PAN Card - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 22 Jul 2023 06:28:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आधारशी लिंक झालं चुकीचं PAN कार्ड? असं करा डीलिंक https://www.91mobiles.com/marathi/how-to-delink-pan-aadhaar/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-delink-pan-aadhaar/#respond Sat, 22 Jul 2023 06:11:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21225 जर तुमच्या Aadhaar शी चुकीचं PAN लिंक झालं तर असेल तर आता अजूनही ही चूक सुधारण्याची वेळ तुमच्याकडे आहे. आयकर विभागानुसार, पॅन कार्ड 30 जून, 2023 पर्यंत आधारशी लिंक करता येईल. जर आधारशी चुकीचा पॅन लिंक असेल, तर आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) फाईल करताना अडचण येऊ शकते. चला जाणून घेऊया डिलिंक करण्याची प्रोसेस. PAN-Aadhaar कार्ड […]

The post आधारशी लिंक झालं चुकीचं PAN कार्ड? असं करा डीलिंक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुमच्या Aadhaar शी चुकीचं PAN लिंक झालं तर असेल तर आता अजूनही ही चूक सुधारण्याची वेळ तुमच्याकडे आहे. आयकर विभागानुसार, पॅन कार्ड 30 जून, 2023 पर्यंत आधारशी लिंक करता येईल. जर आधारशी चुकीचा पॅन लिंक असेल, तर आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) फाईल करताना अडचण येऊ शकते. चला जाणून घेऊया डिलिंक करण्याची प्रोसेस.

PAN-Aadhaar कार्ड डीलिंक करण्याची पद्धत

वेगवेगळ्या परिस्थितीनुसार पॅन-आधार डीलिंक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करू शकता :

जर पॅन कार्ड दुसऱ्याचा आधारशी लिंक असेल

स्टेप 1 : जर पॅन कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या आधारशी जोडलं गेलं असेल तर पॅन सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पॅन कार्ड प्रोसेसिंग डिटेल मिळवा.

स्टेप 2 : त्यानंतर आयटीबीए (Income Tax Business Application)च्या माध्यमातून आरसीसी (Regional Computer Center) कडून ऑडिट लॉग मिळत.

स्टेप 3 : त्यानंतर चुकीच्या लिंकिंगची कारणे शोधा. त्यानंतर डीलिंकिंग आवश्यक आहे की नाही ते ठरवा. जर डीलिंकिंग आवश्यक असेल तर, आयकर विभागाकडे आवश्यक कागदपत्र जमा करा.

एकाच व्यक्तीकडे दोन पॅन

स्टेप 1 : जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील पॅन स्टेटसकी तपासणी आयकर विभागाच्या मोबाइल अ‍ॅपवर CBN क्वेरीचा वापर करा.

स्टेप 2 : जर दोन्ही पॅन कार्ड सक्रिय असतील तर ते डी-डुप्लीकेशनमध्ये आहेत का ते पाहा. जर असतील तर इनकम टॅक्स असेसिंग ऑफिसरशी संपर्क करा.

स्टेप 3 : हे ठीक करण्यासाठी आयकर विभागाकडे आवश्यक कागदपत्र जमा करावे लागतील.

एकच नंबरचे अनेक पॅन

स्टेप 1 : सर्वप्रथम पॅन सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पॅन कार्ड प्रोसेसिंगची माहिती मिळवा. स्टेप 2 : त्यानंतर पॅन कार्ड कोणाला देण्यात आला आहे, त्याच्या ओळखीसाठी अर्ज करत.

स्टेप 3 : ह्यासाठी आयकर विभागाकडे आवश्यक कागदपत्र जमा करा.

स्टेप 4 : प्रोसेसिंग नंतर एक नवीन पॅन कार्ड मिळेल.

डीलिंकसाठी ह्या डॉक्यूमेंटची गरज पडेल

  • पॅन कार्डची प्रत
  • आधारकार्डची प्रत
  • तक्रार केलेल्या पात्राची प्रत
  • पत्त्याचा पुरावा
  • ईमेल आयडी >

पॅन-आधार डीलिंक रिक्वेस्ट कशी सबमिट करायची

ई-फिलिंग पोर्टलनुसार, जर तुमचं आधार चुकीच्या पॅन नंबरशी लिंक झालं असेल किंवा पॅन-आधार डीलिंकिंग करण्यासाठी JAO (Jurisdictional Assessing Officer) कडे अर्ज करावा लागेल. डीलिंक केल्यानंतर तुम्ही पुन्हा पॅन-आधार लिंक करण्यासाठी अर्ज करू शकता. ह्यासाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागेल.

