Oppo Find X - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अनोखी डिजाईन असलेला OPPO Find X2, तुम्हीच बघा या फोनचा हटके लुक https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x2-design-patent-revealed-cnipa-triple-cameras-curved-alignment-dual-pop-up/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x2-design-patent-revealed-cnipa-triple-cameras-curved-alignment-dual-pop-up/#respond Fri, 17 Jan 2020 13:01:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6324 आशा आहे कि इथे दोन सेल्फी कॅमेरा म्हणजे डुअल पॉप-अप कॅमेरा सेटअप असेल.

The post अनोखी डिजाईन असलेला OPPO Find X2, तुम्हीच बघा या फोनचा हटके लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO बद्दल जानेवारीच्या सुरवातीला बातमी आली होती कि कंपनी आपल्या ‘फाइंड सीरीज’ च्या विस्ताराची योजना बनवत आहे आणि Oppo Find X2 नावाने एक नवीन फोन लॉन्च करेल. Oppo Find X2 साल 2018 मध्ये लॉन्च झालेल्या Oppo Find X स्मार्टफोनच्या अपग्रेडेड वर्जनच्या स्वरूपात येईल. ओपो फाइंड एक्स2 ची चर्चा Oppo चे Vice President Brian Shen यांनी शेयर केलेल्या एका वेईबो पोस्ट वरून सुरु झाली होती ज्यात या आगामी स्मार्टफोन टीज केला गेला होता. तसेच आता OPPO Find X2 चा डिजाईन पेटेंट पण लीक झाला आहे ज्यात फोनचे फोटोज पण समोर आले आहेत.

OPPO Find X2 चे डिजाईन पेटेंट CNIPA वेबसाइट वरून लीक झाले आहे. या डिजाईन पेटेंट मध्ये ओपो फाइंड एक्स2 चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. या लीक मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही पण OPPO Find X2 च्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे OPPO Find X स्लाईडर मॅकेनिजम असलेल्या कॅमेरा सेटअप वर बनवला गेला होता, तसेच OPPO Find X2 आपल्या आधीच्या वर्जन पेक्षा पण जास्त स्टाईलिश आणि ऍडव्हान्स दिसत आहे.

असा असले लुक

OPPO Find X2 च्या डिजाईनची सुरवात फोनच्या बॅक पॅनल वरून करूया कारण या फोनसारखी मागील बाजू आतापर्यंत कोणत्याही ब्रँडच्या कोणत्याही स्मार्टफोन मध्ये दिसली नाही. पेटेंट मध्ये समजले आहे कि OPPO Find X2 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल. पण हा कॅमेरा सेटअप आजपर्यंत समोर आलेल्या सर्व मोबाईल्स पेक्षा वेगळा आहे. OPPO ने या फोनचा रियर कॅमेरा सेटअप Semi Circle म्हणजे ‘अर्ध गोलाकार ’ आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर हा चंद्रकोरीसारखा वाटतो. या सेटअप मध्ये डावीकडे सर्वात आधी फ्लॅश लाईट आहे त्यानंतर पुढे तीन सेंसर्स आहेत.

फोनच्या बॅक पॅनल वरील कॅमेरा सेटअपच्या वर पण चंद्रासारखी आकृती आहे. कदाचित हा चंद्राचा आकार नोटिफिकेशन्स आल्यावर चमकेल किंवा कलर रिफ्लेक्शन देत असावा. याव्यतिरिक्त OPPO Find X2 च्या बॅक पॅनल वर इतर कोणताही सेंसर किंवा लोगो आहे. फोनचा फ्रंट पॅनल पाहता फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. ओपो फाइंड एक्स2 च्या डिस्प्ले वर कोणतीही नॉच दिसत नाही. फोनच्या वरच्या पॅनल वर पॉप-अप मॅक्नेजिम दिसत आहे. आशा आहे कि इथे दोन सेल्फी कॅमेरा म्हणजे डुअल पॉप-अप कॅमेरा सेटअप असेल.

OPPO Find X2 राउंड ऐजेज वर बनला आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट देण्यात आला आहे. या पोर्ट मध्ये दोन्ही बाजुंना स्पीकर आहेत. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे तर डाव्या पॅनल वर पावर बटण आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Oppo चे Vice President Brian Shen आणि Oppo Global Marketing चे President ब्रायन यांनी वेईबो वर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘हॅपी न्यू ईयर’ लिहिले होते. या पोस्ट मध्ये ब्रायन यांनी #FindX2 चा वापर केला आहे. या पोस्ट नंतर स्पष्ट झाले होते कि आता ओपो फाइंड सीरीजच्या नवीन फोन वर काम सुरु झाले आहे आणि हा ओपो फाइंड एक्स2 नावाने बाजारात लॉन्च केला जाईल.

Oppo Find X2

रिपोर्ट्सनुसार Find X2 ओपो चा 5G स्मार्टफोन असेल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार कंपनी हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 वर लॉन्च करू शकते. Oppo Fined X2 मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळू शकतो. आशा आहे कि या फोन मध्ये 65वॉट ची फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी दिली जाईल.

