दोन-दोन डिस्प्लेसह OPPO Find N2 Flip लाँच; फोल्डेबल Find N2 ची एंट्री देखील झाली

OPPO Find N2 आणि Find N2 Flip हे दोन फोल्डेबल स्मार्टफोन कंपनीनं सादर केले आहेत. या दोन स्मार्टफोनची डिजाईन Samsung Galaxy Z Fold आणि Galaxy Z Flip सारखी आहे. Qualcomm च्या Snapdragon 8 Plus Gen1 चिपसेटसह येणारा OPPO Find N2 जुन्या फाइन्ड एन पेक्षा 1.3mm पातळ आहे आणि यात आता फ्लेक्स फॉर्म मोड देण्यात आला आहे. तर छोटा OPPO Find N2 Flip स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 Plus चिपसेट, 50MP कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 3.26-इंचाचा कव्हर डिस्प्लेसह बाजारात आला आहे.

OPPO Find N2 आणि Find N2 Flip ची किंमत

OPPO Find N2 ची किंमत 7,999 युआन (सुमारे 95,000 रुपये) ठेवण्यात आली आहे, ज्यात 12GB रॅम व 256GB स्टोरेज मिळते. तर 8,999 युआन (सुमारे 1,06,900 रुपये) मध्ये 16GB रॅम व 512GB स्टोरेज मॉडेल मिळतो. हा डिवाइस ब्लॅक ग्रीन आणि व्हाइट कलर ऑप्शनसह आला आहे. हे देखील वाचा: बाजारात नवा ‘सेल्फी किंग’? 60MP फ्रंट कॅमेऱ्यासह शक्तिशाली Moto X40 लाँच; 10 हजारांच्या रेंजमध्ये 5G Phone लाँच

OPPO Find N2 Flip ची किंमत 5,999 युआन (सुमारे 71,300 रुपये) ठेवण्यात आली आहे, जो 8GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला बेस मॉडेल आहे. तर टॉप एन्ड मॉडेलमध्ये 16GB रॅम व 512GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत 6,999 युआन (सुमारे 83,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात येणार का याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.

OPPO Find N2 चे स्पेसिफिकेशन्स

OPPO Find N2 फोल्डेबल स्मार्टफोनच्या बाहेरील बाजूस 5.54-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 2,120 x 1,080 पिक्सल रिजोल्यूशन आणि गोरिल्ला ग्लास विक्ट्सच्या लेयरसह येतो. तर 7.1-इंचाचा एलटीपीओ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आतल्या बाजूस मिळतो. ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,920 x 1,792 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करते.

या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा शक्तिशाली Snapdragon 8 Plus Gen1 प्रोसेसर Adreno GPU सह देण्यात आला आहे. जोडीला 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, Wi-Fi, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट मिळतो. तर सिक्योरिटीसाठी या ड्युअल सिम फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी OPPO Find N2 च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एफ 1.8 अपर्चर व ओआयएस सपोर्ट असलेला 50MP चा प्रायमरी Sony IMX890 सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एलईडी फ्लॅशसह एफ 2.2 अपर्चरसह 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ 2.46 अपर्चरसह 13MP 2x टेलीफोटो कॅमेरा असेल. एफ 2.4 अपर्चर असलेला 32MP चा एक सेल्फी कॅमेरा आतल्या डिस्प्लेवर आहे आणि बाहेरील डिस्प्लेवर देखील तसाच 32MP चा कॅमेरा आहे.

OPPO Find N2 Flip चे स्पेसिफिकेशन्स

OPPO Find N2 Flip मध्ये 6.8-इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर 3.26-इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी MediaTek चा Dimensity 9000 Plus चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 16GB पर्यंत RAM आणि 512GB storage मिळते. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलर ओएसवर चालतो. हे देखील वाचा: पावरफुल OnePlus 10T 5G वर 15,000 रुपयांपेक्षा जास्त सूट; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

OPPO Find N2 Flip मध्ये धूळ कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकंडरी सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. OPPO Find N2 Flip स्मार्टफोनमधील 4,300mAh ची बॅटरी 44W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट मिळतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here