OnePlus 11 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:19:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ‘इथे’ मिळेल OnePlus 11 5G च्या लाँच इव्हेंटची तिकीट; प्री-ऑर्डरची तारीख देखील समजली https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-5g-smartphone-pre-orders-will-start-in-india-from-february-7/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-5g-smartphone-pre-orders-will-start-in-india-from-february-7/#respond Sat, 04 Feb 2023 03:31:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17492 OnePlus नं अखेरीस OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. चीनमध्ये 4 जानेवारीला आलेला हा स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात 7 फेब्रुवारीला लाँच होईल. कोरोनाच्या साथीनंतर वनप्लसचा हा पहिला ऑफलाइन इव्हेंट असेल. या इव्हेंटमध्ये वनप्लस फॅन्सना सहभागी व्हायचे असल्यास तिकिटे Paytm Insider वर उपलब्ध आहेत. OnePlus 11 पहिला फोन असेल ज्याला कंपनी चार वर्ष […]

The post ‘इथे’ मिळेल OnePlus 11 5G च्या लाँच इव्हेंटची तिकीट; प्री-ऑर्डरची तारीख देखील समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 11 5G स्मार्टफोन भारतात 7 फेब्रुवारीला लाँच होईल.
  • वनप्लसच्या या फोनची प्री-ऑर्डर लाँचच्या दिवशीच सुरु होईल.
  • हा स्मार्टफोन कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये आधीच आला आहे.

OnePlus नं अखेरीस OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. चीनमध्ये 4 जानेवारीला आलेला हा स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात 7 फेब्रुवारीला लाँच होईल. कोरोनाच्या साथीनंतर वनप्लसचा हा पहिला ऑफलाइन इव्हेंट असेल. या इव्हेंटमध्ये वनप्लस फॅन्सना सहभागी व्हायचे असल्यास तिकिटे Paytm Insider वर उपलब्ध आहेत. OnePlus 11 पहिला फोन असेल ज्याला कंपनी चार वर्ष अँड्रॉइड अपडेट देणार आहे.

OnePlus 11 ची प्री-बुकिंग

OnePlus 11 5G स्मार्टफोनची प्री-ऑर्डर लाँचच्या दिवशीच सुरु होईल. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वरील एका टीजर पोस्टरवरून समजलं आहे की वनप्लसचा हा फोन 7 फेब्रुवारीलाच प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. वनप्लसचा हा फोन चीनमध्ये आधी आल्यामुळे सर्व स्पेसिफिकेशन जगजाहीर झाले आहेत.

OnePlus 11 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 QHD+ 2K E5 AMOLED डिस्प्ले
  • 50MP+48MP+32MP रियर कॅमेरा
  • 16GB RAM + 512GB storage
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग

वनप्लस 11 5जी 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या क्यूएचडी+ 2के डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन ई5 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह येते. OnePlus 11 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP Sony IMX709 2X पोर्टरेट लेन्ससह मिलकर चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. या मोठ्या बॅटरीसह स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी यात 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत बॅटरी फुल चार्ज करू शकते.

OnePlus 11 ची भारतातील किंमत

लीक रिपोर्ट्स OnePlus 11 स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. वनप्लसच्या या फोनचा 16GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट भारतात 61,999 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. तर फोनचा बेस व्हेरिएंट 8GB RAM रॅमसह येईल.

The post ‘इथे’ मिळेल OnePlus 11 5G च्या लाँच इव्हेंटची तिकीट; प्री-ऑर्डरची तारीख देखील समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-5g-smartphone-pre-orders-will-start-in-india-from-february-7/feed/ 0
OnePlus 11 5G सह येऊ शकतो येणार OnePlus 11R; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाले दोन्ही फोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-launch-date-in-india-7-february-with-oneplus-11-5g-phone/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-launch-date-in-india-7-february-with-oneplus-11-5g-phone/#respond Wed, 25 Jan 2023 10:44:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17244 OnePlus 11 5G फोन 7 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. ही माहिती कंपनीनं आधीच दिली आहे. परंतु आता बातमी समोर आली आहे की या दिवशी ब्रँडचा आणखी मिडरेंज फ्लॅगशिप फोन OnePlus 11R देखील भारतीय बाजारात सादर केला जाईल. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियानं 11आर स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती दिली आहे. पुढे आम्ही या मोबाइल फोनच्या लाँच डिटेल्स […]

