Realme 8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 02 Apr 2021 12:25:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4 दोष जे Realme 8 Pro ला बनू देत नाहीत ‘बेस्ट च्वाइस’ https://www.91mobiles.com/marathi/5-disappointment-of-realme-8-pro-india/ https://www.91mobiles.com/marathi/5-disappointment-of-realme-8-pro-india/#respond Fri, 02 Apr 2021 12:25:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10482 सोशल मीडियावर समोर आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहून आम्ही असे 4 मुद्दे काढले आहेत ज्यांच्यामुळे रियलमी फॅन Realme 8 Pro स्मार्टफोनला फायद्याचा सौदा मानत नाहीत.

The post 4 दोष जे Realme 8 Pro ला बनू देत नाहीत ‘बेस्ट च्वाइस’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्या आठवड्यात भारतात आपली ‘रियलमी 8’ सीरीज सादर करून दोन नवीन स्मार्टफोन Realme 8 आणि Realme 8 Pro लॉन्च केले आहेत. दोन्ही मोबाईल फोन मिडबजेट सेग्मेंटमध्ये आणले आहेत जे शानदार लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतात. सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल रियलमी 8 प्रो पाहता हा फोन दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च झाला आहे ज्यांची सुरुवाती किंमत 17,999 रुपये आहे. या नवीन रियलमी फोनबद्दल लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक लोकांना हे आवडले आहेत तर अनेक रियलमी फॅन्स व स्मार्टफोन्स युजर्स यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहून आम्ही असे 4 मुद्दे काढले आहेत ज्यांच्यामुळे रियलमी फॅन Realme 8 Pro स्मार्टफोनला फायद्याचा सौदा मानत नाहीत.

रिफ्रेश रेटची कमतरता

Realme 8 Pro 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. युजर्सना हि गोष्ट खटकत आहे कि कंपनीने रिफ्रेश रेट कमी ठेवला आहे कारण या बजेटपेक्षा कमी किंमतीत Xiaomi Redmi Note 10 Pro स्मार्टफोनमध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट देत आहे. रियलमी 8 प्रो 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1000निट्स ब्राइटनेस आणि 90.8% स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो.

जुना प्रोसेसर

अँड्रॉइड 11 ओएस आधारित हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेटवर लॉन्च केला गेला आहे. रियलमी फॅन्सना फोनमधील चिपसेटचा जास्तच राग आला आहे. मुद्दा असा आहे कि Realme 8 Pro च्या आधी Realme 7 Pro स्मार्टफोन पण याच स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेटवर लॉन्च केला गेला होता. इतकेच नव्हे तर त्याआधी लॉन्च झालेला Realme 6 Pro पण स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेटसह बाजारात आला होता. दोन वर्ष जुना हा चिपसेट रियलमी 8 प्रो मध्ये लोकांच्या पसंतीस उतरत नाही.

हे देखील वाचा : 2020 मध्ये होता ऑनलाइन स्मार्टफोन मार्केटचा बोलबाला, जाणून घ्या कोणत्या कंपनीने जिंकले युद्ध

रियर सेंसर्सने बिघडवला तोल

Realme 8 Pro क्वॉड रियर कॅमेरा सेटअपवर लॉन्च केला गेला आहे ज्यात एफ/1.88 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा प्राइमरी सेंसर तर बेस्ट आहे पण याला सोबत देणारे इतर सेंसर थोडे मागे राहतात. रियलमीने या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा B&W लेंस देण्यात आली आहे. फोटोग्राफीचा आवड असणाऱ्या युजरना माहित आहे कि बेस्ट फोटोसाठी सर्व सेंसर्स चांगले असणे आवश्यक आहेत. त्यामुळे जर तुम्ही मॅक्रो शॉट्स घेत असाल तर रियलमी 8 प्रो मध्ये याबाबत तडजोड करावी लागू शकते.

