आगामी Redmi K60 सीरिजची संभाव्य लाँच टाइमलाइन समजली; तीन मॉडेल होऊ शकतात लाँच

शाओमीच्या सब ब्रँड रेडमीची ‘के सीरिज’ फ्लॅगशिप किलर म्हणून ओळखली जाते. कंपनी वरच्या दर्जाचे फीचर्स कमी किंमतीत देण्यासाठी ही सीरिज लाँच करते. आता आगामी Redmi K60 सीरिजची लाँच टाइमलाइन प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं विबोच्या माध्यमातून लीक केली आहे. त्यानुसार ही सीरिज याच महिन्यात चीनमध्ये लाँच केली जाऊ शकते आणि यात तीन मॉडेल मिळू शकतात. आगामी रेडमी के सीरिजमध्ये Redmi K60, Redmi K60 Pro आणि Redmi K60E असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात.

टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननुसार, हे फोन्स ‘किंग ऑफ परफॉर्मन्स’ या टॅगलाईनसह बाजारात येऊ शकतात. या स्मार्टफोन्समध्ये क्वॉलकॉम आणि मीडियाटेकचे हायएंड चिपसेट दिला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार रेडमी के60 सीरिज पुढील वर्षी जानेवारीमध्ये आली होती, त्यामुळे ही नवीन माहिती रेडमी प्रेमींसाठी गुडन्यूज म्हणता येईल. ही सीरिज भारतासह जागतिक बाजारात मात्र पोको ब्रॅंडिंगसह येऊ शकते. हे देखील वाचा: जियोला मात देण्यासाठी एयरटेलची नवी चाल; मोफत हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन असलेल्या प्लॅनचं पुनरागमन

Redmi K60 सीरिजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

लीक रिपोर्ट्सनुसार Redmi K60 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8 Gen2 चिपसेट दिला जाऊ शकतो, तर प्रो व्हर्जनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen1 चिपसेट मिळू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. परंतु बेस मॉडेलमध्ये प्रो मॉडेलपेक्षा शक्तिशाली प्रोसेसर मिळेल, ही माहिती पचनी पडत नाही. त्यामुळे या दोन मॉडेलच्या चिपसेटच्या माहितीसाठी लाँचची वाट पाहावी लागेल.

Redmi k60

दुसरीकडे Redmi K60E स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा चिपसेट मिळू शकतो, ज्याचं नाव अद्याप समोर आलं नाही. परंतु असा अंदाज लावला जात आहे की या रेडमी स्मार्टफोनमध्ये Dimensity 8200 चिपसेट दिला जाऊ शकतो. Redmi K60 मध्ये 6.67-इंचाचा क्यूएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी मिळेल जी 67W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करू शकते. तसेच रेडमी के सीरिजमध्ये पहिल्यांदाच 30W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.

फोटोग्राफी सेगमेंट पाहता Redmi K60 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात येऊ शकतो, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तर Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये 2K रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळू शकतो. तसेच प्रो मॉडेल 67W वायर्ड फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: स्वस्त 5G फोन हवा? मग थांबा! Snapdragon 4 Gen 1, 50MP ट्रिपल कॅमेऱ्यासह Moto G53 5G येतोय

Redmi K60 सीरिज या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चीनमध्ये लाँच होऊ शकतो, त्यामुळे लवकरच या सीरीजच्या सर्व स्पेक्सची माहिती समोर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here