काही दिवसांपूर्वी OnePlus नं आपली एक नवीन स्मार्टफोन सीरिज OnePlus Ace 2 चीनमध्ये सादर केली होती. आता या सीरिजमधील नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 2V नावानं बाजारात येईल जो अलीकडेच आलेल्या OnePlus Ace 2 चा किफायतशीर व्हेरिएंट असू शकतो. कंपनीनं एका विबो पोस्टच्या माध्यमातून या डिवाइसच्या लाँच डेटची माहिती दिली. हा स्मार्टफोन 7 मार्च 2023 ला चीनमध्ये सादर केला जाऊ शकतो. कंपनीनं या स्मार्टफोनची प्रीबुकिंग देखील सुरु केली आहे. तसेच आता कंपनीनं एका विबो पोस्टच्या माध्यमातून या स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची देखील माहिती दिली आहे.
OnePlus Ace 2V चे संभाव्य स्पेसिफिकेशन
वनप्लसनं माहिती दिली आहे की आगामी स्मार्टफोनमध्ये 5000mAh मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. परंतु या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग मिळणार नाही. कंपनीनं सांगितलं आहे की OnePlus Ace 2V स्मार्टफोन लीग ऑफ लिजंड्स गेममध्ये 120fps गेमिंगला सपोर्ट करू शकतो आणि गेम ऑफ पीसमध्ये 90fps रेट मिळू शकतो. कंपनीच्या माहितीनुसार Ace 2V स्मार्टफोनची जाडी 8.15mm आणि वजन 191.5 ग्राम असू शकते. हे देखील वाचा: Infinix करत आहे 260W फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनची तयारी; रिपोर्टमधून खुलासा
याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये आयआर ब्लास्टर आणि एनएफसी मिळू शकतो. याआधी कंपनीनं कन्फर्म केलं होतं की हा फोन 5nm फॅब्रिकेशनवर बनलेल्या Dimensity 9000 चिपसेटवर चालू शकतो. वनप्लस चायनाच्या प्रेसिडंटनं सांगतील आहे की हा फोन 12GB + 256GB आणि 12GB + 512GB व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. तसेच फोनमध्ये 6.74 इंचाचा फ्लेक्सिबल ओएलईडी डिस्प्ले 120हर्ट्झ रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो.
यातील डिस्प्ले 1.5के रिजोल्यूशन त्याचबरोबर 2772 x 1240 पिक्सेल आणि 1450 नीट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करू शकतो. तसेच यात हाय फ्रिक्वेन्सी पीडब्ल्यूएम डिमिन्ग मिळू शकते. या डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा मिळू शकतो आणि हा HDR10+ सर्टिफाइड असू शकतो. फोनमध्ये फ्लॅट एज डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Redmi 12C येतोय भारतात; लाँचपूर्वीच सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला फोन
याआधी आलेल्या माहितीनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. यातील मुख्य सेन्सर OIS सपोर्ट असलेला 64 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो, जोडीला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा Sony IMX 471 सेन्सर असू शकतो हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर चालू शकतो. कंपनी यावेळी 3.5एमएम हेडफोन जॅकला विसरणार नाही. हा फोन चीनबाहेर वनप्लस नोर्ड सीरिजमध्ये सादर केला जाऊ शकतो.