सेल्फीमध्ये मागे

रियर कॅमेरा सेटअपनंतर फोनच्या फ्रंट पॅनलकडे वळलो तर इथे Realme 8 Pro स्मार्टफोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 सेंसरला सपोर्ट करतो. स्मार्टफोन युजर्स या फोनमध्ये थोड्या चांगल्या सेल्फी कॅमेऱ्याची अपेक्षा करत होते. हि अपेक्षा ठेवण्यामागचे कारण म्हणजे याआधी आलेल्या Realme 7 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला होता.

The post 4 दोष जे Realme 8 Pro ला बनू देत नाहीत ‘बेस्ट च्वाइस’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-disappointment-of-realme-8-pro-india/feed/ 0
Exclusive: बघा Realme 8 Pro ची पहिली झलक, Salman Khan च्या हातात दिसला हा फोन https://www.91mobiles.com/marathi/realme-8-pro-5g-in-salman-khan-hand-will-launch-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/realme-8-pro-5g-in-salman-khan-hand-will-launch-india-soon/#respond Sat, 27 Feb 2021 09:18:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10201 सलमान खानने वापरलेल्या फोन Realme 8 Pro च्या फोटो मध्ये डिवाइस पूर्णपणे दिसत नाही परंतु मागून डिजाइनबद्दल खूप काही समजत आहे. फोनचा बॅक पॅनल खूप शाइनी आहे आणि नवीन स्टाइल मध्ये रियर कॅमेरा प्लेस केला गेला आहे.

The post Exclusive: बघा Realme 8 Pro ची पहिली झलक, Salman Khan च्या हातात दिसला हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme चे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून 108 megapixels कॅमेरा इनोवेशन फीचरची माहिती दिली होती, त्यांनतर Realme 8 सीरीज फोन बद्दल चर्चा सुरु झाली. 91मोबाईल्सला या फोनबद्दल खास माहिती मिळाली आहे. तसेच फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. सर्वात खास बाब अशी म्हणता येईल कि आम्हाला जो फोटो मिळाला आहे त्यात सलमान खान (Salman Khan) Realme 8 Pro मॉडेलचा वापर करत आहेत. यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच हा लॉन्च करणार आहे. (realme 8 pro 5g in salman khan hand will launch india soon)

सलमान खान रियमली फोनचा ब्रँड अँबॅसिडर आहेत आणि त्याने Realme 6 आणि Realme 7 सीरीज पण इंडोर्स केली आहे. त्यामुळे लॉन्चच्या आधी हा फोन त्याला मिळाला असू शकतो. Realme 8 च्या जाहिरातीत पण सलमान खान दिसेल.

कसा आहे फोन

सलमान खानने वापरलेल्या फोन Realme 8 Pro च्या फोटो मध्ये डिवाइस पूर्णपणे दिसत नाही परंतु मागून डिजाइनबद्दल खूप काही समजत आहे. फोनचा बॅक पॅनल खूप शाइनी आहे आणि नवीन स्टाइल मध्ये रियर कॅमेरा प्लेस केला गेला आहे.

हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A32 4G, भारतात पण लवकरच करेल एंट्री

फोनमध्ये चौकोनी क्वॉड कॅमेरा देण्यात आला आहे आणि कॅमेरा ब्रॅकेट थोडा मोट आहे जिथे एलईडी फ्लॅश उपलब्ध आहे. ब्लू रंगाच्या या फोनची बॉडी कर्व्ड आहे आणि दिसायला स्लिम पण आहे. रियलमीची स्लोगन डियर टू लीप पण फोनवर दिसेल. Realme 8 किंवा Realme 8 Pro स्पेसिफिकेशन बाबत जास्त खुलासा केला गेला नाही पण 108 Megapixels कॅमेरा मात्र मिळेल. तसेच कंपनी 5G मॉडेल पण घेऊन येण्याचा प्रयत्न करेल.