ह्यासाठी तुम्हाला तुमचा जेएओ कोण आहे ते शोधावं लागेल. ह्यासाठी eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/knowYourAO वर जा. इथे तुम्हाला तुमचं पॅन आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल. व्हेरिफिकेशन नंतर जेएओची संपूर्ण माहिती दिसेल.

तसेच, ई-फाईलिंग पोर्टलवर लॉगइन करून जेएओची माहिती मिळवता येईल. ह्यासाठी माय प्रोफाईल > Jurisdictional डिटेलवर क्लिक करा. तुम्हाला जेएओची माहिती मिळेल.

त्यानंतर तुम्ही ई-पोर्टलच्या माध्यमावरील ईमेल आयडीच्या माध्यमातून जेएओ अधिकाऱ्याशी संपर्क करू शकता.

पॅन-आधार लिंक करणे का आवश्यक आहे?

इन्कम टॅक्स अ‍ॅक्टच्या 139एए कलमानुसार, प्रत्येक व्यक्ती ज्याला पर्मानेंट अकाऊंट नंबर (PAN) देण्यात आला आहे आणि जो आधार क्रमांक मिळवण्यास पात्र आहे, त्यांना आपलं आधार पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे. खासकरून ज्या लोकांना 1 जुलै, 2017 किंवा त्यापूर्वी पॅन जारी करण्यात आला आहे, त्यांनी 30 जून, 2023 पूर्वी आधार पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे. सध्या पॅन आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल.

पॅन-आधार डीलिंक करण्याची कारणे

डुप्लीकेट पॅन : जर एकाच नंबरनं एकापेक्षा जास्त पॅन कार्ड जारी करण्यात आले असतील तर ते डीलिंक करता येतात.

एकापेक्षा जास्त पॅन : आधार-पॅन डीलिंक करण्याचे एक कारण मल्टीपल पॅन जारी होणे देखील असू शकते. पॅन जारी करण्याच्या प्रक्रियेत गडबड झाल्यामुळे किंवा फसवणुकीमुळे असे घडू शकते. त्यामुळे एकापेक्षा जास्त पॅन बाळगण्यासाठी दंडापासून वाचण्यासाठी डुप्लीकेट पॅन-आधार डीलिंक करावं लागेल.

चुकीचं लिंकिंग : कधी कधी लिंक करण्याची प्रक्रिया चुकू शकते. एका व्यक्तीचं पॅन कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डशी लिंक होऊ शकतं. अशावेळी टॅक्स फाईलिंग दरम्यान गडबड होऊ नये म्हणून डीलिंक करणे आवश्यक आहे.

बनावट पॅन : काही वेळा एखाद्या व्यक्तीनं बनावट पॅन कार्ड आपल्या आधारशी लिंक केलं असू शकतं. अशावेळी कायद्याच्या गुंत्यात न अडकण्याची आधारपासून पॅन वेगळा करण आवश्यक आहे.

आधार पॅन कार्ड लिंक स्टेटस

तुम्ही ऑनलाइन चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही. ह्यासाठी तुम्हाला आयकर ई-फाईलिंग पोर्टल (https://www.incometax.gov.in/iec/foportal/) वर जावं लागेल आणि लिंक आधारावर क्लिक करावं लागेल. आधार-पॅन लिंक आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर नोंदवा. लिंक आहे की नाही ह्याची माहिती मिळेल.

The post आधारशी लिंक झालं चुकीचं PAN कार्ड? असं करा डीलिंक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-delink-pan-aadhaar/feed/ 0
पॅन कार्ड ऑनलाइन बनवण्याची सोपी पद्धत आणि आवश्यक माहिती https://www.91mobiles.com/marathi/how-to-apply-for-a-pan-card-online/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-apply-for-a-pan-card-online/#respond Wed, 26 Apr 2023 12:35:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20500 PAN card (पॅन कार्ड) आयकर रिटर्न, बँक अकाऊंट ओपन करणे, घर किंवा कार खरेदी करण्यासाठी, व्यवसाय करणे, मोठी रक्कम ट्रांसफर करणे आणि इतर अनेक आवश्यक सरकारी कामांसाठी एक आवश्यक दस्तावेज आहे. भारतीय नागरिक अगदी सहज आपलं पॅन कार्ड बनवू शकतात. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला घर बसल्या ऑनलाइन पॅनकार्ड बनवण्याची पद्धत सांगणार आहोत. पॅन कार्डसाठी असं […]

