Oppo Find N2 Flip - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 13 Mar 2023 10:28:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Find N2 Flip च्या भारतीय किंमतीची घोषणा; वेबसाइटसह फ्लिपकार्टवरून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-n2-flip-price-in-india-revealed-know-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-n2-flip-price-in-india-revealed-know-specifications/#respond Mon, 13 Mar 2023 10:26:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19422 OPPO Find N2 Flip काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सादर करण्यात आला होता. आज कंपनीनं या फ्लिप फोनच्या भारतीय किंमतीची घोषणा केली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार हा फोन 89,999 रुपयांमध्ये ओप्पोच्या वेबसाइटसह फ्लिपकार्टवरून विकला जाईल. भारतात आलेला हा ब्रँडचा पहिला फोल्डेबल फोन आहे. चला जाणून घेऊया या नवीन फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स. OPPO Find N2 Flip […]

The post OPPO Find N2 Flip च्या भारतीय किंमतीची घोषणा; वेबसाइटसह फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Find N2 Flip ची भारतीय किंमत 89,999 रुपये आहे.
  • फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी आणि 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे.
  • Find N2 Flip फ्लिपकार्ट आणि ओप्पो स्टोर ऑनलाइनवर विकला जाईल.

OPPO Find N2 Flip काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सादर करण्यात आला होता. आज कंपनीनं या फ्लिप फोनच्या भारतीय किंमतीची घोषणा केली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार हा फोन 89,999 रुपयांमध्ये ओप्पोच्या वेबसाइटसह फ्लिपकार्टवरून विकला जाईल. भारतात आलेला हा ब्रँडचा पहिला फोल्डेबल फोन आहे. चला जाणून घेऊया या नवीन फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

OPPO Find N2 Flip ची भारतीय किंमत

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप भारतात 89,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत फोनच्या एकमेव 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज मॉडेलची आहे. हा फोन फ्लिपकार्टसह ओप्पो इंडिया स्टोरवरून पर्पल आणि ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. फोनची विक्री 17 मार्चला सुरु होईल. हे देखील वाचा: Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G फोन 16 मार्चला होऊ शकतात भारतात लाँच; वेबसाइटवर झाले लिस्ट

OPPO Find N2 Flip चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.8″ 120Hz Display
  • 60Hz Secondary Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 9000+
  • 32MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 44W 4,300mAh Battery

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. यातील प्रायमरी डिस्प्ले 6.8 इंचाचा असून फुलएचडी+ 2520 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. तसेच फोन घडी केल्यानंतर एक छोटी स्क्रीन बाहेर दिसते ज्यात 720 × 382 पिक्सल रिजोल्यूशन मिळते. या दोन्ही डिस्प्लेमध्ये कंपनीनं अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर केला आहे जो शानदार आणि शार्प व्हिज्युअल क्वॉलिटी देतो.

OPPO Find N2 Flip च्या प्रायमरी स्क्रीनवर 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो तसेच सेकंडरी स्क्रीनवर 60हर्ट्ज रिफ्रेश रेट व 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. मेन स्क्रीन वर 1600निट्स ब्राइटनेस, 403पीपीआय आणि 16.7एम कलर सारखे फीचर्स मिळतात. तसेच बाहेरील स्क्रीन देखील 900निट्स ब्राइटनेस व 250पीपीआयला सपोर्ट करते. ओप्पोनं आपला हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट केला आहे.