स्पेसिफिकेशन काय असतील

आतापर्यंत जास्त माहिती समोर आली नाही पण काही दिवसांपूर्वी रियलमी 8 बेंचमार्क साइट गीकबेंचवर दिसला होता जिथे हा MediaTek Dimensity 720, 8GB RAM सह दिसला होता. तसेच फोन Android 10 वर चालत होता पण आशा आहे कि हा Android 11 वर लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा : 12GB रॅम आणि 4,300mAh बॅटरीसह लॉन्च झाला ताकदवान फोन Oppo Reno 5K

किती असेल किंमत

आशा आहे कि कंपनी Realme 8 आणि Realme 8 Pro भारतीय बाजारात 15-20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये सादर करू शकते. रियमलीच्या या फोनची टक्कर Xiaomi Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro सीरीजशी होईल. 4 मार्चला नवीन नोट सीरीज फोन भारतात लॉन्च होणार आहे आणि रियलमीने आतापासून तिला आव्हान देण्यासाठी कंबर बांधली आहे.

The post Exclusive: बघा Realme 8 Pro ची पहिली झलक, Salman Khan च्या हातात दिसला हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-8-pro-5g-in-salman-khan-hand-will-launch-india-soon/feed/ 0
108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme 8 सीरीज, Xiaomi ची वाढेल अडचण https://www.91mobiles.com/marathi/realme-8-series-to-launch-in-india-with-108-mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/realme-8-series-to-launch-in-india-with-108-mp-camera/#respond Thu, 25 Feb 2021 12:31:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10187 कंपनीने आतापर्यंत कोणतीही खास माहिती दिली नाही पण गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये Realme 8 बेंचमार्क साइट Geekbench वर लिस्ट झाला होता. त्या लिस्टिंग मध्ये काही स्पेसिफिकेशनची माहिती आली होती.

The post 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme 8 सीरीज, Xiaomi ची वाढेल अडचण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल सेग्मेंटबद्दल Realme खूप ऍक्टिव्ह दिसत आहे. कंपनीने आत्ताच Narzo 30A आणि Narzo 30 Pro लॉन्च केले होते. तर आज Realme 8 सीरीजचा टीजर जारी केला आहे. कंपनीने अधिकृतपणे या फोनचे नाव घेतले नाही पण रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी एक पोस्टर ट्विट केला आहे ज्यात 108 MP कॅमेरयाच उल्लेख केला आहे आणि हॅशटॅग मध्ये इनफिनाइट लीप विथ 8 (InfiniteLeapWith8) असे म्हटले आहे. त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच आपली नवीन Realme 8 सीरीज सादर करणार आहे. (realme 8 series to launch in india with108 mp camera)

जसे कि आतापर्यंतच्या मॉडेल मध्ये दिसले आहे कि कंपनी दोन मॉडेल घेऊन येते. त्यामुळे आशा आहे कि यावेळी पण Realme 8 सह Realme 8 Pro येऊ शकतो.

Realme 8 मध्ये असेल 108 Megapixel चा कॅमेरा

जानेवारी मध्ये Xiaomi Mi 10i आय भारतात सादर केला गेला होता आणि हा फोन अपनी 5G सह 108 MP च्या कॅमेऱ्यामुळे खूप चर्चेत राहिला होता. तसेच आता या सेग्मेंट मध्ये रियलमी येणार आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे कि आगामी Realme 8 सीरीज मध्ये 108 MP चा कॅमेरा असेल.

कंपनीने जो फोटोग्राफी शेयर केला आहे त्यात चौकोनी स्टाइल मध्ये कॅमेरा ब्रॅकेट आहे आणि त्यात चार कॅमेरा देण्यात आले आहेत. त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल.

Realme 8 चे स्पेसिफिकेशन

कंपनीने आतापर्यंत कोणतीही खास माहिती दिली नाही पण गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये Realme 8 बेंचमार्क साइट Geekbench वर लिस्ट झाला होता. त्या लिस्टिंग मध्ये काही स्पेसिफिकेशनची माहिती आली होती.

लिस्ट करण्यात आलेल्या फोनचा मॉडेल नंबर RMX3092 होता आणि हा फोन Android OS 10 वर चालत होता. तसेच 8 GB RAM ची माहिती देण्यात आली होती. तसेच हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 720 (MediaTek Dimensity 720) ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालत होता.