The post पॅन कार्ड ऑनलाइन बनवण्याची सोपी पद्धत आणि आवश्यक माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PAN card (पॅन कार्ड) आयकर रिटर्न, बँक अकाऊंट ओपन करणे, घर किंवा कार खरेदी करण्यासाठी, व्यवसाय करणे, मोठी रक्कम ट्रांसफर करणे आणि इतर अनेक आवश्यक सरकारी कामांसाठी एक आवश्यक दस्तावेज आहे. भारतीय नागरिक अगदी सहज आपलं पॅन कार्ड बनवू शकतात. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला घर बसल्या ऑनलाइन पॅनकार्ड बनवण्याची पद्धत सांगणार आहोत.

पॅन कार्डसाठी असं करा ऑनलाइन अप्लाय

पॅन कार्डसाठी सरकारी पोर्टल – NSDLच्या माध्यमातून ऑनलाइन अप्लाय करण्याची माहिती दिली आहे. या पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून भारतीय नागरिक आणि नॉन इंडियन सिटिजन Pan Card साठी अर्ज करू शकतात. भारतीय नागरिकांना पॅन कार्डसाठी फॉर्म 49A आणि परदेशी नागरिकांना फॉर्म 49AA भरावा लागेल.

NSDL पोर्टलवर असं बनवा पॅन कार्ड

स्टेप 1 : सर्वप्रथम NSDL ची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा. तिथे ‘Application Type’ वर क्लिक करा.

स्टेप 2 : जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर पॅन कार्डसाठी फॉर्म 49A आणि परदेशी नागरिकांना फॉर्म 49AA भरावा लागेल.

स्टेप 3 : नंतर ड्रॉप डाउन मेन्यूमधून कॅटेगरीची निवड करा. हे देखील वाचा: यूपीआयशी क्रेडिट कार्ड जोडण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

स्टेप 4 : इथे तुम्हाला आवश्यक माहिती विचारली जाईल. सर्व काळजीपूर्वक भरा. तुमचा ईमेल आणि मोबाइल नंबर भरल्यानंतर गाइडलाइन्सवर टिक मार्क करा.

स्टेप 5 : कॅप्चा कोड भरल्यानंतर पेमेंट पेजवर जा आणि फी पेमेंट करा. पॅन कार्डसाठी भारतीय नागरिकांना 93 रुपये आणि परदेशी नागरिकांना 864 रुपये द्यावे लागतील.

स्टेप 6 : पेमेंट झाल्यावर तुम्हाला अ‍ॅक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल. त्याची प्रिंट आउट घ्या. त्यावर पासपोर्ट साइज फोटो चिटकवा, सही करा आणि इनकम टॅक्स डिपार्टमेंटला पोस्टाने पाठवा. सोबत तुम्हाला पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा जोडावा लागेल.

पॅन कार्डसाठी कोणते डॉक्युमेंट हवे?

पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे. यासाठी तुम्ही आधार कार्ड, राशन कार्ड, वोटर आयडी कार्ड, ड्राईव्हिंग लायसन्स, विजेचं बिल, बँक पासबुक, पासपोर्ट आणि केंद्र किंवा राज्य सरकारकडून मिळालेलं ओळखपत्र वापरू शकता.

पॅन कार्ड बनवण्यासाठी किती खर्च येतो?

पॅन कार्ड बनवण्यासाठी भारतीय नागरिकांना 93 रुपये आणि परदेशी नागरिकांना 864 रुपये शुल्क द्यावे लागेल. हे देखील वाचा: पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत, जाणून घ्या

पॅन कार्ड किती दिवसात बनतं?

पॅन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करता येतो. ऑनलाइन पॅन कार्ड अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 दिवस लागतात.

The post पॅन कार्ड ऑनलाइन बनवण्याची सोपी पद्धत आणि आवश्यक माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-apply-for-a-pan-card-online/feed/ 0
पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/pan-card-la-aadhar-card-link-karnyachi-paddhat/ https://www.91mobiles.com/marathi/pan-card-la-aadhar-card-link-karnyachi-paddhat/#respond Tue, 25 Apr 2023 12:20:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20463 पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक केलं नसेल तर तुम्ही सहज घर बसल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन ही प्रोसेस करता येईल. आता पॅनशी आधार लिंक करण्यासाठी युजर्सना 1000 रुपयांचा चालान भरावा लागेल. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत की कशाप्रकारे […]

The post पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे.
  • लिंक करण्यासाठी 1000 रुपयांचे चालान द्यावे लागेल.
  • आधार-पॅन लिंक ऑनलाइन करता येईल.

पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक केलं नसेल तर तुम्ही सहज घर बसल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन ही प्रोसेस करता येईल. आता पॅनशी आधार लिंक करण्यासाठी युजर्सना 1000 रुपयांचा चालान भरावा लागेल. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत की कशाप्रकारे ही प्रोसेस सहज घर बसल्या पूर्ण करू शकता.

पॅन कार्डशी आधार कार्ड कसं लिंक करायचं

पॅनशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयांचा चालान जमा करावा लागेल. त्यानंतरच तुम्ही तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक करू शकाल. चालान भरण्यासाठी तुम्हाला NSDL च्या वेबसाइटवर पेमेंट करावं लागेल. इथे आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप माहिती देत आहोत.

NSDL च्या वेबसाइटवर चालान कसं भरायचं?

स्टेप 1: सर्वप्रथम NSDL ची ऑफिशियल वेबसाइट https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp ओपन करा.

स्टेप 2: इथे टॅक्स पेमेंट पेजवर चालान नंबर./ITNS 280 अंतगर्त नॉन-TDS/TCS कॅटेगरी सिलेक्ट करा.

स्टेप 3: पुढील पेजवर हेड ‘(0021)’ आणि त्यानंतर ‘(500)’ सिलेक्ट करा.

स्टेप 4: स्क्रोल डाउन करून पेमेंट मोड सिलेक्ट करा. नंतर पॅन कार्डची माहिती आणि एसेसमेंट ईयर 2023-24 सिलेक्ट करून विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा.

चालान पेमेंट यशस्वी झाल्यावर चार किंवा पाच दिवसांनी तुम्हाला पॅनशी आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस करा. जेणेकरून तुमचे पेमेंट डिटेल्स बिनदिक्कत व्हेरिफाय होतील. इथे आम्ही तुम्हाला ऑनलाइन पॅनशी से आधार कार्ड लिंक कसं करायचं याची माहिती देत आहोत.

आधारशी पॅन कार्ड लिंक कसं करायचं

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला इनकम टॅक्स ई-फाईलिंग पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal/ ओपन करा. तिथे क्विक लिंकमध्ये ‘Link Aadhaar’ वर टॅप करा.

स्टेप 2: पुढील पेजवर तुम्हाला पॅन आणि आधार नंबर टाकावा लागेल.

स्टेप 3: जर पॅन कार्ड दुसऱ्या आधारशी आधीच लिंक असेल तर तुम्हाला एरर मेसेज मिळेल. त्यामुळे तुम्हाला ई-फाईलिंग हेल्पडेस्कवर तक्रार करावी लागेल. जर असं नसेल तर आधार आणि पॅन कार्ड व्हॅलिडेशननंतर ओटीपीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करा.

NSDL वर चालानचं पेमेंट व्हेरिफाय झालं असेल तर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

स्टेप 1: पॅन आणि आधार डेटा व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला एक पॉप अप “Your payment details are verified” (पेमेंट डिटेल्स व्हेरिफाय झाली) मेसेज मिळेल. मग ‘Continue’ बटनवर क्लिक करून आधार लिंक रिक्वेस्ट सब्मिट करा.

स्टेप 2: नवीन पेजवर पॅन नंबर, आधार नंबर आणि नाव आणि फोन नंबर डिटेल्स भरा.

स्टेप 3: पुढील पेजवर मोबाइल नंबरवर आलेला सहा अंकी ओटीपी टाका. अशाप्रकारे तुमच्या पॅनशी आधार लिंकची रिक्वेस्ट कंप्लीट होईल.

जर तुमचं चालान व्हेरिफाय झालं नसेल तर तुम्हाला काही दिवसांची वाट पाहावी लागेल. तसेच ई-फायलिंग हेल्पडेस्कवर तक्रार करा.

पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक आहे की नाही कसं जाणून घ्यायचं

30 जूननंतर सर्व पॅन कार्ड अमान्य होतील जे आधार कार्डशी लिंक नाहीत. त्यामुळे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही हे सहज जाणून घेता येईल. यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

स्टेप 1: सर्वप्रथम टॅक्स ई-फायलिंग पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal ओपन करा आणि ‘लिंक आधार स्टेटस’ वर क्लिक करा.

