Citroen India ना आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Citroen eC3 EV hatchback लाँच केली आहे. भारतात कंपनीनं या Citroen eC3 इलेक्ट्रिक कारच्या किंमतीचा खुलासा देखील केला आहे. हीच लुक कंपनीच्या Citroen C3 पेट्रोल व्हर्जन प्रमाणेच आहे. C3 hatchback च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची खासियत पाहत यात 29.2kWh चा बॅटरी पॅक मिळतो जो 320KM ची रेंज देतो. चला जाणून घेऊया या कारची संपूर्ण सोबतच हिचे बुकिंग डिटेल.
Citroen eC3 Ev Price
आकर्षक लुक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटर असलेल्या Citroen eC3 ची प्रारंभिक किंमत 11.50 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे ही कार दिसायला अगदी पेट्रोल (ICE) पावर्ड व्हेरिएंट सारखी आहे, हिच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 12.43 लाख रुपये आहे. कंपनीनं या कारची बुकिंग आधीच सुरु केली आहे, ज्यासाठी 25,000 रुपयांची रक्कम बुकिंग अमाउंट म्हणून जमा करावी लागेल. सध्या हिची बुकिंग देशातील 25 शहरांमध्ये होत आहे. हे देखील वाचा: बर्फासारखा थंड राहणारा फोन! पण तुम्हाला खरेदी करता येणार नाही OnePlus चा हा हटके स्मार्टफोन
Citroen eC3 ची माहिती
eC3 hatchback मध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात 10.2-inch इंफोटेंमेंट, ड्युअल एयरबॅग्स आणि ड्राईव्हिंग मोड्सचा समावेश आहे. Citroen electric hatchback ची टक्कर अलीकडेच भारतात आलेल्या Tata Tiago EV शी होईल, ज्यात 315KM ची रेंज मिळते. वर सांगितल्याप्रमाणे आम्ही Citroen eC3 अपने ICE-पावर्ड सिबलिंग फ्रेंच ऑटोमेकरच्या C3 हॅचबॅक सारखी दिसते. यात सिट्रोन लोगो आणि सेमी-क्रॉसओव्हर डिजाइन असलेली स्लीक ग्रिल देण्यात आली आहे.
यात 170mm चा ग्राउंड क्लियरन्स मिळतो. तसेच, Citroen eC3 मध्ये 29.2kWh चा बॅटरी पॅक आहे. त्याचबरोबर एक इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे जी 57hp पीक पावर आणि 143Nm पीक टॉर्क देते. ईसी3 मध्ये 320 किमीची एआरएआय-सर्टिफाइड रेंज देण्यात आली आहे आणि यात दोन ड्राईव्हिंग मोड ईको आणि स्टँडर्ड आहेत. कंपनीचा दावा आहे की eC3 फक्त 6.8 सेकंदात 0 ते 60 किमी ताशी वेग गाठू शकते. या ई-कारचा टॉप स्पीड 107 किमी ताशी आहे. ईसी3 डीसी फास्ट चार्जिंगचा स्वीकार करतो जो 57 मिनिटांत ही कार 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल.
eC3 इंफोटेनमेंट सिस्टमसाठी 10.2 इंचाची टचस्क्रीन मिळते, ज्यात Apple CarPlay आणि Android Auto, 4 स्पिकर, MyCitroen Connect अॅपच्या माध्यमातून कनेक्ट करता येईल. फ्रेंच ऑटोमेकर बॅटरी पॅकवर 7 वर्ष/1,40,000 किलोमीटरची वॉरंटी, इलेक्ट्रिक मोटरवर 5 वर्ष/1,00,000 किलोमीटरची वॉरंटी आणि कारवर 3 वर्ष/1,25,000 किलोमीटरची वॉरंटी देखील देईल. हे देखील वाचा: मार्च एंडिंग असलं तरी फुल टू करमणूक करतील ‘हे’ चित्रपट; पुढील महिन्यात येणार OTT वर