हा टेस्टिंग फोन असू शकतो कारण कंपनी आता आपला नवीन फोन Android 11 वर लॉन्च करेल. गीकबेंच व्यतिरिक्त Realme 8 मॉडेल (RMX3092) ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) वेबसाइटवर पण दिसला होता. हा Realme 8 असू शकतो पण Realme 8 Pro प्रोसेसर आणि कॅमेराच्या बाबतीत खूप अडवांस असेल. कदाचित 108 MP कॅमेरा Realme 8 Pro मधेच मिळू शकतो.

The post 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme 8 सीरीज, Xiaomi ची वाढेल अडचण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-8-series-to-launch-in-india-with-108-mp-camera/feed/ 0
पावरफुल फोन Realme 8 वेबसाइट वर झाला लिस्ट, पुढल्या वर्षी 8GB रॅम सह करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/realme-8-rmx3092-geekbench-listing-8gb-ram-dimensity-720-soc-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-8-rmx3092-geekbench-listing-8gb-ram-dimensity-720-soc-specifications/#respond Thu, 31 Dec 2020 13:21:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9510 यावर्षी सप्टेंबर महीने मध्ये लॉन्च झालेल्या Realme 7 सीरीजची सक्सेसर म्हणून पुढल्या वर्षी कंपनी रियलमी 8 सीरीज सादर करण्याची प्लानिंग करत आहे.

The post पावरफुल फोन Realme 8 वेबसाइट वर झाला लिस्ट, पुढल्या वर्षी 8GB रॅम सह करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme बद्दल अलीकडेच बातमी समोर आली होती कि कंपनी Realme 8 सीरीज आणण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि Realme 8 आणि Realme 8 Pro भारतात पुढल्या वर्षी जानेवारी मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. आता Realme 8 स्मार्टफोन कथितरित्या बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर दिसला आहे. या लिस्टिंग मध्ये अपकमिंग स्मार्टफोनच्या काही शानदार फीचर्सची माहिती पण समोर आली आहे. लिस्टिंग वरून समजले आहे कि या स्मार्टफोन वर सध्या काम चालू आहे.

गीकबेंच लिस्टिंग मध्ये Realme फोन मॉडेल नंबर RMX3092 सह दिसला आहे. टिप्सटर मुकुल शर्मा आणि अभिषेक यादवने माहिती दिली आहे कि हा मॉडेल नंबर Realme 8 चा असेल. तसेच गीकबेंच लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये अँड्रॉइड 10 सॉफ्टवेयर आणि 8 जीबी रॅम सह येईल. रियलमी 8 फोन मध्ये प्रोसेसर मीडियाटेक डायमेंसिटी 720 ऑक्टा-कोर प्रोसेसर व बेस फ्रीक्वैंसी 2 गीगाहर्ट्ज असेल.

हे देखील वाचा : Jio ने पुन्हा केली अनलिमिटेड काॅलिंग फ्री, सर्व नेटवर्क वर करता यईल मोफत कॉलिंग

गीकबेंच व्यतिरिक्त Realme RMX3092 मॉडेल ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) वेबसाइट वर पण दिसला आहे, यामुळे फोन भारतात येणार या चर्चेला पण उधाण आले आहे. टिप्सटरने असे पण सुचवले आहे आहे कि या फोनचा Realme 8 Pro वेरिएंट पण असू शकतो.

यावर्षी सप्टेंबर महीने मध्ये लॉन्च झालेल्या Realme 7 सीरीजची सक्सेसर म्हणून पुढल्या वर्षी कंपनी रियलमी 8 सीरीज सादर करण्याची प्लानिंग करत आहे. आशा आहे कि या सीरीज मध्ये रियलमी 7 च्या तुलनेत जास्त चांगले स्पेसिफिकेशन आणि फीचर्स दिले जाऊ शकतात. कंपनीने अजूनही कोणती अधिकृत माहिती दिली नाही.

