पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत

Income Tax Return (ITR) फाईल करण्यासाठी आधार कार्ड सोबतच पॅन कार्ड असणं भारतीय नागरिकांना खूप आवश्यक आहे. बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी आणि ओळखपत्र म्हणून देखील पॅन कार्डचा वापर करता येतो. परंतु जर तुमच्याकडे PAN Card नसेल किंवा हरवलं असेल तर घाबरण्याची गरज नाही. आता तुम्ही घर बसल्या सहज e-Pan Card डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला जाणून घेऊया कशाप्रकारे ऑनलाइन डाउनलोड करता येईल (e-PAN Card download) ई-पॅन कार्ड.

असं डाउनलोड करा e PAN card

ई-पॅन कार्ड देखील एका फिजिकल पॅन कार्ड प्रमाणेच चालतो. याचा वापर त्या सर्व फिजिकल ट्रांजॅक्शन आणि डोमेनसाठी केला जाऊ शकतो, जिथे PAN दाखवणं आवश्यक असतं. तसेच PAN कार्ड ऑनलाइन डाउनलोड करणं खूप सोपं आहे. तुम्ही हे घर बसल्या तुमच्या फोनवर किंवा लॅपटॉपवर हे सहजरित्या डाउनलोड करू शकता. पुढे आम्ही तुम्हाला या प्रोसेसची स्टेप-बाय-स्टेप माहिती दिली आहे. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

  • सर्वप्रथम https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वर जा.
  • त्यानंतर एक पेज ओपन होईल, तिथे मागितलेली माहिती (पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर आणि डेट ऑफ बर्थ) भरावी लागेल.
  • माहिती भरल्यानंतर Captcha फिल करा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर प्रीव्यू डिटेल येतील आणि पुन्हा ‘Generate OTP’ वर क्लिक करा.
  • त्यानंतर रजिस्टर मोबाइल नंबरवर आलेला OTP सबमिट करा.
  • OTP व्हॅलिडेट करा आणि कंटिन्यू विद पेड ई-पॅन डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता एखाद्या पेमेंट गेटवेची निवड करा आणि पेमेंट कंफर्म करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • इथे तुमच्याकडून 8.26 पैसे प्रोसेसिंग फीस म्हणून घेतले जातील. सक्सेसफुल पेमेंटनंतर कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Paid e-PAN Download Facility’ वर क्लिक करा.
  • आता तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर e-PAN कार्ड PDF डाउनलोड करू शकाल जो पासवर्ड प्रोटेक्टेड असेल.
  • ही फाईल ओपन करण्यासाठी पासवर्ड म्हणून तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकावी लागेल.

नोट: इनकम टॅक्स अ‍ॅक्ट, 1961 च्या सेक्शन 272B नुसार, एकापेक्षा जास्त पॅन बाळगल्यास 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here