Oppo Find X2 मध्ये All Pixel Omni-directional PDAF फीचर मिळू शकतो. या टेक्नॉलजीची खास बाब अशी कि हि वर्चुअल आणि हॉरिजॉन्टल डायरेक्शन्सचा पॅटर्न चेंज डिटेक्ट करते. बोलले जात आहे कि हा फोन लो लाइट परफॉर्मेंस आणि फोकस वेगवान करेल. सध्यातरी Oppo Find X2 च्या इतर माहितीची वाट बघितली जात आहे.

The post अनोखी डिजाईन असलेला OPPO Find X2, तुम्हीच बघा या फोनचा हटके लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x2-design-patent-revealed-cnipa-triple-cameras-curved-alignment-dual-pop-up/feed/ 0
हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/ https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/#respond Tue, 28 May 2019 12:49:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4432 पुढे आम्ही अशाच शानदार कॅमेरा फोनची चर्चा केली आहे जे आपल्या हटके डिजाइनमुळे चर्चेत आहेत.

The post हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी वीवो ने पॉप-अप कॅमेरा असलेला नेक्स फोन सादर केला होता. त्यानंतर ओपोचा फाइंड एक्स आला. या दोन्ही फोन्सची खूप चर्चा झाली आणि त्यानंतर अंदाज लावले जाऊ लागेल कि मोबाईल कॅमेरा सेग्मेंट मध्ये आता अजून नवीन इनोवेशन बघायला मिळतील. 2018 मध्ये जास्त काही नाही झाले पण 2019 येताच अनेक स्टाइलिश फोन उपलब्ध झाले. वीवो वी15 प्रो, वीवो वी15, वनप्लस 7 प्रो, ओपो एफ11 प्रो आणि ओपो एफ11 समवेत अनेक डिवाइस पॉप-अप कॅमेरा सह आले. परंतु काही असे पण फोन आले ज्यांचा कॅमेरा यापेक्षा पण हटके आहे आणि हे लोकांना आवडत पण आहेत. खास बाब अशी कि यातील काही फोन भारतात उपलब्ध झाले आहेत तर काही थोड्याच दिवसांत येणार आहेत. पुढे आम्ही अशाच शानदार कॅमेरा फोनची चर्चा केली आहे जे आपल्या हटके डिजाइनमुळे चर्चेत आहेत.

ओपो रेनो

ओपो ने आज भारतात रेनो सीरीज अंतर्गत दोन फोन लॉन्च केले आहेत. कंपनी ने रेनो स्टँडर्ड एडिशन व्यतिरिक्त रेनो 10एक्स झूम मॉडेल पण सादर केला आहे आणि या दोन्ही फोन्स मध्ये तुम्हाला यूनिक स्टाइलचा कॅमेरा मिळेल. या फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे जो फोन बॉडीच्या आत देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा ऑन करताच हा बॉडी बाहेर येतो पण साधारण पॉप-अप ऐवजी हा त्रिकोणी आकारात बाहेर येतो जो समुद्रातील शार्कच्या फिन प्रमाणे दिसतो. यामुळे कंपनीने याला ”शार्क फिन” कॅमेऱ्याचे नाव दिले आहे. दोन्ही मॉडेल मध्ये हाच कॅमेरा आहे. ओपो रेनो चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

सॅमसंग गॅलेक्सी ए80

https://www.instagram.com/p/BwFHihbgpTs/?utm_source=ig_web_copy_link

सॅमसंग गॅलेक्सी ए80 कंपनी ने थाइलँड मध्ये लॉन्च केला आहे आणि लवकरच हा भारतात पण उपलब्ध होऊ शकतो. या फोन मध्ये तुम्हाला स्लाइड आउट रोटेटिंग कॅमेरा मिळेल. अशाप्रकारची डिजाइन पहिल्यांदा सॅमसंग ने सादर केली आहे. गॅलेक्सी ए80 मध्ये सेल्फी कॅमेरा नाही पण जेव्हा तुम्ही फ्रंट कॅमेरा ऑन करता तेव्हा रियर कॅमेरा वर येऊन सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो. त्यामुळे फ्रंट आणि बॅक दोन्ही मध्ये तुम्हाला सारखा कॅमेरा मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी ए80 चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

असूस झेनफोन 6

असूस झेनफोन 6 पण लवकरच भारतात येणार आहे. या फोनचा कॅमेरा पण खूप मजेदार आहे. कंपनीने असूस झेनफोन 6 फ्लिप कॅमेरा सह सादर केला आहे. बॅक पॅनल मध्ये डुअल कॅमेरा सेटअप आहे आणि जेव्हा तुम्ही सेल्फी ऑप्शन ऑन करता तोच कॅमेरा फ्लिप होऊन पुढे येतो. इतकेच नव्हे तर हा कॅमेरा तुम्ही मॅनुअली कंट्रोल करू शकता. म्हणजेच कॅमेरा फ्लिप होताना तुम्ही तुम्हाला हवा तिथे त्याला थांबवू शकता. तसेच वीडियो शूटिंग मध्ये पण तुम्ही फोन स्थिर ठेऊन फक्त कॅमेरा हलवू शकता. याचा मोशन ट्रॅकर पण शानदार आहे. मोशन ट्रॅकर ऑन करताच कॅमेरा स्वतःहून हलून सबजेक्ट ट्रॅक करतो. असूस झेनफोन 6 चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