हा ओप्पो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल सुपर वाइड अँगल लेन्ससह येतो. यातील एक 7पी आणि दुसरी 5जी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फाइंड एन2 फ्लिप फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोन लेटेस्ट मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13.0 सह चालतो. या स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 4एनएम मीडियाटेक डिमेनसिटी 9000+ चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा ओप्पो मोबाइल एआरएम माली-जी710 एमसी10 जीपीयूला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8जीबी पर्यंतचा रॅम आणि 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जे LPDDR5 RAM आणि UFS3.1 ROM टेक्नॉलॉजीवर काम करतात. हे देखील वाचा: फक्त 5999 रुपयांमध्ये लाँच झाला Nokia C12, जाणून घ्या फीचर्स

दिसायला स्लीक आणि स्लीम असलेल्या स्मार्टफोनमध्ये ओप्पोनं शक्तिशाली बॅटरी दिली आहे. ओप्पो फाइंड एन2 फ्लिप 4,300एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 44W SUPERVOOC टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा ओप्पो मोबाइल ओटीजी रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे दुसरे डिवायस देखील चार्ज करता येतात.

The post OPPO Find N2 Flip च्या भारतीय किंमतीची घोषणा; वेबसाइटसह फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-n2-flip-price-in-india-revealed-know-specifications/feed/ 0
OPPO Find N2 Flip झाला भारतात लाँच; फोनमध्ये 32एमपीचा सेल्फी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/foldable-phone-oppo-find-n2-flip-launched-globally-know-specifications-and-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/foldable-phone-oppo-find-n2-flip-launched-globally-know-specifications-and-price-in-india/#respond Wed, 15 Feb 2023 15:30:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17849 ओप्पोचा फोल्डेबल फोन OPPO Find N2 Flip आज भारतात लाँच झाला आहे. हटके डिजाईन असलेला हा मोबाइल फोन दोन डिस्प्लेला सपोर्ट करतो. याची फक्त स्टाईल शानदार नाही तर फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील जबरदस्त आहेत. यात 16GB रॅम, मीडियाटेक डिमेन्सिटी 9000+ प्रोसेसर आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळतो. अ‍ॅडव्हान्स फीचर असलेल्या ओप्पो फाइंड एन2 फ्लिप स्मार्टफोनच्या किंमत व […]

The post OPPO Find N2 Flip झाला भारतात लाँच; फोनमध्ये 32एमपीचा सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Find N2 Flip चा घडी करून छोटा करता येतो.
  • या फोनमध्ये दोन डिस्प्ले देण्यात आला आहे. एक आत आणि एक बाहेर.
  • हा छोटा स्मार्टफोन 16GB RAM आणि 5Gला सपोर्ट करतो.

ओप्पोचा फोल्डेबल फोन OPPO Find N2 Flip आज भारतात लाँच झाला आहे. हटके डिजाईन असलेला हा मोबाइल फोन दोन डिस्प्लेला सपोर्ट करतो. याची फक्त स्टाईल शानदार नाही तर फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील जबरदस्त आहेत. यात 16GB रॅम, मीडियाटेक डिमेन्सिटी 9000+ प्रोसेसर आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळतो. अ‍ॅडव्हान्स फीचर असलेल्या ओप्पो फाइंड एन2 फ्लिप स्मार्टफोनच्या किंमत व सेलची संपूर्ण माहिती पुढे वाचता येईल.

OPPO Find N2 Flip चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.8″ 120Hz Display
  • 60Hz Secondary Display
  • 16GB RAM + 512GB Storage
  • MediaTek Dimensity 9000+
  • 32MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 44W 4,300mAh Battery

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. यातील प्रायमरी डिस्प्ले 6.8 इंचाचा असून फुलएचडी+ 2520 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. तसेच फोन घडी केल्यानंतर एक छोटी स्क्रीन बाहेर दिसते ज्यात 720 × 382 पिक्सल रिजोल्यूशन मिळते. या दोन्ही डिस्प्लेमध्ये कंपनीनं अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर केला आहे जो शानदार आणि शार्प व्हिज्युअल क्वॉलिटी देतो.

OPPO Find N2 Flip च्या प्रायमरी स्क्रीनवर 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो तसेच सेकंडरी स्क्रीनवर 60हर्ट्ज रिफ्रेश रेट व 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. मेन स्क्रीन वर 1600निट्स ब्राइटनेस, 403पीपीआय आणि 16.7एम कलर सारखे फीचर्स मिळतात. तसेच बाहेरील स्क्रीन देखील 900निट्स ब्राइटनेस व 250पीपीआयला सपोर्ट करते. ओप्पोनं आपला हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट केला आहे.

