Redmi 9 Power उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि खासियत

Xiaomi उद्या म्हणजे 17 डिसेंबरला भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनी हा नवीन डिवायस ‘रेडमी 9 सीरीज’ मध्ये जोडेल जो Redmi 9 Power नावाने लॉन्च होईल. रेडमी 9 पावर स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये आधीच लॉन्च केला गेला आहे पण भारतात लॉन्च होणारा Redmi 9 Power इंटरनेशनल मॉडेल पेक्षा वेगळा असेल. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची खासियत आणि कश्याप्रकारे व कुठे फोनचा लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल.

अश्याप्रकारे बघा लाईव

सर्वप्रथम फोनच्या लॉन्च पाहता कंपनी उदय एक ऑनलाईन ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून रेडमी ब्रँडचा नवीन स्मार्टफोन Redmi 9 Power भारतीय बाजारात येईल. शाओमी हा लॉन्च ईवेंटचे प्रक्षेपण लाईव करेल जे कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच यूट्यूब वर पण लाईव बघता येईल. त्याचबरोबर शाॅपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण रेडमी 9 पावरचे प्रोडक्ट पेज बनवले आहे आणि या पेज वर पण लॉन्च ईवेंट लाईव प्रक्षेपित केला जाईल.

अशी असेल इंडियन मॉडेलची खासियत

Redmi 9 Power चा जो मॉडेल ग्लोबल मार्केट मध्ये लाॅन्च झाला होता तो ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पण भारतात लाॅन्च होणाऱ्या रेडमी 9 पावर स्मार्टफोन मध्ये क्वाॅड रियर कॅमेरा दिला जाईल. कंपनीच्या वेबसाइट वर बनलेल्या प्रोडक्ट पेज वर या कॅमेरा सेटअपची माहिती देण्यात आली आहे जो ‘L’ शेप मध्ये आहे. रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल. तसेच इतर सेंसर्सची माहिती अजून स्पष्ट झाली नाही यासाठी लॉन्चची वाट बघावी लागले.

Xiaomi च्या नवीन फोन रेडमी 9 पावर बद्दल आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे कि भारतीय बाजारात हा फोन दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तर मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. विशेष म्हणजे चायना मध्ये हा फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च झाला होता.

Redmi 9 Power

रेडमी 9 पावर स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता चीन मध्ये हा स्मार्टफोन 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे जो कोर्निग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआय 12 वर सादर केला गेला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर चालतो. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मध्ये 48 एमपी प्राइमरी सेंसर सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला आहे आणि फ्रंट पॅनल वर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Xiaomi Redmi 9 Power डुअल सिम फोन आहे ज्यात सिक्योरिटीसाठी जहां साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चर्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. लीकनुसार भारतात हा फोन Black, Blue आणि Green कलर मध्ये लॉन्च होईल. आशा आहे कि हा स्मार्टफोन 15,000 रुपयांपर्यतच्या बजेट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here