Redmi 12C येतोय भारतात; लाँचपूर्वीच सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला फोन

Highlights

  • Redmi लवकरच भारतात Redmi 12C सादर करू शकते.
  • Redmi 12C चा भारतीय व्हेरिएंट BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट झाला आहे.
  • BIS लिस्टिंगवरून अंदाज लावला जात आहे की लवकरच या फोनची भारतात एंट्री होईल.

Redmi एका नव्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन काम करत असल्याची चर्चा आहे, जो Redmi 12C नावानं बाजारात दाखल होईल. या स्मार्टफोनच्या ग्लोबल व्हेरिएंटची डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स काही दिवसांपूर्वी लीक झाले होते. आता रेडमी 12सी स्मार्टफोन भारतीय व्हेरिएंट भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर दिसला आहे. सर्टिफिकेशन वेबसाइटच्या लिस्टिंगवरून अंदाज लावला जात आहे की रेडमी 12सी लवकरच भारतात सादर केला जाईल. हा फोन युएईच्या TDRA सर्टिफिकेशन साईटवर देखील दिसला होता.

Redmi 12C भारतीय लाँच

टिपस्टर मुकुल शर्मानं रेडमी 12सी स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साईटवर सर्वप्रथम स्पॉट केला आहे. हा फोन तिंते Redmi 22120RN86I मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की लवकरच हा फोन भारतीय ग्राहकांच्या भेटीला येईल. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा झाला नाही. परंतु या फोनचा ग्लोबल व्हर्जन 22120RN86G मॉडेल नंबरसह युएईच्या सर्टिफिकेशन वेबसाइट TDRA वर लिस्ट झाला आहे, जिथून या आगामी रेडमी फोनच्या नावाची माहिती मिळाली आहे. हे देखील वाचा: 13 हजारांपेक्षा कमी किंमतीत 6,000mAh battery आणि 10.1-इंच डिस्प्ले; iTel PAD 1 4G टॅबलेट भारतात लाँच

Redmi 12C चे अपेक्षित स्पेसिफिकेशन

अलीकडेच लीक झालेल्या स्पेक्सनुसार रेडमी 12सी स्मार्टफोनमध्ये 6.71 इंचाचा डिस्प्ले मिळेल, त्यामुळे हा एक बजेट स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. हा पॅनल एचडी+ रिजोल्यूशनसह बाजारात येऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलीयो जी85 प्रोसेसरचा वापर करेल. जोडीला 4जीबी रॅम आणि 128जीबी पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: Infinix करत आहे 260W फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनची तयारी; रिपोर्टमधून खुलासा

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. रेडमी 12सी मध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि एक क्यूव्हीजीए सेन्सर दिला जाऊ शकतो. तर फ्रंटला एक 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील पाहायला मिळेल. रेडमीच्या आगामी बजेट स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईफ 12 गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टम मिळू शकते. जी हलकी असते आणि गुगलच्या गो अ‍ॅप्ससह कमी रॅम, स्टोरेज आणि पावरचा वापर करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here