ओपो फाइंड एक्स

ओपो फाइंड एक्स कंपनीने गेल्यावर्षी लॉन्च केला होता. परंतु आता पण या फोनच्या कॅमेऱ्याची चर्चा आहे. यात कंपनीने मोटराइज्ड कॅमेरा दिला होता आणि पहिल्यांदा अशाप्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता. आता पण ओपो फाइंड एक्स एक चांगला इनोवेटिंव डिवाइस म्हणून ओळखला जातो. फोन मध्ये फ्रंट आणि सेल्फी दोन्ही कॅमेरा लपलेले आहेत पण जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन कराल तेव्हा हा बाहेर येतो. फाइंड एक्स मध्ये कॅमेरा तुम्ही मॅनुअली पण बंद आणि उघडू शकता. ओपो फाइंड एक्सचे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

The post हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/feed/ 0
8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 12:14:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2337 सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही कधी विचार केला आहे का अचानक पणे स्मार्टफोन मधील रॅम बद्दल इतकी चर्चा का सुरू झाली आहे? लोक जास्त रॅम असलेला फोन का शोधत आहेत? त्यामागील एक कारण म्हणजे आता अॅप्स आणि गेम्स हेवी होत आहेत. हाय रेजल्यूशन असलेले हे अॅप्स चालवण्यासाठी जास्त रॅम ची गरज असते नाही तर फोन लॅग होईल किंवा स्लो होईल. फोन मध्ये अॅप्स आणि गेम्स इंटरनल मेमरी मध्ये स्टोर झाले तरी जेव्हा तुम्ही ते चालवता तेव्हा ते रॅम चा वापर करतात. याच कारणामुळे लोक जास्त रॅम असलेला फोन शोधतात. फोन मध्ये रॅम जास्त असल्यास तो लवकर हँग होणार नाही. फोन फास्ट चालेल आणि लॅग पण कमी होईल. सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

1. रियलमी 2 प्रो

सध्या भारतीय बाजारात हा सर्वात स्वस्त 8जीबी रॅम वाला फोन आहे. रियलमी 2 प्रो नुकताच कंपनी ने लॉन्च केला आहे. यात 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन वॉटर ड्रॉप नॉच सह आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो जो या बजेट मध्ये खुप चांगला आहे. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आणि 8जीबी रॅम आहे. त्याचबरोबर 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याचा 4जीबी आणि 6जीबी रॅम वाला मॉडेल पण आहे. फोटोग्राफी साठी रियलमी 2 प्रो मध्ये 16—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 3,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

2. शाओमी पोको एफ1

शाओमी ने भारतीय बाजारात पोको नावाने दुसरा ब्रँड सादर केला आहे. या अंतर्गत कंपनी ने पोको एफ1 नावाने पहिला मॉडेल लॉन्च केला आहे. पोको फोन पण कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. 8जीबी वाला वेरियंट 256जीबी मेमरी सह येतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे.

3. असूस झेनफोन 5झेड

या वर्षी असूस ने पण 8जीबी रॅम सह आपला फोन सादर केला आहे. कंपनी झेनफोन 5झेड आणला आहे जो चांगल्या प्रोसेसर सोबत 8जीबी रॅम मध्ये उपलब्ध आहे. याचा एक वेरियंट 6जीबी रॅम सह पण येतो. असूस झेनफोन 5झेड मध्ये 6.2-इंचाची नॉच स्टाइल वाली फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो आणि यात 6जीबी व 8जीबी रॅम वाले दोन मेमरी वेरियंट उपलब्ध आहेत. 8जीबी रॅम मॉडेल सोबत 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर 6जीबी वाला वेरियंट 128जीबी मेमरी सह येतो. फोटोग्राफी साठी यात 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सलचा सेंसर आहे. या फोन मध्ये एआई कॅपेबिलिटी आहे. कॅमेरा सोबत वाइड एंगल सपोर्ट आहे आणि यात एआई इंटीग्रेशन पण देण्यात आला आहे.

4. वनप्लस 6

भारतात 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात वनप्लस ने गेल्या वर्षीच केली होती. या वर्षी पण कंपनी ने 8जीबी रॅम सह वनप्लस 6 आणला आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.28-इंच एमोलेड डिस्प्ले आहे जो नॉच स्टाइल सह सादर करण्यात आला आहे. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. रॅम सोबत सर्वात ताकदवान प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो यात 2.8गीगाहट्र्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण हा मागे नाही आणि फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 376के सेंसर आणि 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 519 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 371 सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

5. वीवो नेक्स

ओपो व्यतिरिक्त वीवो ने पण इनविजिबल कॅमेरा वाला फोन सादर केला आहे आणि हा फोन पण खुप दमदार आहे. वीवो ने नेक्स भारतात आणला आहे ज्यात पॉप-अप सेल्फी कमेरा देण्यात आला आहे. वीवो नेक्स मध्ये 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच फोन मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सलचा आहे.