The post OnePlus 11 5G सह येऊ शकतो येणार OnePlus 11R; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाले दोन्ही फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 11R फेब्रुवारी 7 तारखेला भारतात लाँच होईल.
  • शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर फोन लाँचचा टीजर दिसला आहे.
  • OnePlus 11 5G फोन सोबतच हा भारतीय बाजारात येईल.

OnePlus 11 5G फोन 7 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. ही माहिती कंपनीनं आधीच दिली आहे. परंतु आता बातमी समोर आली आहे की या दिवशी ब्रँडचा आणखी मिडरेंज फ्लॅगशिप फोन OnePlus 11R देखील भारतीय बाजारात सादर केला जाईल. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियानं 11आर स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती दिली आहे. पुढे आम्ही या मोबाइल फोनच्या लाँच डिटेल्स सोबतच वनप्लस 11आर च्या प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

OnePlus 11R India Launch

OnePlus 11R 5G Phone लाँच डेटचा खुलासा अ‍ॅमेझॉन इंडियानं पुश नोटिफिकेशनच्या माध्यमातून केला आहे, तसेच फोनचा टीजर पोस्टर देखील शॉपिंग साइटनं दाखवला आहे. या वनप्लस फोनला ‘The Shape of Power’ म्हटलं जात आहे जो 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी भारतात लाँच होईल. विशेष म्हणजे हाच OnePlus 11 5G फोनचा लाँच इव्हेंट आहे, त्यामुळे दोन्ही स्मार्टफोन एकत्र भारतात लाँच होतील, हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: 15 हजारांच्या रेंजमध्ये Motorola चा नवाकोरा फोन; कमी किंमतीत Moto G13 आणि Moto G23 ची एंट्री

OnePlus 11R Price

वनप्लस 11आरच्या किंमतीची माहिती देखील काही दिवसांपूर्वी टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली होती. लीकमध्ये सांगण्यात आलं होतं की हा मोबाइल दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये भारतीय बाजारात येऊ शकतो. लीकनुसार बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते ज्याची किंमत 35 ते 40 हजार दरम्यान असू शकते. तर मोठा OnePlus 11R 16GB + 512GB व्हेरिएंट भारतात 40,000 ते 45,000 रुपयांच्या बजेटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

OnePlus 11R चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 FHD+ 120Hz AMOLED Screen
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Rear + 32MP Selfie Camera
  • 100W fast charging

OnePlus 11R संबंधित लीकनुसार हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. हे स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनल आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येऊ शकते. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 100वॉट फास्ट चार्जिंगसह मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11आर मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या वनप्लस फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: एकही रुपया न देता पाहा भुवन बामची वेब सीरिज; आयुष्मानचा अ‍ॅक्शनपट देखील येतोय या आठवड्यात

वनप्लस 11आर बद्दल बोलले जात आहे की हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा फ्लॅगशिप फोन 16 जीबी रॅमसह लाँच केला जाईल जोडीला 512 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. हा फोनचा मोठा मॉडेल असेल तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळू शकते.

The post OnePlus 11 5G सह येऊ शकतो येणार OnePlus 11R; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाले दोन्ही फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-launch-date-in-india-7-february-with-oneplus-11-5g-phone/feed/ 0
लाँचपूर्वी OnePlus 11 स्मार्टफोन टेना वर झाला लिस्ट; सर्व स्पेसिफिकेशन्स समजले https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-5g-full-specifications-revealed-ahead-launch-on-tenaa-certification/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-5g-full-specifications-revealed-ahead-launch-on-tenaa-certification/#respond Thu, 22 Dec 2022 10:30:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16269 अँड्रॉइड स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसनं अलीकडेच इंडस्ट्रीमध्ये नऊ वर्ष पूर्ण केली आहेत. आता कंपनी दहाव्या वर्षाची सुरुवात दणक्यात करणार असं दिसतंय. OnePlus 11 5G 7 फेब्रुवारीला दिल्लीत होणाऱ्या एका इव्हेंटच्या माध्यमातून भारतात लाँच होईल. हा एका हायएन्ड स्पेसिफिकेशन्स असलेला फ्लॅगशिप फोन असेल. परंतु आता बाजारात पाऊल टाकण्याआधीच हा वनप्लस स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट झाला […]

