कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच टीज केला OnePlus Ace 2V; सर्वप्रथम येणार चीनमध्ये

Highlights

  • OnePlus Ace 2V 7 मार्चला चीनमध्ये लाँच होईल.
  • हा फोन भारतात OnePlus Nord 3 बनून सादर केला जाईल.
  • MediaTek Dimensity 9000 असलेला हा पहिला फोन असू शकतो.

OnePlus संबंधित बातमी येत आहे की कंपनी आपल्या ‘एस’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OnePlus Ace 2V नावानं मार्केटमध्ये एंट्री करेल. कंपनी प्रेसिडेंट Louis Li यांनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर पोस्ट करत या मोबाइल फोनचा लाँच टीज केला आहे. एक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून वनप्लस एस 2वी ची लाँच डेट देखील समोर आली आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन भारतात OnePlus Nord 3 नावानं एंट्री करू शकतो.

OnePlus Ace 2V चा लाँच

वनप्लस एस 2वी संबंधित माहिती समोर आली आहे की हा स्मार्टफोन येत्या 7 मार्चला लाँच केला जाऊ शकतो. कंपनी हा मोबाइल फोन सर्वप्रथम होम मार्केट चीनमध्ये सादर करू शकते जो नंतर अन्य मार्केट्समध्ये उपलब्ध होऊ शकतो. काही लीक्सनुसार हाच वनप्लस फोन भारतात OnePlus Nord 3 नावानं येईल जो जुलैमध्ये भारतात लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: 320km ची रेंज वाली Citroen eC3 इलेक्ट्रिक कार झाली लाँच, किंमत आहे इतकी

OnePlus Ace 2V चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ FHD+ 120Hz Display
  • 16GB RAM + 512GB storage
  • MediaTek Dimensity 9000
  • 50MP Triple Rear Camera
  • 16MP selfie shooter
  • 5,000mAh battery

वनप्लस एस 2वी मध्ये 6.72 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकते जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला असू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर असू शकतो.

वनप्लस एस 2वी ब्रँडचा पहिला असा स्मार्टफोन असू शकतो जो मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच हा प्रोसेसर 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला असू शकतो जो हेव्ही टास्क तसेच गेमिंगसाठी बेस्ट मानला जातो. आतापर्यंत कोणत्याही वनप्लस मोबाइलमध्ये या प्रोसेसरचा वापर करण्यात आलेला नाही. आशा आहे की OnePlus Ace 2V मध्ये याचा सपोर्ट मिळेल. हे देखील वाचा: Realme C55 भारतात कधी होणार लाँच आणि कसा असेल लुक व स्पेसिफिकेशन्स; इथे पाहा सर्व माहिती

OnePlus Ace 2V चे अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन 16 जीबी रॅमवर लाँच केला जाऊ शकतो जोडीला 512 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. फोनचे एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट्स देखील बाजारात येऊ शकतात. हा वनप्लस मोबाइल अँड्रॉइड 13 सह येईल. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here