हा ओप्पो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल सुपर वाइड अँगल लेन्ससह येतो. यातील एक 7पी आणि दुसरी 5जी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फाइंड एन2 फ्लिप फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो फाइंड एन2 फ्लिप फोन लेटेस्ट मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13.0 सह चालतो. या स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 4एनएम मीडियाटेक डिमेनसिटी 9000+ चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा ओप्पो मोबाइल एआरएम माली-जी710 एमसी10 जीपीयूला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 16जीबी पर्यंतचा रॅम आणि 512जीबी पर्यंतच्या स्टोरेज देण्यात आली आहे जे LPDDR5 RAM आणि UFS3.1 ROM टेक्नॉलॉजीवर काम करतात.

दिसायला स्लीक आणि स्लीम असलेल्या स्मार्टफोनमध्ये ओप्पोनं शक्तिशाली बॅटरी दिली आहे. ओप्पो फाइंड एन2 फ्लिप 4,300एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 44W SUPERVOOC टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा ओप्पो मोबाइल ओटीजी रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे दुसरे डिवायस देखील चार्ज करता येतात.

OPPO Find N2 Flip Price

ओपो फाइंड एन2 फ्लिप 5जी फोनचा सिंगल व्हेरिएंट बाजारात आला आहे, ज्यात 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची ग्लोबल प्राइस 849 यूरो आहे जी भारतीय कंरसी नुसार 75,000 रुपयांच्या असपास आहे. कंपनीनं OPPO Find N2 Flip चं प्रोडक्ट पेज ओपो इंडिया ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह केलं आहे त्यामुळे भारतीय किंमत येताच तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. ।

The post OPPO Find N2 Flip झाला भारतात लाँच; फोनमध्ये 32एमपीचा सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/foldable-phone-oppo-find-n2-flip-launched-globally-know-specifications-and-price-in-india/feed/ 0
दोन-दोन डिस्प्लेसह OPPO Find N2 Flip लाँच; फोल्डेबल Find N2 ची एंट्री देखील झाली https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-n2-flip-foldables-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-n2-flip-foldables-launched-price-specifications/#respond Fri, 16 Dec 2022 06:25:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16056 OPPO Find N2 आणि Find N2 Flip हे दोन फोल्डेबल स्मार्टफोन कंपनीनं सादर केले आहेत. या दोन स्मार्टफोनची डिजाईन Samsung Galaxy Z Fold आणि Galaxy Z Flip सारखी आहे. Qualcomm च्या Snapdragon 8 Plus Gen1 चिपसेटसह येणारा OPPO Find N2 जुन्या फाइन्ड एन पेक्षा 1.3mm पातळ आहे आणि यात आता फ्लेक्स फॉर्म मोड देण्यात आला […]

The post दोन-दोन डिस्प्लेसह OPPO Find N2 Flip लाँच; फोल्डेबल Find N2 ची एंट्री देखील झाली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO Find N2 आणि Find N2 Flip हे दोन फोल्डेबल स्मार्टफोन कंपनीनं सादर केले आहेत. या दोन स्मार्टफोनची डिजाईन Samsung Galaxy Z Fold आणि Galaxy Z Flip सारखी आहे. Qualcomm च्या Snapdragon 8 Plus Gen1 चिपसेटसह येणारा OPPO Find N2 जुन्या फाइन्ड एन पेक्षा 1.3mm पातळ आहे आणि यात आता फ्लेक्स फॉर्म मोड देण्यात आला आहे. तर छोटा OPPO Find N2 Flip स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 Plus चिपसेट, 50MP कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 3.26-इंचाचा कव्हर डिस्प्लेसह बाजारात आला आहे.