स्टेप 2: नवीन पेजवर पॅन आणि आधार नंबर टाकून ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा.

जर तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक नसेल तर तुम्हाला पॉप-अप मेसेजमध्ये माहिती मिळेल. तुम्ही उपरोक्त प्रोसेसद्वारे पॅनशी आधार लिंक करू शकता.

The post पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pan-card-la-aadhar-card-link-karnyachi-paddhat/feed/ 0
पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-e-pan-card-online-simple-steps-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-e-pan-card-online-simple-steps-in-marathi/#respond Sun, 09 Apr 2023 12:32:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15060 Income Tax Return (ITR) फाईल करण्यासाठी आधार कार्ड सोबतच पॅन कार्ड असणं भारतीय नागरिकांना खूप आवश्यक आहे. बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी आणि ओळखपत्र म्हणून देखील पॅन कार्डचा वापर करता येतो. परंतु जर तुमच्याकडे PAN Card नसेल किंवा हरवलं असेल तर घाबरण्याची गरज नाही. आता तुम्ही घर बसल्या सहज e-Pan Card डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला […]

The post पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Income Tax Return (ITR) फाईल करण्यासाठी आधार कार्ड सोबतच पॅन कार्ड असणं भारतीय नागरिकांना खूप आवश्यक आहे. बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी आणि ओळखपत्र म्हणून देखील पॅन कार्डचा वापर करता येतो. परंतु जर तुमच्याकडे PAN Card नसेल किंवा हरवलं असेल तर घाबरण्याची गरज नाही. आता तुम्ही घर बसल्या सहज e-Pan Card डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला जाणून घेऊया कशाप्रकारे ऑनलाइन डाउनलोड करता येईल (e-PAN Card download) ई-पॅन कार्ड.

असं डाउनलोड करा e PAN card

ई-पॅन कार्ड देखील एका फिजिकल पॅन कार्ड प्रमाणेच चालतो. याचा वापर त्या सर्व फिजिकल ट्रांजॅक्शन आणि डोमेनसाठी केला जाऊ शकतो, जिथे PAN दाखवणं आवश्यक असतं. तसेच PAN कार्ड ऑनलाइन डाउनलोड करणं खूप सोपं आहे. तुम्ही हे घर बसल्या तुमच्या फोनवर किंवा लॅपटॉपवर हे सहजरित्या डाउनलोड करू शकता. पुढे आम्ही तुम्हाला या प्रोसेसची स्टेप-बाय-स्टेप माहिती दिली आहे. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

  • सर्वप्रथम https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वर जा.
  • त्यानंतर एक पेज ओपन होईल, तिथे मागितलेली माहिती (पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर आणि डेट ऑफ बर्थ) भरावी लागेल.
  • माहिती भरल्यानंतर Captcha फिल करा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर प्रीव्यू डिटेल येतील आणि पुन्हा ‘Generate OTP’ वर क्लिक करा.
  • त्यानंतर रजिस्टर मोबाइल नंबरवर आलेला OTP सबमिट करा.
  • OTP व्हॅलिडेट करा आणि कंटिन्यू विद पेड ई-पॅन डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता एखाद्या पेमेंट गेटवेची निवड करा आणि पेमेंट कंफर्म करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • इथे तुमच्याकडून 8.26 पैसे प्रोसेसिंग फीस म्हणून घेतले जातील. सक्सेसफुल पेमेंटनंतर कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Paid e-PAN Download Facility’ वर क्लिक करा.
  • आता तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर e-PAN कार्ड PDF डाउनलोड करू शकाल जो पासवर्ड प्रोटेक्टेड असेल.
  • ही फाईल ओपन करण्यासाठी पासवर्ड म्हणून तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकावी लागेल.