6. ओपो फाइंड एक्स

ओपो फाइंड एक्स ची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा सेटअप आहे. या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही फोनच्या बॉडी च्या आत आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. फोटो घेण्यासाठी कॅमेरा अॅप उघडताच फोनच्या बॉडी च्या आतून कॅमेरा सेंसर बाहेर येतात आणि फोटो घेतात. कंपनी ने बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर फ्रंटला 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. पण इतर स्पेसिफिकेशन पण काही कमी दमदार नाहीत. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन कलर ओएस 5.1 वर चालतो जो एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

7. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 सह कंपनी ने 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात केली ज्यात 512जीबी इंटरनल स्टारेेज देण्यात आली. याचा एक मॉडल 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी वाला पण आहे. फोन मध्ये एसपेन फीचर आहे जो इतर कोणत्याही फोन मध्ये नाही. तुम्ही यात सहज नोट बनवू शकता आणि याने कॅमेरा कंट्रोल करू शकता आणि यूट्यूब वीडियो प्ले करू शकता. प्रत्येक बाबतीत तुम्हाला हा फोन आवडेल. गॅलेक्सी नोट 9 मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाली कपंनी ने 6.4-इंचाची सुपरएमोलेड कर्व्ड स्क्रीन दिली आहे. फोनचा कॅमेरा पण खुप दमदार आहे. यात एफ1.5/एफ2.4 वेरियेबल अपर्चर सह 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे जो एफ1.7 अपर्चर सह येतो.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/feed/ 0
10जीबी रॅम सह येईल जगातील सर्वात पावरफुल फोन ओपो फाइंड एक्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-listed-on-tenna-with-10gb-ram-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-listed-on-tenna-with-10gb-ram-feature-specifications-price-in-marathi/#respond Fri, 28 Sep 2018 08:40:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2301 येणार्‍या नवीन वेरिएंट मध्ये 10जीबी रॅम सह आयफोन एक्सएस प्रमाणे 512जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते.

The post 10जीबी रॅम सह येईल जगातील सर्वात पावरफुल फोन ओपो फाइंड एक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन टेक्नॉलजी मध्ये अनोखा प्रयोग करत ओपो ने जुलै महिन्यात भारतात आपला शानदार डिवाईस फाइंड एक्स लॉन्च केला होता. या फोन मध्ये रियर आणि फ्रंट कॅमेरा सेटअप दोन्ही फोन बॉडी च्या आत देण्यात आले आहेत जे कॅमेरा अॅप उघडताच बाहेर येतात आणि फोटो क्लिक करतात. ओपो ने हा हाईएंड डिवाईस 8जीबी रॅम सह बाजारत आणला आहे. तसेच आता अशी बातमी येत आहे की ओपो कंपनी फाइंड एक्स ला अजून फास्ट व ताकदवान बनवणार आहे. ताज्या माहिती वरून समजले आहे की लवकरच ओपो फाइंड एक्स चा 10जीबी रॅम वेरिएंट पण लॉन्च करण्यात येईल.

ओपो फाइंड एक्स चीनी सर्टिफि​केशन साइट टेना वर लिस्ट करण्यात आला आहे. टेनाच्या या लिस्टिंग मध्ये फाइंड एक्स मध्ये 10जीबी रॅम दाखवण्यात आला आहे. जर फाइंड एक्स येत्या काही दिवसांत 10जीबी रॅम सह लॉन्च झाला तर हा जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल जो एवढ्या रॅम ला सपोर्ट करेल. टेना च्या लिस्टिंग मध्ये फोन चे इतर स्पेसिफिकेशन्स जुन्या वेरिएंट सारखे आहेत.

ओपो फाइंड एक्स ची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा सेटअप आहे. या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही फोन च्या बॉडी च्या आत ठेवण्यात आले आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. फोटो घेण्यासाठी कॅमेरा अॅप ओपन होताच फोन बॉडी मधून कॅमेरा सेंसर बाहेर निघतात आणि फोटो कॅप्चर करतात. जोपर्यंत फोटो काढण्याची कमांड दिली जात नाही हे कॅमेरा सेटअप पूर्णपणे अदृश्य असतात. बॉडी च्या आत असल्यामुळे फोन फ्रंट आणि बॅक पॅनल वरून पूर्णपणे स्मूथ आहे म्हणजे यावर कोणताही स्लॉट किंवा सेंसर होल नाही.

ओपो फाइंड एक्स चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 93.08 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर फक्त खालच्या बाजूला बारीक बेजल आहे पण इतर तिन किनारे पूर्णपणे स्क्रीनला स्पर्श करत आहेत. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर हा क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630जीपीयू आहे.

कंपनी ने या फोन मध्ये 8जीबी रॅम तसेच 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. कदाचित येणार्‍या नवीन वेरिएंट मध्ये 10जीबी रॅम सह आयफोन एक्सएस प्रमाणे 512जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच यात 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.या फोन मध्ये 3डी फेस अनलॉक टेक्निक आहे. पावर बॅकअप साठी ओपो फाइंड एक्स मध्ये 3,730एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

4जी सोबतच हा फोन 5जी कनेक्टिविटी क्षमते सह लॉन्च करण्यात आला आहे. फाइंड एक्स चा 8जीबी रॅम वेरिएंट भारतात 59,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. ओपो फाइंड एक्स चा नवीन वेरिएंट ब्लॅक आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post 10जीबी रॅम सह येईल जगातील सर्वात पावरफुल फोन ओपो फाइंड एक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-listed-on-tenna-with-10gb-ram-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
ओपो बनवत आहे फाइंड एक्स चा स्वस्त वेरिएंट, स्लाइडर कॅमेरा सह लो बजट मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-pahm00-tenaa-certification-affordable-variant-of-oppo-find-x-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-pahm00-tenaa-certification-affordable-variant-of-oppo-find-x-in-marathi/#respond Tue, 17 Jul 2018 09:08:13 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1283 ओपो चा हा आगामी स्मार्टफोन टेना वर ओपो पीएएचएम00 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे.

