पॅन कार्ड ऑनलाइन बनवण्याची सोपी पद्धत आणि आवश्यक माहिती

PAN card (पॅन कार्ड) आयकर रिटर्न, बँक अकाऊंट ओपन करणे, घर किंवा कार खरेदी करण्यासाठी, व्यवसाय करणे, मोठी रक्कम ट्रांसफर करणे आणि इतर अनेक आवश्यक सरकारी कामांसाठी एक आवश्यक दस्तावेज आहे. भारतीय नागरिक अगदी सहज आपलं पॅन कार्ड बनवू शकतात. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला घर बसल्या ऑनलाइन पॅनकार्ड बनवण्याची पद्धत सांगणार आहोत.

पॅन कार्डसाठी असं करा ऑनलाइन अप्लाय

पॅन कार्डसाठी सरकारी पोर्टल – NSDLच्या माध्यमातून ऑनलाइन अप्लाय करण्याची माहिती दिली आहे. या पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून भारतीय नागरिक आणि नॉन इंडियन सिटिजन Pan Card साठी अर्ज करू शकतात. भारतीय नागरिकांना पॅन कार्डसाठी फॉर्म 49A आणि परदेशी नागरिकांना फॉर्म 49AA भरावा लागेल.

NSDL पोर्टलवर असं बनवा पॅन कार्ड

स्टेप 1 : सर्वप्रथम NSDL ची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा. तिथे ‘Application Type’ वर क्लिक करा.

स्टेप 2 : जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर पॅन कार्डसाठी फॉर्म 49A आणि परदेशी नागरिकांना फॉर्म 49AA भरावा लागेल.

स्टेप 3 : नंतर ड्रॉप डाउन मेन्यूमधून कॅटेगरीची निवड करा. हे देखील वाचा: यूपीआयशी क्रेडिट कार्ड जोडण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

स्टेप 4 : इथे तुम्हाला आवश्यक माहिती विचारली जाईल. सर्व काळजीपूर्वक भरा. तुमचा ईमेल आणि मोबाइल नंबर भरल्यानंतर गाइडलाइन्सवर टिक मार्क करा.

स्टेप 5 : कॅप्चा कोड भरल्यानंतर पेमेंट पेजवर जा आणि फी पेमेंट करा. पॅन कार्डसाठी भारतीय नागरिकांना 93 रुपये आणि परदेशी नागरिकांना 864 रुपये द्यावे लागतील.

स्टेप 6 : पेमेंट झाल्यावर तुम्हाला अ‍ॅक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल. त्याची प्रिंट आउट घ्या. त्यावर पासपोर्ट साइज फोटो चिटकवा, सही करा आणि इनकम टॅक्स डिपार्टमेंटला पोस्टाने पाठवा. सोबत तुम्हाला पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा जोडावा लागेल.

पॅन कार्डसाठी कोणते डॉक्युमेंट हवे?

पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे. यासाठी तुम्ही आधार कार्ड, राशन कार्ड, वोटर आयडी कार्ड, ड्राईव्हिंग लायसन्स, विजेचं बिल, बँक पासबुक, पासपोर्ट आणि केंद्र किंवा राज्य सरकारकडून मिळालेलं ओळखपत्र वापरू शकता.

पॅन कार्ड बनवण्यासाठी किती खर्च येतो?

पॅन कार्ड बनवण्यासाठी भारतीय नागरिकांना 93 रुपये आणि परदेशी नागरिकांना 864 रुपये शुल्क द्यावे लागेल. हे देखील वाचा: पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत, जाणून घ्या

पॅन कार्ड किती दिवसात बनतं?

पॅन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करता येतो. ऑनलाइन पॅन कार्ड अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 दिवस लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here