OPPO Find N2 आणि Find N2 Flip ची किंमत

OPPO Find N2 ची किंमत 7,999 युआन (सुमारे 95,000 रुपये) ठेवण्यात आली आहे, ज्यात 12GB रॅम व 256GB स्टोरेज मिळते. तर 8,999 युआन (सुमारे 1,06,900 रुपये) मध्ये 16GB रॅम व 512GB स्टोरेज मॉडेल मिळतो. हा डिवाइस ब्लॅक ग्रीन आणि व्हाइट कलर ऑप्शनसह आला आहे. हे देखील वाचा: बाजारात नवा ‘सेल्फी किंग’? 60MP फ्रंट कॅमेऱ्यासह शक्तिशाली Moto X40 लाँच; 10 हजारांच्या रेंजमध्ये 5G Phone लाँच

OPPO Find N2 Flip ची किंमत 5,999 युआन (सुमारे 71,300 रुपये) ठेवण्यात आली आहे, जो 8GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला बेस मॉडेल आहे. तर टॉप एन्ड मॉडेलमध्ये 16GB रॅम व 512GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत 6,999 युआन (सुमारे 83,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात येणार का याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.

OPPO Find N2 चे स्पेसिफिकेशन्स

OPPO Find N2 फोल्डेबल स्मार्टफोनच्या बाहेरील बाजूस 5.54-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 2,120 x 1,080 पिक्सल रिजोल्यूशन आणि गोरिल्ला ग्लास विक्ट्सच्या लेयरसह येतो. तर 7.1-इंचाचा एलटीपीओ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आतल्या बाजूस मिळतो. ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,920 x 1,792 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करते.

या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा शक्तिशाली Snapdragon 8 Plus Gen1 प्रोसेसर Adreno GPU सह देण्यात आला आहे. जोडीला 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, Wi-Fi, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट मिळतो. तर सिक्योरिटीसाठी या ड्युअल सिम फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी OPPO Find N2 च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एफ 1.8 अपर्चर व ओआयएस सपोर्ट असलेला 50MP चा प्रायमरी Sony IMX890 सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एलईडी फ्लॅशसह एफ 2.2 अपर्चरसह 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ 2.46 अपर्चरसह 13MP 2x टेलीफोटो कॅमेरा असेल. एफ 2.4 अपर्चर असलेला 32MP चा एक सेल्फी कॅमेरा आतल्या डिस्प्लेवर आहे आणि बाहेरील डिस्प्लेवर देखील तसाच 32MP चा कॅमेरा आहे.

OPPO Find N2 Flip चे स्पेसिफिकेशन्स

OPPO Find N2 Flip मध्ये 6.8-इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर 3.26-इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी MediaTek चा Dimensity 9000 Plus चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 16GB पर्यंत RAM आणि 512GB storage मिळते. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलर ओएसवर चालतो. हे देखील वाचा: पावरफुल OnePlus 10T 5G वर 15,000 रुपयांपेक्षा जास्त सूट; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

OPPO Find N2 Flip मध्ये धूळ कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकंडरी सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. OPPO Find N2 Flip स्मार्टफोनमधील 4,300mAh ची बॅटरी 44W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट मिळतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

The post दोन-दोन डिस्प्लेसह OPPO Find N2 Flip लाँच; फोल्डेबल Find N2 ची एंट्री देखील झाली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-n2-flip-foldables-launched-price-specifications/feed/ 0
Oppo लाँच करू शकते 2 फोल्डेबल फोन्स; Find N2 आणि Find N2 Flip येऊ शकतात बाजारात https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-n2-and-find-n2-flip-launch-on-december-15-during-oppo-inno-day-event/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-n2-and-find-n2-flip-launch-on-december-15-during-oppo-inno-day-event/#respond Thu, 08 Dec 2022 05:30:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15779 Oppo नं आपल्या वार्षिक इव्हेंट Oppo Inno Day ची तारीख सांगितली आहे. यंदा हा इव्हेंट 14 डिसेंबरला आयोजित केला जाईल. या इव्हेंटच्या माध्यमातून एंटरटेनमेंट, प्रॉडक्टिव्हिटी, हेल्थ आणि एज्युकेशन क्षेत्रातील स्मार्ट टेक्नॉलॉजी सादर केली जाऊ शकते. परंतु सर्वांची नजर या इव्हेंटच्या माध्यमातून लाँच होणाऱ्या बहुप्रतीक्षित फोल्डेबल आणि फ्लिप Oppo Find N2 आणि Oppo Find N2 Flip […]

