OnePlus Ace 2V - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:32:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus Ace 2V मध्ये मिळू शकते 5000mAh ची बॅटरी आणि आयआर ब्लास्टर; कंपनीनं दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2v-confirmed-new-features/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2v-confirmed-new-features/#respond Fri, 03 Mar 2023 09:40:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18367 काही दिवसांपूर्वी OnePlus नं आपली एक नवीन स्मार्टफोन सीरिज OnePlus Ace 2 चीनमध्ये सादर केली होती. आता या सीरिजमधील नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 2V नावानं बाजारात येईल जो अलीकडेच आलेल्या OnePlus Ace 2 चा किफायतशीर व्हेरिएंट असू शकतो. कंपनीनं एका विबो पोस्टच्या माध्यमातून या डिवाइसच्या लाँच डेटची माहिती दिली. हा स्मार्टफोन 7 मार्च 2023 ला […]

The post OnePlus Ace 2V मध्ये मिळू शकते 5000mAh ची बॅटरी आणि आयआर ब्लास्टर; कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus नं आगामी OnePlus Ace 2V स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन सांगितले आहेत.
  • हा फोन येत्या 7 मार्चला चीनमध्ये सादर केला जाईल.
  • हा डिवाइस जागतिक बाजारात नॉर्ड ब्रँडिंगसह सादर केला जाईल.

काही दिवसांपूर्वी OnePlus नं आपली एक नवीन स्मार्टफोन सीरिज OnePlus Ace 2 चीनमध्ये सादर केली होती. आता या सीरिजमधील नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 2V नावानं बाजारात येईल जो अलीकडेच आलेल्या OnePlus Ace 2 चा किफायतशीर व्हेरिएंट असू शकतो. कंपनीनं एका विबो पोस्टच्या माध्यमातून या डिवाइसच्या लाँच डेटची माहिती दिली. हा स्मार्टफोन 7 मार्च 2023 ला चीनमध्ये सादर केला जाऊ शकतो. कंपनीनं या स्मार्टफोनची प्रीबुकिंग देखील सुरु केली आहे. तसेच आता कंपनीनं एका विबो पोस्टच्या माध्यमातून या स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची देखील माहिती दिली आहे.

OnePlus Ace 2V चे संभाव्य स्पेसिफिकेशन

वनप्लसनं माहिती दिली आहे की आगामी स्मार्टफोनमध्ये 5000mAh मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. परंतु या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग मिळणार नाही. कंपनीनं सांगितलं आहे की OnePlus Ace 2V स्मार्टफोन लीग ऑफ लिजंड्स गेममध्ये 120fps गेमिंगला सपोर्ट करू शकतो आणि गेम ऑफ पीसमध्ये 90fps रेट मिळू शकतो. कंपनीच्या माहितीनुसार Ace 2V स्मार्टफोनची जाडी 8.15mm आणि वजन 191.5 ग्राम असू शकते. हे देखील वाचा: Infinix करत आहे 260W फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनची तयारी; रिपोर्टमधून खुलासा

याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये आयआर ब्लास्टर आणि एनएफसी मिळू शकतो. याआधी कंपनीनं कन्फर्म केलं होतं की हा फोन 5nm फॅब्रिकेशनवर बनलेल्या Dimensity 9000 चिपसेटवर चालू शकतो. वनप्लस चायनाच्या प्रेसिडंटनं सांगतील आहे की हा फोन 12GB + 256GB आणि 12GB + 512GB व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. तसेच फोनमध्ये 6.74 इंचाचा फ्लेक्सिबल ओएलईडी डिस्प्ले 120हर्ट्झ रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो.

यातील डिस्प्ले 1.5के रिजोल्यूशन त्याचबरोबर 2772 x 1240 पिक्सेल आणि 1450 नीट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करू शकतो. तसेच यात हाय फ्रिक्वेन्सी पीडब्ल्यूएम डिमिन्ग मिळू शकते. या डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा मिळू शकतो आणि हा HDR10+ सर्टिफाइड असू शकतो. फोनमध्ये फ्लॅट एज डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Redmi 12C येतोय भारतात; लाँचपूर्वीच सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला फोन

याआधी आलेल्या माहितीनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. यातील मुख्य सेन्सर OIS सपोर्ट असलेला 64 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो, जोडीला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा Sony IMX 471 सेन्सर असू शकतो हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर चालू शकतो. कंपनी यावेळी 3.5एमएम हेडफोन जॅकला विसरणार नाही. हा फोन चीनबाहेर वनप्लस नोर्ड सीरिजमध्ये सादर केला जाऊ शकतो.