नोट: इनकम टॅक्स अ‍ॅक्ट, 1961 च्या सेक्शन 272B नुसार, एकापेक्षा जास्त पॅन बाळगल्यास 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-e-pan-card-online-simple-steps-in-marathi/feed/ 0
PAN कार्डवरचा फोटो चांगला नाही? अशाप्रकारे घरबसल्या बदला फोटो आणि सही https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-photo-and-signature-in-pan-card-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-photo-and-signature-in-pan-card-in-marathi/#respond Sat, 01 Apr 2023 12:30:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18022 पर्मनंट अकाऊंट नंबर अर्थात PAN एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे जे आर्थिक व्यवहारांमध्ये खूप उपयुक्त ठरतं. याचा वापर ओळखपत्र म्हणून देखील करता येतो. त्यामुळे यावरील माहिती अचूक असणं आवश्यक आहे. पॅन कार्डवरील फोटो आणि सही महत्वाची असते. कारण लोन, क्रेडिट कार्ड, इन्व्हेस्टमेंटच्या व्हेरिफिकेशनसाठी या दोन गोष्टींकडेच लक्ष दिलं जातं. त्यामुळे जर तुमच्या पॅन कार्डवर चुकीची सही […]

The post PAN कार्डवरचा फोटो चांगला नाही? अशाप्रकारे घरबसल्या बदला फोटो आणि सही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • PAN Card वरील सही आणि फोटो ऑनलाइन बदलता येतो
  • ऑफलाइन देखील PAN Card वरील चुका सुधारता येतात
  • NSDL च्या वेबसाइटवरून नवीन पॅन कार्ड देखील बनवता येईल

पर्मनंट अकाऊंट नंबर अर्थात PAN एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे जे आर्थिक व्यवहारांमध्ये खूप उपयुक्त ठरतं. याचा वापर ओळखपत्र म्हणून देखील करता येतो. त्यामुळे यावरील माहिती अचूक असणं आवश्यक आहे. पॅन कार्डवरील फोटो आणि सही महत्वाची असते. कारण लोन, क्रेडिट कार्ड, इन्व्हेस्टमेंटच्या व्हेरिफिकेशनसाठी या दोन गोष्टींकडेच लक्ष दिलं जातं. त्यामुळे जर तुमच्या पॅन कार्डवर चुकीची सही किंवा फोटो असेल तर तो आत्ताच बदलून घ्या नाही तर पुढे अडचण वाढू शकते. PAN Card वरील फोटो आणि सही बदलण्याची पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.

PAN Card वरील फोटो आणि सही बदलण्यासाठी:

  1. सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जा https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
  2. फॉर्ममध्ये अ‍ॅप्लिकेशन टाइपमध्ये “Changes or Correction in existing PAN data” ची निवड करा.
  3. कॅटेगरीच्या जागी “Individual” ची निवड करा.
  4. समोर आलेल्या फॉर्मवर अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
  5. समोर आलेला टोकन नंबर नोट करून ठेवा आणि पुढे कंटिन्यू करा.
  6. तुमची केवायसी कशी करायची याची निवड करा.
  7. आधार किंवा EID आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  8. त्यानंतर “Photo Mismatch” आणि “Signature Mismatch” वर टिक करा.
  9. वडील किंवा आईची माहिती द्या आणि नेक्स्ट वर क्लिक करा.
  10. “Address and Contact” सेक्शनमध्ये तुमचा पत्ता आणि इतर माहिती द्या.
  11. ओळखीचा, निवासाचा आणि जन्मतारखेचा पुरावा द्या.
  12. जर तुम्ही आधार कार्ड दिलं तर एकाच डॉक्युमेंटमध्ये काम होईल. तसेच तुम्हाला पॅनची किंवा पॅन अलॉटमेंट लेटरची कॉपी देखील सबमिट करावी लागेल.
  13. डिक्लेरेशनवर टिक करून तुमची माहिती सबमिट करा.
  14. तुमच्या डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपी व्हेरिफिकेशनसाठी अपलोड करा.
  15. सबमिटवर क्लिक करण्यापूर्वी एकदा सर्व माहिती तपासून घ्या.
  16. आता तुम्हाला 110 रुपयांचं पेमेंट करावं लागेल.
  17. अर्ज सेव्ह करा आणि त्याची प्रिंट आऊट घ्या.
  18. आता हा अर्ज NSDL च्या ‘INCOME TAX PAN SERVICES UNIT at 5th Floor Mantri Sterlin’g, Plot No. 341, Survey No. 997/8, Model Colony, Near Deep Bungalow Chowk, Pune-411 016’ या पत्त्यावर तुमच्या डॉक्युमेंटसह पाठवून द्या.
  19. तुम्हाला 15 अंकी अ‍ॅक्नॉलेजमेंट नंबर मिळेल ज्याच्या मदतीनं तुम्ही स्टेट्स चेक करू शकता.

The post PAN कार्डवरचा फोटो चांगला नाही? अशाप्रकारे घरबसल्या बदला फोटो आणि सही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-photo-and-signature-in-pan-card-in-marathi/feed/ 0