The post लाँचपूर्वी OnePlus 11 स्मार्टफोन टेना वर झाला लिस्ट; सर्व स्पेसिफिकेशन्स समजले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अँड्रॉइड स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसनं अलीकडेच इंडस्ट्रीमध्ये नऊ वर्ष पूर्ण केली आहेत. आता कंपनी दहाव्या वर्षाची सुरुवात दणक्यात करणार असं दिसतंय. OnePlus 11 5G 7 फेब्रुवारीला दिल्लीत होणाऱ्या एका इव्हेंटच्या माध्यमातून भारतात लाँच होईल. हा एका हायएन्ड स्पेसिफिकेशन्स असलेला फ्लॅगशिप फोन असेल. परंतु आता बाजारात पाऊल टाकण्याआधीच हा वनप्लस स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट झाला आहे जिथे वनप्लस 11 5जी फोनचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

OnePlus 11 5G specifications

  • 6.7″ QHD+ AMOLED डिस्प्ले
  • 16GB RAM आणि 512GB स्टोरेज
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 50MP + 48MP + 32MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 100W फास्ट चार्जिंग

सर्टिफिकेशन्स साइट टेना नुसार वनप्लस 11 5जी फोन 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. हा अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला असेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार ही फोन स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो तसेच यात 10बिट कलर आउटपुट मिळू शकतो. सर्टिफिकेशनमध्ये फोनचे डायमेंशन 163.1 x 74.1 x 8.53एमएम आणि वजन 205ग्राम असे लिस्ट करण्यात आले आहेत. या फोनमध्ये अलर्ट स्लाईडर देखील दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: New OTT releases this week: बहुचर्चित ‘थँक गॉड’ आणि पिचर्स येतायत ओटीटीवर, पाहा संपूर्ण यादी

OnePlus 11 5G फोन टेनानुसार अँड्रॉइड 13 वर लाँच केला जाऊ शकतो जो कलरओएस 13 वर चालू शकतो. अन्य लीक्समध्ये या फोनमध्ये ऑक्सीजनओएस असल्याचं सांगण्यात आलं आहे. टेना नुसार हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच होऊ शकतो. सर्टिफिकेशनमधून या फोनचे 12जीबी रॅम आणि 16जीबी रॅम व्हेरिएंट समोर आले आहेत ज्यात 256 जीबी स्टोरेज आणि 512जीबी स्टोरेज मिळू शकते.

वनप्लस 11 5जी फोन Hasselblad लेन्ससह बाजारात येईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. टेना सर्टिफिकेशन नुसार स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 2एक्स ऑप्टिकल झूम असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 48 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर OnePlus 11 5G 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: वनप्लस सारखे फीचर्स स्वस्तात देणाऱ्या स्मार्टफोनची लाँच डेट समजली; तीन मॉडेल होणार लाँच

फोनच्या बॅक कॅमेरा सेटअपमधील या लेन्स 50MP Sony IMX890 सेन्सर, 48MP IMX581 सेन्सर आणि 32MP IMX709 सेन्सर असू शकतात, अशी माहिती आधी आली होती. टेना सर्टिफिकेशन पाहता हा वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच ड्युअल-सेल बॅटरीसह येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे ज्यात सिंगल-सेल व्हॅल्यू 2,435एमएएच असू शकते. तसेच लिस्टिंगमध्ये OnePlus 11 5G स्मार्टफोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल, असं सांगण्यात आलं आहे.

The post लाँचपूर्वी OnePlus 11 स्मार्टफोन टेना वर झाला लिस्ट; सर्व स्पेसिफिकेशन्स समजले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-5g-full-specifications-revealed-ahead-launch-on-tenaa-certification/feed/ 0