The post ओपो बनवत आहे फाइंड एक्स चा स्वस्त वेरिएंट, स्लाइडर कॅमेरा सह लो बजट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या महिन्यात ओपो ने अंर्तराष्ट्रीय बाजारात खुप स्टाइलिश आणि अनोखा स्मार्टफोन फाइंड एक्स लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आला आहे. देशात या फोन ची किंमत 59,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हाई बजट वाल्या या शानदार स्मार्टफोन नंतर कंपनी आता याचा स्वस्त वेरिएंट आणण्याची तयारी करत आहे. चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर ओपो चा हा स्मार्टफोन दिसला आहे तिथून या फोन ची माहिती मिळाली आहे.

ओपो चा हा आगामी स्मार्टफोन टेना वर ओपो पीएएचएम00 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. लीक मधून समजले आहे की या नवीन स्मार्टफोन ची डिजाईन पूर्णपणे ओपो फांइड एक्स सारखी असेल. म्हणजे या फोन मध्ये पण ​स्लाईडर कॅमेरा असेल जो फोटो ची कमांड देताच बाहेर येईल. लिस्टिंग मध्ये फोन चे स्पेसिफिकेशन्स समोर आले नाहीत पण एवढे नक्की की ओपो हा वेरिएंट कमी किंमतीत लॉन्च करेल.

ओपो फाइंड एक्स चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 93.08 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर फक्त खालच्या बाजूला बारीक बेजल आहे पण इतर तिन किनारे पूर्णपणे स्क्रीनला स्पर्श करत आहेत. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर हा क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 8जीबी रॅम तसेच 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच यात 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

या फोन मध्ये 3डी फेस अनलॉक टेक्निक आहे. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. 4जी सह हा फोन 5जी कनेक्टिविटी क्षमते सह लॉन्च करण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी ओपो फाइंड एक्स मध्ये 3,730एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कपंनी ने फाइंड एक्स चा लेंबोरगिनी एडिशन पण सादर केला आहे जो सुपर वीओओएसी चार्जिंग टेक्निक सह येतो. या वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम सह 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

किंमत पाहता ओपो फाइंड एक्स 59,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जो 30 जुलै पासून फ्लिपकार्ट वर आपल्या पहिल्या सेल साठी उपलब्ध होईल तसेच 3 ऑगस्ट पासून देशातील आॅफलाईन चॅनल्स वर उपलब्ध होईल.

The post ओपो बनवत आहे फाइंड एक्स चा स्वस्त वेरिएंट, स्लाइडर कॅमेरा सह लो बजट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-pahm00-tenaa-certification-affordable-variant-of-oppo-find-x-in-marathi/feed/ 0
भारतात लॉन्च झाला इनविजिबल कॅमेरा वाला पावरफुल स्मार्टफोन, डिजाईन बघून व्हाल हैराण https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-launched-in-india-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-launched-in-india-feature-specification-price-in-marathi/#respond Thu, 12 Jul 2018 08:01:48 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1225 भारतात ओपो ची फॅन फॉलोइंग पाहता ओपो ने आज हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला आहे.

The post भारतात लॉन्च झाला इनविजिबल कॅमेरा वाला पावरफुल स्मार्टफोन, डिजाईन बघून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मधील तंत्रज्ञान एक पाऊल पुढे नेत काही दिवसांपूर्वी ओपो ने आपला फ्लॅगशिप फोन फाइंड एक्स अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला होता. या फोन मध्ये रियर आणि फ्रंट कॅमेरा सेटअप दोन्ही फोन च्या बॉडी च्या आत देण्यात आले आहेत जे कॅमेरा अॅप उघडताच बाहेर येतात आणि फोटो क्लिक करतात. भारतात ओपो ची फॅन फॉलोइंग पाहता ओपो ने आज हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला आहे.

ओपो फाइंड एक्स ची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा सेटअप आहे. या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही फोन च्या बॉडी च्या आत ठेवण्यात आले आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. फोटो घेण्यासाठी कॅमेरा अॅप ओपन होताच फोन बॉडी मधून कॅमेरा सेंसर बाहेर निघतात आणि फोटो कॅप्चर करतात. जोपर्यंत फोटो काढण्याची कमांड दिली जात नाही हे कॅमेरा सेटअप पूर्णपणे अदृश्य असतात. बॉडी च्या आत असल्यामुळे फोन फ्रंट आणि बॅक पॅनल वरून पूर्णपणे स्मूथ आहे म्हणजे यावर कोणताही स्लॉट किंवा सेंसर होल नाही.

