मार्चमध्ये येऊ शकतो Realme C55 भारतात; टिपस्टरनं शेयर केला मार्केटिंग व्हिडीओ

Highlights

  • Realme C55 मार्चमध्ये भारतात लाँच होईल.
  • हा स्मार्टफोन 6MP Rear Camera सपोर्ट करेल.
  • UI मुळे या फोनमध्ये iPhone 14 Pro सारखा पंच-होल दिसेल.

रियलमी संबंधित बातमी अलीकडेच समोर आली होती की कंपनी दोन स्वस्त स्मार्टफोन्सवर काम करत आहे जे Realme C55 आणि Realme C33 2023 नावाने लाँच होतील. आता यातील एक रियलमी सी55 ची लाँच टाइमलाईन लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. इतकेच नव्हे तर टिपस्टर पारस गुगलानीनं फोनचा मार्केटिंग व्हिडीओ देखील आपल्या ट्वीटर हँडलवर शेयर केला आहे ज्यामुळे रियलमी सी55 च्या लुक व डिजाईनचा खुलासा झाला आहे.

Realme C55 भारतीय लाँच

रियलमी सी55 बद्दल दावा केला गेला आहे की हा मोबाइल फोन पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये भारतात लाँच होऊ शकतो. ही बातमी समोर आल्यानंतर चर्चा सुरु झाली आहे की पुढील काही दिवसांमध्ये कंपनी हा मोबाइल फोन अधिकृतपणे टीज करण्यास सुरु करू शकते. आशा आहे की MWC 2023 संपल्यावर कदाचित Realme C55 इंडिया लाँचची घोषणा करू शकते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या डोकेदुखीत वाढ; तब्बल 12GB RAM सह Samsung Galaxy A14 4G फोन लाँच

Realme C55 चा लुक

रियलमी सी55 चे फोटो समोर आल्यामुळे स्पष्ट झालं आहे कि हा मोबाइल फोन सिंगल सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर पंच-होल डिस्प्ले दिली जाऊ शकतो ज्यात कॅमेरा असेल. स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेला हा होल बॉडी एजपासून दूर आहे तसेच स्क्रीनच्या चारही बाजूंना राउंड ऐज असलेले नॅरो बेजल्स देण्यात आले आहेत.

बॅक पॅनलवर दोन मोठे रिंग असलेला रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकनी आकाराच्या मॉड्यूलमध्ये आहे. लेन्सच्या बाजूला फ्लॅश आहे आणि जवळच सेन्सरची माहिती लिहिण्यात आली आहे. फोनचा रियर पॅनल चमकदार आहे. लोव्हर पॅनलवर यूएसबी टाईप सी पोर्ट सोबतच मायक्रोफोन आणि स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे. उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेन्सर असलेला पावर बटन मिळतो.

Realme C55 चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी सी55 च्या फोटोवरून स्पष्ट झालं आहे की हा मोबाइल 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करेल. तसेच लीकनुसार या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेट दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं समोर आलं आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. हा रियलमी मोबाइल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेवर लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: 320km ची रेंज वाली Citroen eC3 इलेक्ट्रिक कार झाली लाँच, किंमत आहे इतकी

Realme C55 बाबत सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. यात 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजचा समावेश असेल. तसेच कलर मॉडेल्स पाहता रिपोर्टनुसार हा रियलमी स्मार्टफोन भारतीय बाजारात Rainforest (Green), Rainy Night (black) आणि Sunshower (orange) कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here