TVF Pitchers Season 2: 7 वर्षानंतर परत येतेय जबरदस्त वेब सीरिज; पुन्हा एकदा ऐकू येणार “तू बियर है **”

TVF Pitchers Season 2 release date सोबतच या लोकप्रिय वेब सीरीजचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. सीजन 1 नंतर 7 वर्षांनंतर टीव्हीएफ पिचर्सचा सीजन 2 येत आहे. पहिला सीजन टीव्हीएफच्या वेबसाइटवर आल्यानंतर आता नवा सीजन ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करता येईल. या सीरीजच्या दुसऱ्या सीजनमध्ये Naveen Kasturia, Arunabh Kumar, Abhay Mahajan, Gopal Dutt, Ridhi Dogra, Ashish Vidyarthi, Abhishek Banerjee आणि Sikander Kher सारखे कसलेले कलाकार दिसतील. तसेच, TVF Pitchers Season 2 trailer पाहून युजर्स नाराज झाले आहेत कारण यात Jeetender Kumar उर्फ Jeetu दिसत नाही. त्यामुळे युजर्स “No Jeetu no Pitchers” अशी तक्रार करत आहेत.

कुठे बघता येईल TVF Pitchers Season 2?

OTT platform Zee 5 वर पिचर्स 2 चा टीजर शेयर करण्यात आला आहे. तसेच, यात पहिल्या एपिसोडची झलक दाखवण्यात आली आहे आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘7 वर्ष 3 महीने आणि 5 दिवसांनी ते अखेर परत आले आहेत.’ या लोकप्रिय शोचा बहुप्रतीक्षित दुसरा सीजन क्रिसमसच्या आसपास रिलीज केला जाईल. हे देखील वाचा: PM Kisan Scheme: लवकरच येतोय 13 वा हप्ता; ऑनलाइन पूर्ण करा KYC, पाहा लाभार्थ्यांची यादी

TVF Pitchers Season 2 release date

हा शो झी5 वर 25 डिसेंबर, 2022 ला रिलीज होऊ शकतो. तर, टीव्हीएफ पिचर्स सीजन 1 10 जून, 2015 ला लाँच झाला होता आणि शोचे दिग्दर्शक असलेल्या टीव्हीएफच्या अरुणाभ कुमार यांनी सीजन 2 विषयी म्हटलं आहे की, “हा कदाचित भारतातील सर्वात बहुप्रतीक्षित शो पैकी एक आहे आणि हा रिलीज झाल्यानंतर पिचर्ससाठी सतत मिळालेल्या प्रेमासाठी मी चाहत्यांचा आभारी आहे.” तर निर्माता Sikander Kher यांनी म्हटलं आहे की, “Pitchers एक आयकॉनिक शो आहे ज्याला पुनरागमन करण्यासाठी इतका वेळ आवश्यक नव्हता. परंतु आता हा पुन्हा आला आहे आणि मी याचा भाग आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे.” हे देखील वाचा: 200MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त फोन येतोय भारतात; Redmi Note 12 5G च्या लाँचची घोषणा

अरुणभ कुमार यांनी बनवलेल्या TVF Pitchers च्या पहिल्या सीजनमध्ये पाच-एपिसोड आहेत, जे TVF Play, एमएक्स प्लेयर आणि झी5 वर बघता येतील. या सीरीजच्या पहिल्या सीजनमध्ये नवीन कस्तूरिया, जितेंद्र कुमार, अरुणभ कुमार आणि अभय महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच या सीरीजच्या पहिल्या सीजनची गोष्ट अशी होती की चार मित्र आपल्या स्टार्ट-अप आयडियावर काम करण्यासाठी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतात. सुरुवातीला त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, परंतु अखेरीस त्यांना त्यांच्या आयुष्यात काय हवं आहे हे समजतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here