मध्ये कमीत कमी लेयरिंगसह एक स्मूद-फ्लोइंग डिजाइन मिळते तर विडा वी1 प्रो मध्ये जास्त कंटूरेड आणि पॅनल असलेली स्टाइल आहे. विडा वी1 प्रो मध्ये समोरच्या एप्रन मध्ये हेडलॅम्प आहे जो ओला एस1 प्रो च्या हँडलबार कव्हरवर मिळतो. नवीन वी1 प्रो दिसायला खूप स्टाइलिश वाटते.

2. Specifications: Hero Vida V1 Pro मध्ये 3.94 kWh चा बॅटरी पॅक 8bhp ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. हे पावरट्रेन 165km ड्राईव्हिंग रेंजसह येते. तसेच Vida V1 फक्त 3.2 सेकंदात 0 ते 40 किमी ताशी वेग गाठते. दुसरीकडे, Ola S1 Pro मध्ये जास्त शक्तीशाली सेटअप मिळतो ज्यात 58Nm च्या टॉर्कसह 8.5kW ची मोटर असते जी स्कूटरला 3 सेकंदात 0 ते 40kmph पर्यंत घेऊन जाते. ही मोटर 3.97 kWh बॅटरी पॅकशी जोडण्यात आली आहे आणि Ola चा दावा आहे की सिंगल चार्जवर 181km ची सर्टिफाइड रेंज मिळू शकते. वीडा वी 1 प्रो ताशी 80 किमीचा कमाल वेगाने धावू शकते, तर ओला एस 1 प्रो ताशी 115 किमीचा कामाला वेग देते.

3. Battery and Charging: Vida V1 Pro मध्ये 3.94kWh चा मोठा बॅटरी पॅक मिळतो. कंपनीनं या ई-स्कूटरचे बॅटरी पॅक दोन भागांमध्ये विभागले आहेत. यात एक बॅटरी सीटच्या खाली ठेवण्यात आली तर दुसरा बॅटरी पॅक काढता येतो. प्रत्येक बॅटरीचं वजन जवळपास 11 किलो आहे. हीरोनुसार ग्राहक चार्जिंगसाठी बॅटरी पॅक घरी देखील घेऊन जाऊ शकतात. तसेच Vida V1 Pro स्कुटी DC फास्ट चार्जरनं चार्ज होण्यासाठी 2 तास घेते. तर AC आउटलेट द्वारे 5 तास 55 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. ओलामधील 3.97 kWh चा बॅटरी पॅक जवळपास 6 तास 30 मिनिटांत चार्ज होतो.

4. Features: वीडा वी1 प्रो 7 इंचाच्या टचस्क्रीन इंस्ट्रूमेंट क्लस्टर, कीलेस कंट्रोल, क्रूज कंट्रोल, एसओएस अलर्ट, टू-वे थ्रॉटल आणि ओटीए अपडेटसह सादर करण्यात आली आहे. यात स्पोर्ट, राइड, इको आणि कस्टम सारखे चार राइडिंग मोड आहेत. यात एक ‘लिम्प मोड’ मिळतो जो स्कूटरची चार्जिंग कमी असल्यास जवळपास ताशी 8 किमी ते ताशी 10 किमी वेगानं पार्किंग स्पीडवर क्रॉल करू शकते. ओला एस1 प्रो फीचर डिपार्टमेंटमध्ये पुढे आहे आणि यात 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, मल्टीपल मायक्रोफोन, ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 3 जीबी रॅम, 4 जी, वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच यात हिल डिसेंट कंट्रोल, रिवर्स मोड, मल्टीपल राइडिंग मोड्स, क्रूज कंट्रोल, नेव्हिगेशन, म्यूजिक प्लेबॅक आणि खूप काही फीचर्स मिळतात.

5. Verdict: Vida V1 Pro लेटेस्ट आणि नवीन डिजाइन असलेली ई-स्कूटर आहे. कागदावर देखील ही स्कूटर मजबूत वाटते, ज्यात फ्यूचरिस्टिक स्टाइल, दमदार कामगिरी, पुरेशी रेंज आणि नवीन सुविधांचा समावेश आहे. ओला एस1 प्रो देखील या सर्व गोष्टींमध्ये मागे नाही. फक्त मोटोकॉर्पची कुशलता आणि मोठा डीलरशिप टचपॉइंट नेटवर्कचा फायदा या नव्या खेळाडूला होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here