हे देखील वाचा : 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह OPPO Reno 5 लाॅन्च, यात आहे 50W SuperVOOC टेक्नोलाॅजी

Realme 7

Realme 7 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 20:9 रेश्यो, 2400x1080P FHD+ रेज्योल्यूशन आणि 90.5% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह येतो. तसेच या फोन मध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे, जो AnTuTu मध्ये 30W+ सुपर हाय बेंचमार्क मिळाले आहेत. हा प्रोसेसर 12nm प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. तसेच रियलमी 7 मध्ये 5000mAh बॅटरी 15W PD चार्ज सपोर्ट सह येते.

The post पावरफुल फोन Realme 8 वेबसाइट वर झाला लिस्ट, पुढल्या वर्षी 8GB रॅम सह करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-8-rmx3092-geekbench-listing-8gb-ram-dimensity-720-soc-specifications/feed/ 0
या दिवशी भारतात येत आहेत Realme 8 आणि Realme 8 Pro, जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/realme-8-series-launch-timeline-expected-2021-january/ https://www.91mobiles.com/marathi/realme-8-series-launch-timeline-expected-2021-january/#respond Wed, 16 Dec 2020 07:44:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9323 टिप्सटरने दिलेल्या माहितीनुसार Realme 8 आणि Realme 8 Pro भारतात पुढल्या वर्षी जानेवारी मध्ये लॉन्च होणार आहेत.

The post या दिवशी भारतात येत आहेत Realme 8 आणि Realme 8 Pro, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme बद्दल अलीकडेच बातमी समोर आली होती कि कंपनी पुन्हा एकदा आपल्या नारजो सीरीजचा नेक्स्ट जेनरेशन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. लीक बातमी नुसार पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी 2021 मध्ये Realme Narzo 30 सीरीज लाॅन्च केली जाईल. दरम्यान आता अजून एक बातमी समोर येत आहे कि कंपनी Narzo 30 सीरीज सोबतच Realme 8 सीरीज पण आणण्याची तयारी करत आहे. टिप्सटर मुकुल शर्माने याची माहिती दिली आहे.

टिप्सटरने दिलेल्या माहितीनुसार Realme 8 आणि Realme 8 Pro भारतात पुढल्या वर्षी जानेवारी मध्ये लॉन्च होणार आहेत. पण, लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. असे वाटत आहे कि नवीन वर्षात कंपनी अनेक धमाके करण्यासाठी तयार आहे. लक्षात असू द्या कि काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि Realme X7 सीरीज पण जानेवारी मध्ये येईल.

हे देखील वाचा : Redmi 9 Power उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि खासियत

Realme Narzo 30 सीरीजची माहिती एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टर स्टफलिस्टिंग्सचा हवाला देत वेबसाइटने सांगितले आहे कि रियलमी कंपनी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये आपल्या नारजो सीरीजचा नेक्स्ट जेनरेशन सादर करणार आहे. लीक मध्ये या सीरीज मध्ये लाॅन्च होणाऱ्या दोन स्मार्टफोनची नावे सांगितली आहेत जे बाजारात Realme Narzo 30 आणि Realme Narzo 30 Pro नावाने येतील. बातमी मध्ये स्पष्ट झाले नाही कि नारजो 30 सीरीज मध्ये दोन्ही फोन लाॅन्च होतील कि कंपनी अजून काही फोन पण यात जोडेल. सीरीजच्या लाॅन्चसाठी आता कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

हे देखील वाचा : Nokia 5.4 झाला लॉन्च, यात आहे 6 जीबी रॅम, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी

Realme Narzo 20 सीरीज

Realme Narzo 20 चा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 10,499 रुपये आहे. तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे जो 11,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. Realme Narzo 20A चा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिंएट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या वेरिएंट्सची किंमत क्रमश: 8,499 रुपये आणि 9,499 रुपये आहे. हे दोन्ही फोन Glory Silver आणि Victory Blue कलर मध्ये लॉन्च झाले आहेत.

रियलमी 7 प्रो 8जीबी रॅम व्हिडीओ

The post या दिवशी भारतात येत आहेत Realme 8 आणि Realme 8 Pro, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-8-series-launch-timeline-expected-2021-january/feed/ 0