ओपो फाइंड एक्स चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 92.25 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर फक्त खालच्या बाजूला बारीक बेजल आहे पण इतर तिन किनारे पूर्णपणे स्क्रीनला स्पर्श करत आहेत. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर हा क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 8जीबी रॅम तसेच 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच यात 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

या फोन मध्ये 3डी फेस अनलॉक टेक्निक आहे. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. 4जी सह हा फोन 5जी कनेक्टिविटी क्षमते सह लॉन्च करण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी ओपो फाइंड एक्स मध्ये 3,730एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कपंनी ने फाइंड एक्स चा लेंबोरगिनी एडिशन पण सादर केला आहे जो सुपर वीओओएसी चार्जिंग टेक्निक सह येतो. या वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम सह 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

किंमत पाहता ओपो फाइंड एक्स 59,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जो 30 जुलै पासून फ्लिपकार्ट वर आपल्या पहिल्या सेल साठी उपलब्ध होईल तसेच 3 ऑगस्ट पासून देशातील आॅफलाईन चॅनल्स वर उपलब्ध होईल.

The post भारतात लॉन्च झाला इनविजिबल कॅमेरा वाला पावरफुल स्मार्टफोन, डिजाईन बघून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-launched-in-india-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
आयफोन 10 पेक्षा महाग आहे हा स्मार्टफोन, 1,33,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेला हा फोन बघताच तुम्ही व्हाल फिदा https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-lamborghini-limited-edition-design-features-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-lamborghini-limited-edition-design-features-price-specifications-in-marathi/#respond Wed, 20 Jun 2018 09:21:46 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=976 ओपो फाइंड एक्स लँबॉर्गिनी एडिशन एंडरॉयड ओरियो सह कलरओएस 5.1 वर चालतो तसेच फोन मध्ये 4जी सोबत 5जी सपोर्ट पण देण्यात आला आहे.

The post आयफोन 10 पेक्षा महाग आहे हा स्मार्टफोन, 1,33,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेला हा फोन बघताच तुम्ही व्हाल फिदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने काल टेक बाजारात आपली ताकद दाखवत स्मार्टफोन जगत नवीन स्थान मिळवले आहे. स्मार्टफोंस च्या डिजाईन आणि लुक ला ओपो ने नवीन पैलू दिला आहे. आता पर्यंत कॅमेरा प्लेसमेंट वर लक्ष दिले जात होते की कॅमेरा हॉरिजॉन्टल आहे वा वर्टिकल वा नॉच च्या आत. त्याचवेळी ओपो ने कॅमेरा सेटअप बद्दल अनोखी डिजाईन सादर केली आहे. ओपो ने फाइंड एक्स स्मार्टफोन लॉन्च केला आहे ज्यात फ्रंट आणि रियर कॅमेरा फोन च्या बॉडी च्या आत असतात आणि बाहेरून दिसत नाहीत.

ओपो ने पॅरिस मध्ये आयोजित ईवेंट मध्ये ओपो फाइंड एक्स सोबत या फोन चा लँबॉर्गिनी एडिशन पण सादर केला आहे. फाइंड एक्स ची किंमत 999 यूरो म्हणजे जवळपास 79,000 रुपये आहे. तर फाइंड एक्स लँबॉर्गिनी एडिशन 1,699 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 1,35,000 रुपये आहे. म्हणजे अॅप्पल आयफोन 10 पेक्षा जास्त.

ओपो ने या स्पेशल एडिशन साठी प्रसिद्ध लक्जरी कार निर्माता कंपनी लँबॉर्गिनी सोबत हाथ मिळवणी केली आहे. या फोन चा बॅक पॅनल कार्बन फाइबर टेक्चर चा बनला आहे ज्यावर लँबॉर्गिनी चा 3डी लोगो लावण्यात आला आहे.

फोन चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 93.8 टक्के आहे. या फोन मध्ये 6.42 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड पॅनारोमिक आर्क डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2340 x 1080 पिक्सल्स ला सपोर्ट् करतो. फोन 3डी ग्लास बॉडी वर बनला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटे​क्टेड आहे.

फोन मध्ये 8जीबी चा पावरफुल रॅम देण्यात आला आहे सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये 512जीबी ची शानदार इंटरनल स्टोरेज आहे. ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630 जीपीयू आहे.

या फोन मध्ये सुपर वीओओसी चार्जिंग टेक्निक आहे. कंपनी च्या दाव्यानुसार या टेक्निक मुळे ओपो फाइंड एक्स लँबॉर्गिनी एडिशन फक्त 35 मिनिटांमध्ये 0 टक्के ते 100 टक्के चार्ज होईल. फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये मोटोराइज्ड स्लाइडर देण्यात आला आहे जो कॅमेरा अॅप ओपन करताच बाहेर येतो. फोन च्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल आणि एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोन मध्ये 3डी फेस अनलॉक टेक्निक आहे.

ओपो फाइंड एक्स लँबॉर्गिनी एडिशन एंडरॉयड ओरियो सह कलरओएस 5.1 वर चालतो तसेच फोन मध्ये 4जी सोबत 5जी सपोर्ट पण देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत.