The post Oppo लाँच करू शकते 2 फोल्डेबल फोन्स; Find N2 आणि Find N2 Flip येऊ शकतात बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo नं आपल्या वार्षिक इव्हेंट Oppo Inno Day ची तारीख सांगितली आहे. यंदा हा इव्हेंट 14 डिसेंबरला आयोजित केला जाईल. या इव्हेंटच्या माध्यमातून एंटरटेनमेंट, प्रॉडक्टिव्हिटी, हेल्थ आणि एज्युकेशन क्षेत्रातील स्मार्ट टेक्नॉलॉजी सादर केली जाऊ शकते. परंतु सर्वांची नजर या इव्हेंटच्या माध्यमातून लाँच होणाऱ्या बहुप्रतीक्षित फोल्डेबल आणि फ्लिप Oppo Find N2 आणि Oppo Find N2 Flip फोनवर असेल. ज्यांची लाँच डेट देखील कंपनीनं सांगितली आहे.

Oppo Find N2 आणि Oppo Find N2 Flip लाँच

Oppo Inno Day 2022 च्या तारखेची घोषणा कंपनीनं केली आहे. 14 आणि 15 डिसेंबरला या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. इव्हेंट 14 डिसेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल, आणि कंपनीच्या युट्युब व सोशल मीडिया चॅनेल्सवरून पाहता येईल. या इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 डिसेंबरला Oppo Find N2 आणि Oppo Find N2 Flip फोन सादर केले जातील, अशी घोषणा करण्यात आली आहे. हे देखील वाचा: 11GB RAM ची ताकद असलेल्या स्वस्त 5G Phone वर बंपर सूट; अशी आहे Realme 9 5G वरील ऑफर

OPPO Find N2 Flip चे स्पेसिफिकेशन

लीक्सनुसार, ओप्पो फाइन्ड एन2 फ्लिपमध्ये 6.8 इंचाचा Full HD+ फोल्डेबल डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर 3.26 इंचाचा कव्हर डिस्प्ले असू शकतो. हा फोन Android 13 आधारित ColorOS 13 वर चालू शकतो. यात MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसरसह 12GB RAM पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर प्रायमरी आणि 8MP चा Sony IMX355 अल्ट्रा-वाइड सेन्सर मिळू शकतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. OPPO Find N2 Flip मध्ये 4300mAh ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते. सिक्योरिटीसाठी या फ्लिप फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. हे देखील वाचा: TVF Pitchers Season 2: 7 वर्षानंतर परत येतेय जबरदस्त वेब सीरिज; पुन्हा एकदा ऐकू येणार “तू बियर है **”

OPPO Find N2 चे स्पेसिफिकेशन

OPPO Find N2 फोनमध्ये एक 7.1 इंचाचा E6 AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1920 x 1792 पिक्सल असू शकते. तसेच फोनमध्ये 5.54-इंचाचा सेकंडरी डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट असलेला E6 AMOLED पॅनल असू शकतो. हा फोन Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसरसह बाजारात दाखल होऊ शकतो. यात 4,520mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते.

The post Oppo लाँच करू शकते 2 फोल्डेबल फोन्स; Find N2 आणि Find N2 Flip येऊ शकतात बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-n2-and-find-n2-flip-launch-on-december-15-during-oppo-inno-day-event/feed/ 0