पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक केलं नसेल तर तुम्ही सहज घर बसल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन ही प्रोसेस करता येईल. आता पॅनशी आधार लिंक करण्यासाठी युजर्सना 1000 रुपयांचा चालान भरावा लागेल. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत की कशाप्रकारे ही प्रोसेस सहज घर बसल्या पूर्ण करू शकता.
पॅन कार्डशी आधार कार्ड कसं लिंक करायचं
पॅनशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयांचा चालान जमा करावा लागेल. त्यानंतरच तुम्ही तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक करू शकाल. चालान भरण्यासाठी तुम्हाला NSDL च्या वेबसाइटवर पेमेंट करावं लागेल. इथे आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप माहिती देत आहोत.
NSDL च्या वेबसाइटवर चालान कसं भरायचं?
स्टेप 1: सर्वप्रथम NSDL ची ऑफिशियल वेबसाइट https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp ओपन करा.
स्टेप 2: इथे टॅक्स पेमेंट पेजवर चालान नंबर./ITNS 280 अंतगर्त नॉन-TDS/TCS कॅटेगरी सिलेक्ट करा.
स्टेप 3: पुढील पेजवर हेड ‘(0021)’ आणि त्यानंतर ‘(500)’ सिलेक्ट करा.
स्टेप 4: स्क्रोल डाउन करून पेमेंट मोड सिलेक्ट करा. नंतर पॅन कार्डची माहिती आणि एसेसमेंट ईयर 2023-24 सिलेक्ट करून विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा.
चालान पेमेंट यशस्वी झाल्यावर चार किंवा पाच दिवसांनी तुम्हाला पॅनशी आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस करा. जेणेकरून तुमचे पेमेंट डिटेल्स बिनदिक्कत व्हेरिफाय होतील. इथे आम्ही तुम्हाला ऑनलाइन पॅनशी से आधार कार्ड लिंक कसं करायचं याची माहिती देत आहोत.
आधारशी पॅन कार्ड लिंक कसं करायचं
स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला इनकम टॅक्स ई-फाईलिंग पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal/ ओपन करा. तिथे क्विक लिंकमध्ये ‘Link Aadhaar’ वर टॅप करा.
स्टेप 2: पुढील पेजवर तुम्हाला पॅन आणि आधार नंबर टाकावा लागेल.
स्टेप 3: जर पॅन कार्ड दुसऱ्या आधारशी आधीच लिंक असेल तर तुम्हाला एरर मेसेज मिळेल. त्यामुळे तुम्हाला ई-फाईलिंग हेल्पडेस्कवर तक्रार करावी लागेल. जर असं नसेल तर आधार आणि पॅन कार्ड व्हॅलिडेशननंतर ओटीपीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करा.
NSDL वर चालानचं पेमेंट व्हेरिफाय झालं असेल तर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
स्टेप 1: पॅन आणि आधार डेटा व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला एक पॉप अप “Your payment details are verified” (पेमेंट डिटेल्स व्हेरिफाय झाली) मेसेज मिळेल. मग ‘Continue’ बटनवर क्लिक करून आधार लिंक रिक्वेस्ट सब्मिट करा.
स्टेप 2: नवीन पेजवर पॅन नंबर, आधार नंबर आणि नाव आणि फोन नंबर डिटेल्स भरा.
स्टेप 3: पुढील पेजवर मोबाइल नंबरवर आलेला सहा अंकी ओटीपी टाका. अशाप्रकारे तुमच्या पॅनशी आधार लिंकची रिक्वेस्ट कंप्लीट होईल.
जर तुमचं चालान व्हेरिफाय झालं नसेल तर तुम्हाला काही दिवसांची वाट पाहावी लागेल. तसेच ई-फायलिंग हेल्पडेस्कवर तक्रार करा.
पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक आहे की नाही कसं जाणून घ्यायचं
30 जूननंतर सर्व पॅन कार्ड अमान्य होतील जे आधार कार्डशी लिंक नाहीत. त्यामुळे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही हे सहज जाणून घेता येईल. यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
स्टेप 1: सर्वप्रथम टॅक्स ई-फायलिंग पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal ओपन करा आणि ‘लिंक आधार स्टेटस’ वर क्लिक करा.
स्टेप 2: नवीन पेजवर पॅन आणि आधार नंबर टाकून ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा.
जर तुमच्या पॅन कार्डशी आधार लिंक नसेल तर तुम्हाला पॉप-अप मेसेजमध्ये माहिती मिळेल. तुम्ही उपरोक्त प्रोसेसद्वारे पॅनशी आधार लिंक करू शकता.