The post आयफोन 10 पेक्षा महाग आहे हा स्मार्टफोन, 1,33,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेला हा फोन बघताच तुम्ही व्हाल फिदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-lamborghini-limited-edition-design-features-price-specifications-in-marathi/feed/ 0
लॉन्च झाला सर्वात अनोखा स्मार्टफोन ओपो फाइंड एक्स, इनविजिबल आहेत 8जीबी रॅम वाल्या या फोनचे तिन्ही कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-launched-with-sceen-to-body-ratio-8gb-ram-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-launched-with-sceen-to-body-ratio-8gb-ram-price-features-specifications-in-marathi/#respond Tue, 19 Jun 2018 11:16:10 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=966 4जी सह हा फोन 5जी कनेक्टिविटी क्षमते सह लॉन्च करण्यात आला आहे. ओपो चा हा शानदार स्मार्टफोन आगामी 12 जुलैला भारतीय बाजारात सादर केला जाईल.

The post लॉन्च झाला सर्वात अनोखा स्मार्टफोन ओपो फाइंड एक्स, इनविजिबल आहेत 8जीबी रॅम वाल्या या फोनचे तिन्ही कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मधील तंत्रज्ञान एक पाऊल पुढे नेत काही दिवसांपूर्वी वीवो ने आपला फ्लॅगशिप फोन वीवो नेक्स लॉन्च केला होता. या फोन मध्ये फ्रंट कॅमेरा फोन बॉडी च्या आत देण्यात आला आहे जो सेल्फी ची कमांड दिल्यावर बाहेर येतो. तसेच ही टेक्निक अजून एडवांस करत ओपो ने आपले पाऊल टाकले आहे. ओपो ने आज अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला नवीन फ्लॅगशिप फोन फाइंड एक्स लॉन्च केला आहे. या फोन मध्ये रियर आणि फ्रंट कॅमेरा सेटअप दोन्ही फोन च्या बॉडी च्या आत देण्यात आले आहेत जे कॅमेरा अॅप उघडताच बाहेर येतात आणि फोटो क्लिक करतात.

ओपो फाइंड एक्स ची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा सेटअप आहे. या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही फोन च्या बॉडी च्या आत ठेवण्यात आले आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. फोटो घेण्यासाठी कॅमेरा अॅप ओपन होताच फोन बॉडी मधून कॅमेरा सेंसर बाहेर निघतात आणि फोटो कॅप्चर करतात.

जोपर्यंत फोटो काढण्याची कमांड दिली जात नाही हे कॅमेरा सेटअप पूर्णपणे अदृश्य असतात. बॉडी च्या आत असल्यामुळे फोन फ्रंट आणि बॅक पॅनल वरून पूर्णपणे स्मूथ आहे म्हणजे यावर कोणताही स्लॉट किंवा सेंसर होल नाही.

ओपो फाइंड एक्स चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 92.25 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर फक्त खालच्या बाजूला बारीक बेजल आहे पण इतर तिन किनारे पूर्णपणे स्क्रीनला स्पर्श करत आहेत.

हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलर ओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर हा क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630जीपीयू आहे.

कंपनी ने या फोन मध्ये 8जीबी रॅम तसेच 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच यात 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोन मध्ये 3डी फेस अनलॉक टेक्निक आहे.

4जी सह हा फोन 5जी कनेक्टिविटी क्षमते सह लॉन्च करण्यात आला आहे. ओपो चा हा शानदार स्मार्टफोन आगामी 12 जुलैला भारतीय बाजारात सादर केला जाईल. देशात फोन ची किंमत काय असेल यासाठी 12 जुलै ची वाट बघावी लागेल.

सौजन्य : theverge

The post लॉन्च झाला सर्वात अनोखा स्मार्टफोन ओपो फाइंड एक्स, इनविजिबल आहेत 8जीबी रॅम वाल्या या फोनचे तिन्ही कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-launched-with-sceen-to-body-ratio-8gb-ram-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
लॉन्च च्या आधी समोर आली ओपो फाइंड एक्स ची स्पेक्स शीट, 6.4-इंचाच्या नॉच डिसप्ले सह असेल 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/oppo-flagship-smartphone-find-x-full-specifications-feature-before-launch-on-19-june-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-flagship-smartphone-find-x-full-specifications-feature-before-launch-on-19-june-in-marathi/#respond Thu, 14 Jun 2018 09:04:10 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=899 फाइंड एक्स मध्ये ओपो कडून डुअल नॅनो सिम सपोर्ट दिला जाईल तसेच दोन्ही सिम स्लॉट 4जी नेटवर्क वर चालतील.

The post लॉन्च च्या आधी समोर आली ओपो फाइंड एक्स ची स्पेक्स शीट, 6.4-इंचाच्या नॉच डिसप्ले सह असेल 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो पुढील आठवड्यात 19 जूनला आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘फाइंड एक्स’ टेक जगासमोर आणणार आहे. ओपो 19 जूनला पॅरिस मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून ओपो फाइंड एक्स पहिल्यांदा टेक जगात येईल. ओपो चा हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना ​वर लिस्ट झाला होता तर या फोन बद्दल अजुन एक नवीन लीक समोर आला आहे ज्यात फोन चे फुल स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आले आहेत.