The post OnePlus Ace 2V मध्ये मिळू शकते 5000mAh ची बॅटरी आणि आयआर ब्लास्टर; कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-ace-2v-confirmed-new-features/feed/ 0
कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच टीज केला OnePlus Ace 2V; सर्वप्रथम येणार चीनमध्ये https://www.91mobiles.com/marathi/7-march-oneplus-ace-2v-launch-date/ https://www.91mobiles.com/marathi/7-march-oneplus-ace-2v-launch-date/#respond Tue, 28 Feb 2023 05:30:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18222 OnePlus संबंधित बातमी येत आहे की कंपनी आपल्या ‘एस’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OnePlus Ace 2V नावानं मार्केटमध्ये एंट्री करेल. कंपनी प्रेसिडेंट Louis Li यांनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर पोस्ट करत या मोबाइल फोनचा लाँच टीज केला आहे. एक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून वनप्लस एस 2वी ची लाँच डेट देखील समोर आली आहे. विशेष […]

The post कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच टीज केला OnePlus Ace 2V; सर्वप्रथम येणार चीनमध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Ace 2V 7 मार्चला चीनमध्ये लाँच होईल.
  • हा फोन भारतात OnePlus Nord 3 बनून सादर केला जाईल.
  • MediaTek Dimensity 9000 असलेला हा पहिला फोन असू शकतो.

OnePlus संबंधित बातमी येत आहे की कंपनी आपल्या ‘एस’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OnePlus Ace 2V नावानं मार्केटमध्ये एंट्री करेल. कंपनी प्रेसिडेंट Louis Li यांनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर पोस्ट करत या मोबाइल फोनचा लाँच टीज केला आहे. एक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून वनप्लस एस 2वी ची लाँच डेट देखील समोर आली आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन भारतात OnePlus Nord 3 नावानं एंट्री करू शकतो.

OnePlus Ace 2V चा लाँच

वनप्लस एस 2वी संबंधित माहिती समोर आली आहे की हा स्मार्टफोन येत्या 7 मार्चला लाँच केला जाऊ शकतो. कंपनी हा मोबाइल फोन सर्वप्रथम होम मार्केट चीनमध्ये सादर करू शकते जो नंतर अन्य मार्केट्समध्ये उपलब्ध होऊ शकतो. काही लीक्सनुसार हाच वनप्लस फोन भारतात OnePlus Nord 3 नावानं येईल जो जुलैमध्ये भारतात लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: 320km ची रेंज वाली Citroen eC3 इलेक्ट्रिक कार झाली लाँच, किंमत आहे इतकी

OnePlus Ace 2V चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ FHD+ 120Hz Display
  • 16GB RAM + 512GB storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP Triple Rear Camera
  • 16MP selfie shooter
  • 5,000mAh battery

वनप्लस एस 2वी मध्ये 6.72 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकते जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला असू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर असू शकतो.

वनप्लस एस 2वी ब्रँडचा पहिला असा स्मार्टफोन असू शकतो जो मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच हा प्रोसेसर 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला असू शकतो जो हेव्ही टास्क तसेच गेमिंगसाठी बेस्ट मानला जातो. आतापर्यंत कोणत्याही वनप्लस मोबाइलमध्ये या प्रोसेसरचा वापर करण्यात आलेला नाही. आशा आहे की OnePlus Ace 2V मध्ये याचा सपोर्ट मिळेल. हे देखील वाचा: Realme C55 भारतात कधी होणार लाँच आणि कसा असेल लुक व स्पेसिफिकेशन्स; इथे पाहा सर्व माहिती

OnePlus Ace 2V चे अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन 16 जीबी रॅमवर लाँच केला जाऊ शकतो जोडीला 512 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. फोनचे एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट्स देखील बाजारात येऊ शकतात. हा वनप्लस मोबाइल अँड्रॉइड 13 सह येईल. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच टीज केला OnePlus Ace 2V; सर्वप्रथम येणार चीनमध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/7-march-oneplus-ace-2v-launch-date/feed/ 0