ट्वीट मधून एका टिप्सटर ने ओपो फाइंड एक्स ची स्पेक्स शीट शेयर केली आहे ज्यात फोन चे सर्व स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आले आहेत. या शीट वरून समजते आहे की ओपो फाइंड एक्स 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4 इंचाच्या मोठया डिस्प्ले सह सादर केला जाईल. ओपो द्वारा समोर आलेल्या फाइंड एक्स च्या टीजर मध्ये हे आधीच स्पष्ट झाले आहे की कंपनी हा फोन फुल बेजल लेस डिस्प्ले सह सादर करेल. शीट के नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 वर सादर केला जाईल सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

ओपो फाइंड एक्स मध्ये या शीट नुसार 8जीबी रॅम सांगण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दाखवण्यात आली आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू देण्यात आला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश असलेले एफ/2.0 अपर्चर वाले 20 मेगापिक्सल आणि 16 मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर मिळतील तर फोन च्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वालाच 25 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

फाइंड एक्स मध्ये ओपो कडून डुअल नॅनो सिम सपोर्ट दिला जाईल तसेच दोन्ही सिम स्लॉट 4जी नेटवर्क वर चालतील. बेसिक कनेक्टिविटी सपोर्ट सह फोन मध्ये ओटीजी व एनएफसी सपोर्ट पण मिळेल. अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,730एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. शीट नुसार ओपो या फोनला ग्लेशियल ब्लू आणि रेड कलर मध्ये सादर करेल. बोलले जात आहे की ओपो फांइड एक्स चे दोन वेरिएंट लॉन्च केले जातील ज्यातील एक वेरिएंट 5एक्स आॅप्टिकल झूम ला सपोर्ट करेल तसेच यात 3डी फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक मिळू शकते. पण फोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि भारत लॉन्च साठी 19 जून च्या फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे.

The post लॉन्च च्या आधी समोर आली ओपो फाइंड एक्स ची स्पेक्स शीट, 6.4-इंचाच्या नॉच डिसप्ले सह असेल 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-flagship-smartphone-find-x-full-specifications-feature-before-launch-on-19-june-in-marathi/feed/ 0
ओपो फाइंड एक्स सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, लॉन्च च्या आधी समोर आले पावरफुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-listed-on-tenaa-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-listed-on-tenaa-specifications-in-marathi/#respond Fri, 08 Jun 2018 07:40:54 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=829 या फोन मध्ये 5जी कनेक्टिविटी सारखे अत्याधुनिक व एडवांस आॅप्शन्स असू शकतात.

The post ओपो फाइंड एक्स सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, लॉन्च च्या आधी समोर आले पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो ने या आठवड्यात आॅफिशियल केले आहे की कंपनी येणार्‍या 19 जूनला आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘फाइंड एक्स’ टेक जगासमोर आणणार आहे. ओपो 19 जूनला पॅरिस मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंट च्या मंचावरून ओपो फाइंड एक्स पहिल्यांदा टेक जगासमोर येईल. ओपो ने फाइंड एक्स च्या फीचर किंवा स्पेसिफिकेशन्स संबधी कोणतीही महिती दिली नाही पण लॉन्च च्या आधी हा स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे.

ओपो फांइड एक्स चीनी स​र्टिफिकेशन्स साइट टेना ​वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये ओपो फांइड एक्स चे दोन वेरिएंट दाखवण्यात आले आहेत ज्यांचा मॉडेल नंबर पीएएफएम00 त​तसेच पीएएफटी00 आहे. बोलले जात आहे की या दोन्ही पैकी एक वेरिएंट 5एक्स आॅप्टिकल झूम ला सपोर्ट करेल तसेच यात 3डी फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक मिळेल. तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये हे फीचर्स नसतील. लिस्टिंग वरून समजले आहे की फोन चे डायमेंशन 156.7 x 74.3 x 9.4एमएम चे असतील आणि याचे वजन 186 ग्राम असेल.

टेना ने ओपो फाइंड एक्स च्या जास्त स्पेसिफिकेशन्स चा उल्लेख केला नाही. पण अंदाजा लावला जात आहे की हा फोन डुअल एज कर्व्ड डिसप्ले सह लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये 6.4-इंचाचा एमोलेड डिसप्ले दिला जाऊ शकतो ज्यात वरच्या बाजूला नॉच असेल. सांगितले गेले आहे की ओपो आपल्या या हाईएंड स्मार्टफोन ला ब्लॅक आणि व्हाईट कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करेल. या फोन मध्ये 8जीबी रॅम मेमरी दिली जाऊ शकते तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

फाइंड एक्स बद्दल आलेल्या लीक्स नुसार फोन मध्ये माइक्रोएसडी सपोर्ट सह 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. तसेच ओपो फाइंड एक्स मध्ये 15 मिनिटांत चार्ज होणारी सुपर फास्ट फ्लॅश चार्ज टेक्निक असलेली 3,645एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. या फोन मध्ये 5जी कनेक्टिविटी सारखे अत्याधुनिक व एडवांस आॅप्शन्स असू शकतात.

The post ओपो फाइंड एक्स सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, लॉन्च च्या आधी समोर आले पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x-listed-on-tenaa-specifications-in-marathi/feed/ 0